श्रीकृष्ण सांगतात गाईच्या या अंगाला हात लावल्याने गरिबी दूर दूर जाते…

0
256

नमस्कार मित्रानो,

आपल्या हिंदू धर्मात गाईला खूप पवित्र मानले जाते. धार्मिक दृष्ट्या सुद्धा गोमातेला फार महत्व आहे. गाय शांत व सौम्य असते. आपण गाईला आईचा दर्जा देतो. गाईच्या पोटात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात गाईची नित्यनियमाने पूजा केली जाते. आपल्या मोठ मोठ्या धर्म ग्रंथांमध्ये गाईचे वर्णन व महिमा सांगितला गेला आहे.

अशा या गाईचे खूप काही शुभ शकुन समजले जातात. चला तर मग पाहुयात गाईचे काही शुभ शकुन. ज्यावेळी गाई रानातून चरून घरी येतात त्यावेळी त्यांच्या पायांमुळे वातावरणात धुळीचे कण पसरतात. ती वेळ म्हणजे गोरज मुहूर्त. या मुहूर्तावर लग्न करणे हा खूप शुभ योग समजला जातो. जर आपण यात्रेला निघालो आहोत आणि रस्त्यात गाय दृष्टीस पडली तर आपली यात्रा यशस्वी पणे पूर्ण होते.

आपली यात्रा आनंदात आणि समाधानात पूर्ण होते. ज्या घरात गाय असते त्या घरातील वास्तुदोष आपोआप नष्ट होतात. गाई जिथे राहते तिथे वास्तू दोष रहातच नाही. कुंडलीत जर शुक्र ग्रह निच्च स्थानी असेल किंवा त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर पडत असेल तर दररोज सकाळी स्वयंपाक करतानाची पहिली चपाती किंवा भाकरी पांढऱ्या गाईला खायला द्यावी.

असे केल्याने शुक्र ग्रहाची वाईट दशा चांगल्या स्थितीत येते. सूर्य, चंद्र, मंगळ किंवा शुक्र यांची युती जर राहुशी असेल तर पितृ दोष होतो. अशी मान्यता आहे कि सूर्याचा संबंध वडिलांशी व मंगळाचा संबंध रक्ताशी असतो. म्हणून सूर्य जर शनी, राहू किंवा केतू बरोबर स्थित असेल तर दृष्टीसंबंधित व मंगळाची युती राहू बरोबर असेल तर पितृदोष निर्माण होतो.

या दोषांमुळे आपले संपूर्ण जीवन खडतर व संघर्षमय बनून जाते. जर तुमच्या सुद्धा कुंडलीत असा काही दोष किंवा पितृ दोष असेल तर गाईला दररोज किंवा अमावस्येला पोळी, गुळ किंवा चारा खायला दिल्यास पितृ दोष नष्ट होतो. तुमच्या कुंडलीत जर सूर्य तूळ राशीत निच्च स्थानी असेल तर गाईमध्ये सूर्य व केतू नाडी असल्यामुळे गाईची पूजा करावी. यामुळे हा दोष समाप्त होईल.

जर रस्त्याने जात असताना आपल्याला समोरून गाय येताना दिसली तर गाईला आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे. यामुळे आपले जे काही काम असेल ते नक्कीच पूर्ण होते. जर आपण एखादे वाईट स्वप्न पाहिले व भीती वाटत असेल तर गोमातेच्या नावाचा जप करावा. यामुळे वाईट स्वप्ने दिसणे बंद होते. गाईच्या तुपाचे सेवन केल्यास आपण दीर्घायु होतो.

आपल्या हातावरील आयुरेषा जर मध्येच खंडित झाली असेल तर गाईच्या तुपाचे सेवन करावे व गाईचे पूजन करावे. देशी गाईच्या पाठीवर कुबड असते. तो बृहस्पती असतो. म्हणून कुंडलीत बृहस्पती निच्च राशीत मकरेत असेल, अशुभ स्थितीत असेल तर देशी गाईच्या या बृहस्पती भागाला शिवलिंग समजून त्याचे दर्शन घ्यावे. सोबत गाईला गूळ व चणे खायला द्यावे. यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते.

गोमातेच्या डोळ्यांमध्ये तेजस्वरूप सूर्यदेव व शीतलता स्वरूप चंद्रदेवाचे अधिष्ठान असते. म्हणून कुंडलीमध्ये सूर्य व चंद्राची स्थिती कमजोर असेल तर गाईच्या दोन्ही डोळ्यांचे दररोज दर्शन घ्यावे. यामुळे आपल्या कुंडलीत सूर्य व चंद्राची स्थिती मजबूत होते.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here