नमस्कार मित्रांनो,
आपलं रोजच जीवन जगत असताना आपण आपल्या कामासोबतच दुःख, आनंद जगत असतो, बऱ्याचवेळा आपल्याला भरपूर राग येतो व रागाच्या भरात आपण या चुकांना कवटाळून बसतो. त्यावेळी आपण काही चुका करून बसतो पण त्याचे वाईट पडसाद आपल्या आयुष्यावर होतातच.
जसे की आपण घरातील काही गोष्टी ज्या एक मर्यादेपर्यंत इतरांना सांगाव्यात असे चाणक्य नीती सांगते, कारण लोक आता ऐकतात व नंतर चेष्टा बनवतात, आपल्या परिस्थितीचा फायदा घेतात.
तसेच आपण इतरांचा अपमान करू नये व स्वतःचा अपमान देखील सहन करू नये. एखाद्या व्यक्तीवर अन्याय करू नये. भगवान दत्त गुरू सांगतात की मोराळे येथे जाऊन त्यांचे दर्शन, नाम जप केल्यास जीवनातील अनेक समस्यांना सामोरं जाण्याची ताकद मिळते. मानसिक शांती व अनेक प्रश्नाची उत्तरे मिळतात.
आपल्या अंगी दृढ निश्चय येतो व भीती राहत नाही. पहिली चूक जी आहे ती म्हणजे तुम्ही जर वारंवार तुमच्या पेक्षा गरीब व्यक्तीसोबत वाद करत असाल, सतत त्याचा अवमान करत असाल तर तुम्ही त्याला तशी वागणूक देने पूर्ण चुकीचे आहे.
तुम्ही कोणालाही असा विनाकारण त्रास दिल्यास त्या व्यक्तीचा मनाचा कोप होतो, त्याचा आत्मा शाप देतो व त्याचे परिणाम तुम्हाला अत्यंत वाईट रित्या भोगत असतात, जरी तो दुर्बल व्यक्ती तुमच्याशी सामना करत नसेल, तुम्हाला विरोध करत नसेल तर त्याची प्रबळ इच्छाशक्ती, आंतरिक शक्ती तुमच्या विनाशास निमंत्रण देत असते.
काही वेळेस असा व्यक्ती तंत्र मंत्र शस्त्र विद्येचा वापर करतो व वाईट शक्तींना तुमच्याकडे पाठवतो. ज्यामुळे तुम्हाला होत असणारा त्रास हा नेमका समजण्यासाठी त्रास होतो, वेदना होतात.
मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी प्रॉपर्टी खरेदी कराल तेव्हा तुम्ही तिची कसून चौकशी करा, ती प्रॉपर्टी तो व्यक्ती का विकत आहे, ती संपत्ती घर असो, जमीन असो अथवा अन्य काहीही तिथे वाईट शक्ती वास करतात का याची पडताळणी करा, जर करत असतील तर तुमच्या खरेदीनंतर अशा गोष्टी मागे लागतात, खरेदी इतके पैसे देऊन करायची व नंतर वाईट शक्तींचा त्रास विकत घेतल्यासारखे होईल, त्यामुळे वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र यावेळी खूप मदत करते. आपल्या जीवनातील अकल्पित घटना रोखण्यासाठी हे करणे अति आवश्यक आहे.
मित्रांनो बऱ्याच लोकांना अशी सवय असते की घरी खळखळून हसायचं, मोठमोठ्याने आपला आनंद व्यक्त करत असतो पण लक्षात ठेवा आजूबाजूला तुमच्या प्रगतीवर जळणारे खूप असतात जे आपल्या घरातील बऱ्याच वाईट गोष्टींना निमंत्रण देतात.
जसे की जर तुम्ही आज खूप आनंदी असता व दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनी काहीतरी विपरीत घडते, घरी वाद होतात, स्वभाव संशयी बनतो, कुणीतरी आजारी पडते. म्हणून आपला आनंद आपल्या कुटुंबासोबत मनसोक्त लुटा पण तो कपटी, धूर्त व्यक्तींसोबत वाटू नका.
मित्रांनो आनंदात कोणालाही कोणतीही स्वतःची कोणतीच वस्तू देवू नका, त्यावरती टोटके होऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही या वरील 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुमचं जीवन नक्कीच सफल होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.