हे चूर्ण वापरा. मरेपर्यंत हार्ट अटॅक येणार नाही, चरबी लोण्यासारखी वितळेल.

0
423

नमस्कार मित्रानो

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरावरती होऊन असंख्य प्रकारचे वेगवेगळे आजार बऱ्याच व्यक्तींना होत आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये वात , पित्त , कफ हे त्रिदोष असतात. या त्रिदोषांचे संतुलन राखणं प्रत्येक व्यक्तीला गरजेचे आहे.

परंतु सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे असंख्य व्यक्तींना स्वतःकडे वेळ द्यायला मिळत नाही. या मध्ये पुरेशी झोप न मिळणे, वेळेवर जेवण न मिळणे, व्यायाम नसणे त्यामुळे आपल्या शरिरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होते , विद्राव्य घटक वाढतात. त्याचं रूपांतर असंख्य आजारावर होतं.

मित्रानो बऱ्याच व्यक्तींचे पोट सकाळी उठल्यावर साफ होत नाही असे असंख्य आजार बऱ्याच व्यक्तींना पाहायला मिळतात . काही व्यक्तींना सध्याच्या काळामध्ये कोरोना सारखे आजार सुद्धा होऊन गेलेले आहेत. यामध्ये हे आजार बरे होण्यासाठी असंख्य गोळ्या औषध घेतल्या जातात. याचेही काही विद्राव्य घटक शरीरात साठलेले असतात.

हे सर्व बाहेर काढण्यासाठी आजचा उपाय फक्त 7 दिवस करा. कसल्याही प्रकारचे विद्राव्य घटक शरीराच्या बाहेर पडतील. हा उपाय करण्यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे सुंठ चूर्ण. मित्रांनो सुंठीचे चूर्ण सहज उपलब्ध होते. कटू उष्ण तीक्ष्ण व रुक्ष आहे.

सुंठे मध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील वेदने संबंधित तक्रारी, शरीरातील वात , पित्त , कफ म्हणजेच त्रिदोष बिघडलेले परत येण्यास खूप फायदेशीर ठरते. आयुर्वेदामध्ये जवळजवळ 95% औषधे बनवण्यासाठी सुंठ वापरले जाते. म्हणून असंख्य दुर्धर आजारावर सुंठ रामबाण उपाय म्हणून कार्य करते.

उपायासाठी आपल्याला साधारण एक चमचा सुंठ पावडर लागणार आहे. या नंतर पुढचा पदार्थ लागणार आहे आस्कंद म्हणजेच अश्वगंधा चूर्ण. अश्वगंधाचे सेवन केल्याने हृद्यासंबंधी कुठलाही आजार असेल त्याची तीव्रता कमी करण्यास मदत होते. कारण यामध्ये अँटिऑक्सिडंट, भरपूर प्रमाणात असतात.

जे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करते ज्यामुळे हृदय व मांसपेशी मजबूत करतात. अश्वगंधामधील असणारे अँटिऑक्सिडंट घटक आपली इम्यून सिस्टम मजबूत बनवते ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो.

ज्यांना दुर्बलता, कमजोरी, शुक्रजंतू कमी असतील, बऱ्याच माता-भगिनींना मासिक पाळीच्या कोणत्याही समस्या असूदेत, यावरती अश्वगंधा फार उपयुक्त ठरते. म्हणूनच या उपायासाठी आपणास एक चमचा अश्वगंधा चूर्ण लागणार आहे.

पुढचा पदार्थ लागणार आहे तो शतावरी. आयुर्वेदामध्ये शतावरी ही शीत , कडू , दुग्ध , प्रदर आहे. बऱ्याच माता-भगिनींना बाळंतपणानंतर दूध कमी येते , बऱ्याच माता होण्यास अडचणी येतात.

काही पुरुषांना सेक्स संबंधी समस्या असतात. तसेच इतर समस्यावरती शतावरी आयुर्वेदामध्ये अत्यंत फायदेशीर ठरते.म्हणूनच या उपायासाठी एक चमचा शतावरी चूर्ण लागणार आहे.

पुढचा जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लेंडी पिंपळी. आयुर्वेदामध्ये पिंपळी वातनाशक , उष्ण आहे. पिंपळी पचना संबंधित सर्व तक्रारी कमी करते तसेच मित्रानो पाचन तंत्र सुधारते आणि शरीरातील वात प्रकोप वाढल्याने होणाऱ्या वेदना कमी करते.

ज्यांचे शरीर थंड पडते अशा व्यक्तीस उबदार ठेवण्यास पिंपळी उपयुक्त ठरते. म्हणून पिंपळी चूर्ण आपणास लागणार आहे. उपायासाठी आपल्याला एक चमचा पिंपळी चूर्ण लागणार आहे. यानंतर पुढचा घटक लागणार आहे तो म्हणजे आवळा पावडर.

शरीरातील वाढती चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा महत्वाचा ठरतो. सोबतच अनेक संक्रमित आजारानंतर शरीर दुर्बल बनते, नेहमी थकवा , अशक्तपणा, जाणवतो. यावर आवळा अत्यंत फायदेशीर ठरतो.

आवळ्याचे नियमित सेवन केल्याने वारंवार होणारे पित्त , बद्धकोष्ठता , रोग प्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तीने नियमित आवळा खाल्याने खूप फायदा होतो. म्हणून या उपायासाठी आवळा चूर्ण आपणास एक चमचा लागणार आहे.

असे हे सर्व चूर्ण एकत्र केल्यानंतर तयार होते ते आवळा कल्प. हा आवळा कल्प तुम्ही दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये घेऊ शकता. एक कप पाणी गरम करून घ्या त्यात एक चमचा हे चूर्ण टाका. त्यामध्ये हे चांगल्या प्रकारे मिक्स करा.

चहा ज्याप्रमाणे घेतो त्याप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर हे चूर्ण आपणास उपाशीपोटी घ्यायच आहे. त्यानंतर अर्धा तास तरी काहीच खायचं प्यायचं नाहीये. हा उपाय सात दिवस कमीत कमी करायचा आहे. एक महिन्यापर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळे तुमच्या सर्व समस्या कमी होतील.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here