नमस्कार मित्रांनो,
मागील आठवड्यात एक भयंकर अशी केस आमच्या समोर आली. एका घरामध्ये एक खोली अनेक वर्षांपासून बंद होती. तीच दार हे अनेक वर्षांपासून बंदच होत. त्या खोलीत कोणीही जा ये करत नव्हतं. अगदी कोणाचाच त्या खोलीत वावर नव्हता. हळू हळू त्या घरातील लोक एका पाठोपाठ एक आ जारी पडू लागले.
असं होतानाच अनेक प्रकारच्या बाधा त्या ठिकाणी उत्पन्न होऊ लागल्या. काही अदृश्य शक्तींचा वावर त्या घराच्या आसपास लोकांना जाणवू लागला. मित्रांनो आपल्या घरात कितीही खोल्या असुद्या त्यात दिवसातून 5 मिनिट का होईना मनुष्याचा वावर होणे अत्यंत आवश्यक आहे.
जर मनुष्याचा वावर अनेक दिवस, महिने, वर्ष खोलीत होत नसेल तर अशा खोलीत उपद्रवी प्राणी प्रवेश करतात. कोळी, पाली, चिमण्या, गांधींमाश्या या बंद खोलीत प्रवेश करतात. सोबतच अशा काही शक्ती असतात ज्यांना अशा प्रकारचा निवारा अत्यंत सुखकर असतो. अशा अदृश्य शक्ती, अशा दुष्ट शक्ती अशा प्रकारचा निवारा शोधतच असतात. त्यांच्या वास्तव्याने संपूर्ण वास्तू अपवित्र करतात. अशामुळे वास्तूत राहणाऱ्या लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
या अदृश्य पण दुष्ट असणाऱ्या शक्ती अगदी बिनधास्तपणे या बंद खोलीत संचार करत असतात. त्यांना अगदी मोकळं रान मिळत. आणि हळू हळू संपूर्ण वास्तू या दुष्ट शक्तीने प्रभावित होते. मित्रांनो अनेकांना सर्व खोल्यांचा वापर करणे शक्य होत नाही.
पण मित्रांनो अशा खोल्या कमी कमी दररोज झाडून पुसून घ्यायला हव्यात. त्या खोलीत झाडू फिरणे अत्यंत आवश्यक आहे. झाडू साक्षात लक्ष्मी रूप आहे. जर हे शक्य नसेल तर एक दिवा किंवा एक अगरबत्ती रोज त्या खोलीत लावली तर त्या खोलीतील वातावरण चैतन्यमय बनत. अशाने त्या दुष्ट शक्तींना आसरा मिळत नाही.
विशेष करून उत्तर दिशेला, पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असलेल्या खोल्या कधीच बंद ठेऊ नका. या दिशेला असणाऱ्या खोल्या सातत्याने वापरात असायलाच हव्या.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.