मला एका मुलाने गालावर किस केलं.
मम्मी – मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
मुलगी – नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.
(मम्मी बेशुद्ध)
एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.
शिक्षक : तु आज लेट का आलीस?
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता.
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता.
मुलगा : मी 18 वर्षाचा आहे आणि तु?
मुलगी : मी पण 18 वर्षाची आहे.
मुलगा : चल ना मग लाजायचं काय त्यात एवढे.
मुलगी : कुठे?
मुलगा : मतदान करायला ग.
विचार बदला, देश बदलेल.
बाबा : काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु : हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या.
बाबा : ऑ, मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु : हो बाबा, त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात.
खतरनाक प्रोपोज
शिंचन : तु फक्त हो म्हण, सगळयांची वाट लावतो.
मुलगी : अय्या खरंच?
शिंचन : हो खरंच, आणि तु फक्त नाय म्हण.
तुझी पण वाट लावतो.
आप्पा : आज चिकन आणलाय पण लिंबू नाही.
झम्प्या : जाऊ द्या न आता, नवीन विम बर आलाय त्यात 100 लिम्बांची शक्ती आहे तेच टाका दोन थेंब.
मुलगा : अगं, किती मेसेज करशील पॅक मारला आहेस का?
मुलगी : हो रे, पण तू सुद्धा कधी नाही तो आज माझ्या प्रत्येक मेसेज ला रिप्लाय देतोयस. तू पण पॅक मारला आहेस का?
मुलगा : हो, पॅक वर पॅक मारतोय. तू कितीचा मारला आहेस?
मुलगी : 34 चा, आणि तू?
मुलगा : पहिला 30 चा, नंतर 60 चा, आणि आताच 90 चा मारला.
मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना?
बाप : स्वतः उठुन घे?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा.
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या.
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.
बंड्या सिगा रेट ओढत असतो. समोरून त्याचे बाबा येताना दिसतात.
बंड्या शर्टच्या खिशात चुरडून सिगारेट विझवतो.
बाबा : काय रे सिगारेट पित होतास?
बंड्या : नाही बाबा.
बाबा : मग खिशातून धूर कसला दिसतोय?
बंड्या : फुल नौटंकी स्टाइल मध्ये, बाबा आज माझ्यावर संशय घेऊन तुम्ही माझं हृदय जाळलंत. हा त्याचाच परिणाम आहे.
भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर : गण्या, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे?
गण्या : सर, भावा-बहिणीचा.
सर : काय?
गण्या : हो सर, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो.
गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले.
वडील : गण्या, किती वाजले रे.
गण्या : बाबा, मला घड्याळ कळत नाही.
वडील : तू फक्त तास, मिनिट आणि सेकंद काटा कुठे आहेत ते पाहून सांग.
गण्या : बाबा, तिन्ही काटे घड्याळातच आहेत.
बॉब : मेरे पापा इतने लंबे है कि खड़े खड़े ही चलता फॅन रोक देते है.
पिंट्या : हमारे वडील भी लंबेच है, मगर ऐसा आगाऊ पणा नहीं करते.
वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू उभारतात आणि त्यात झोपी जातात. काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात,
वडील : वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय?
मुलगा : मला लाखो तारे दिसताहेत.
वडील : ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा : खगोल शात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील : एक मुस्कटात ठेवत मुर्खा ते सांगत आहेत आपला तंबू चोरीला गेलेला आहे.
शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो.
पप्पू : पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो?
पप्पा : नाही रे वेड्या. भूत बित तसलं काय नसत या जगात.
पप्पू : मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून.
पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर.
पप्पू : पण का पप्पा?
पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये.
वडिलांनी बंडूची तलाशी घेतली, सिगरेट, मुलीचे नंबर निघाले.
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले. आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
बंडू रडत रडत, पप्पा हि प्यांट माझी नाही तुमची आहे.
मित्रांनो जोक्स आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच भन्नाट पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.