दत्त गुरूंच्या जन्माच्या या ‘चार कथा’ आपणास माहीत आहेत का ? जाणून घ्या दत्तजयंतीनिमित्त विशेष माहिती…!

0
235

नमस्कार मित्रानो श्री गुरुदेव दत्त

मित्रांनो अवघ्या काही दिवसांमध्येच दत्त जयंती येत आहे. अर्थात भगवान श्री दत्तात्रेयांच्या अवतार कार्याचा दिवस.. दत्त जन्म केव्हा झाला कसा झाला याबद्दल आपल्याला माहिती असेलच आणि नसल्यास आज या लेखा द्वारे माहित होईलच.

आज आपण एक-दोन नव्हे तर तब्बल चार दत्तजयंतीच्या कथा पाहणार आहोत. चार वेगवेगळ्या ग्रंथांमधील या कथा आहेत. सुरुवात करूया कावडीबुवांच्या दत्त प्रबोध ग्रंथांपासून, त्यातील कथेपासून. कावडी बुवा हे दत्त भक्त.

एकदा अत्री ऋषींच्या आश्रमात नारदमुनी आले आणि सौख्याने आनंदाने राहिले. त्यानंतर ब्रम्हपुत्र नारद ब्रह्म लोकांत परतले. तिकडे ते पृथ्वी लोकांचे वर्णन करू लागले. सोबतच अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया यांचे गोडवे गाऊ लागले. अनुसयेचे तप सामर्थ्य, सत्त्व, पतिव्रतेचे गोडवे देखिल त्यांनी गायले.

त्यामुळे त्रिदेव पत्नी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आपल्यापेक्षा अनुसया सत्वशील कशी या विचाराने मत्सरित झाल्या. तेव्हा त्या अनुसयाचे सत्व हरण करा असे त्रिदेवांकडे हट्ट करू लागल्या. त्या हट्टा पोटी ब्राह्मण वेशात येऊन त्यांनी अनुसया कडे भिक्षा मागितली.

अनुसया भिक्षा वाढण्याकरता आली असता ती नग्न भिक्षा वाढावी असे त्यांनी सांगितले. अनुसयाने तप समर्थ्याने हे देव असल्याचे ओळखले. आणि कमंडलू मधील तीर्थ त्यांच्यावर टाकून त्यांना लहान बालक बनवले.

त्या लहान बालकांना बघून सती अनुसयेस पान्हा फुटला. हे तीनही बालके अत्री ऋषींच्या आश्रमातच राहू लागली. तिकडे पती परत येईनात म्हूणन त्रिदेवी चिंतातूर झाल्या. आणि अनुसया चे सत्व हरण करू शकलो नाही म्हणून खजील झाल्या व त्रिदेव आपले बाल रुपी अंश तिथेच ठेवून आपआपल्या क्षेत्री परतले.

पुढील कथा ब्रम्हपुरणातील..पुत्रप्राप्ती साठी अत्री ऋषींनी आराधना केली आणि त्यांना सोम, दत्तात्रय आणि दुर्वास हे पुत्र आणि शुभनेत्री नामक कन्या झाली. यातील दत्त हा पुत्र विष्णूच्या अंशाने झाला. अशी माहिती ब्रम्हपुराणात आढळते.

आता पाहूया भागवत पुरणातील कथा. अत्री ऋषी हे विद्वान आणि श्रेष्ठ ऋषी होते. मानसपिता ब्रह्मदेवाच्या आज्ञेने रत पर्वतावर सपत्नी राहू लागले. संतती नसल्याने ते दुःखी होते. एका पायावर उभे राहून वायुभक्षण करत अत्री ऋषी उग्र तप करत.

तेंव्हा त्यांच्या मस्तकातून येणारा अग्नी त्री लोकात जाऊ लागला. त्रिदेव तिकडे येऊन उग्र तपाचे प्रयोजन विचारले असता पुत्र प्राप्तीसाठी तप करत असल्याचे त्यांनी सांगितले. तेंव्हा त्यांना सोम, दत्तात्रय व दुर्वास असे तीन पुत्र वरदान त्यांनी अत्री ऋषींना दिले.

दत्त महात्म्य ग्रंथामधील शेवटची कथा. हा ग्रंथ टेंबे स्वामी अर्थात वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांनी लिहिला आहे. त्यानुसार यातील कथा पुढीलप्रमाणे. अनुसया परम उदार, मत्सर विरहित साधवी होती. अत्री ऋषी तपस्वी असल्याने त्यांचे ऐहिक सुखाकडे लक्षच नव्हते.

तपाचरणी त्यांनी जीवन बहाल केले होते. त्यांनी पुत्र प्राप्ती साठी तप सुरु केले. यामुळे त्रिदेव प्रसन्न झाले आणि संतती साठी आशीर्वाद दिला. पुढे नारदमुनी पाहुणचारासाठी अत्री ऋषींच्या आश्रमी आले. तेंव्हा परत गेल्यावर त्यांनी माता सती अनुसया बद्दलचे कथन देव लोकात केले.

तेंव्हा द्वेष्याने अनुसयेचे सत्व हरण करण्याची गळ त्रीदेवीनी आपल्या पतीना घातली. त्यावर त्रिदेव वेशानंतर अनुसयेचे सत्वहरण करण्यासाठी आश्रमात आले. अत्री ऋषी स्नानाठी नदीवर गेले होते. भिक्षा नग्न वाढण्यास त्यांनी अनुसया हिस सांगितले.

परंतु हे ब्राम्हण त्रिदेव असल्याचे तिने ओळखले व तिने कमंडलू मधील अभिमंत्रित पाणी त्यांच्यावर शिंपडले. तेव्हा ब्राम्हण रुपी देव बालक झाले. बालक बघून अनुसयेला पान्हा फुटला.

अत्रीऋषी परतल्यावर त्यांना सर्व हकीकत समजली. त्रीदेवी आपल्या आपल्या पतींना परत न्यायला आल्या. तेव्हा त्री देवांनी त्यांना आशीर्वाद देऊन सोम, दुर्वास आणि दत्तात्रेय हे तीन पुत्र दिले. अशाप्रकारे अत्री व अनुसया यांचे पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण झाली.

मित्रानो कथा आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here