नमस्कार मित्रानो
श्री गुरुदेव दत्त. मित्रानो दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द नक्की बोला. मित्रानो मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी मृगनक्षत्रावर सायंकाळी श्री दत्ताचा जन्म झाला. म्हणूनच त्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्री मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
२०२१ मध्ये १८ डिसेंबर शनिवारी दत्त जयंती येत आहे. मित्रानो या दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असत. त्यामुळे या दिवशी जी व्यक्ती मनोभावे श्री दत्त गुरूंच्या मंत्राचा जप करते , त्यांचं नामस्मरण करते त्या व्यक्तीला दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो.
अनेक ठिकाणी दत्त जयंतीच्या आधी सात दिवस श्री गुरुचरित्राच पारायण केलं जात. बऱ्याच ठिकाणी याला गुरुचरित्र सप्ताह असं देखील म्हणतात. या दिवसांमध्ये श्री गुरुदत्तांचं नामस्मरण , भजन , कीर्तन केलं जात.
दत्त जयंतीला हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी श्री दत्तांच्या नामाचे स्मरण केल्याने , त्यांचा मंत्र जप केल्याने व्यक्तीला बल , बुद्धी आणि विवेकाची प्राप्ती होते.
तर मित्रानो दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान आदी उरकून आपल्या घरातील देव पूजा करायची आहे. श्री दत्ताची विशेष पूजा करायची आहे.
मित्रानो ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी गुरुचरित्रामधील एखाद्या अध्यायच पठण अवश्य करा. अनेक जणांना काही अडचणींमुळे , काही समस्यांमुळे जर अध्यायाच पठण करणं शक्य नसेल तर कमीत कमी हे दोन शब्द अवश्य बोला.
हे शब्द म्हणजे गुरुदेव दत्तांचा एक मंत्र आहे. मित्रानो मंत्र आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. श्री दत्तांचं नाव घ्यायचं आहे. मित्रानो यासाठी तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरलीत तर अति उत्तम.
रुद्राक्षाच्या माळेने तुम्हाला जप करायचा आहे. जर तुमच्याकडे कोणतीच माळ नसेल तर माळेशिवाय तुम्ही डोळे मिटून संपूर्ण भक्ती भावाने , श्रद्धेने , विश्वासाने हा मंत्र बोलायचा आहे. तुम्हाला तेवढाच लाभ होईल.
तर मित्रानो तुम्ही या दत्त जयंतीला तुम्ही सकाळी उठल्याबरोबर हे २ शब्द नक्की बोला. श्री दत्त गुरु तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.