नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपण आपल्या जीवनात जे काही आहोत ते आपल्या कर्मामुळे आहोत. त्यामुळे, आपण जर योग्य मेहनत घेतल्यास आपले भविष्य उज्वल होईल पण जर, आळस करत राहिलो तर नेहमीच अपयश येईल. चांगले कर्म केले तर फळही चांगलेच मिळणार आणि कर्म वाईट केले तर फळ सुध्दा त्याचप्रमाणे मिळणार.
आपण फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहील पाहिजे. कधीकधी आपण एखादे चांगले कर्म केल्यानंतर विसरुनही जातो, आणि अचानक पणे काही वर्षानंतर त्या कर्माचे फळ प्राप्त होते. त्यामुळे या कथेद्वारे आपल्याला समजण्यास मदत होईल, की जीवनात कधी ना कधी कर्माचे फळ मिळत असते.
मित्रांनो एका छोट्याशा गावात एक म्हातारी आणि तिची मुलगी दोघीजणी राहत होत्या. एके दिवशी त्यांच्याकडे एक अगरबत्ती विकणारा मुलगा आला. तो मुलगा घरो घरी जाऊन अगरबत्ती विकत असे.
मे महिना असल्याने खूप उष्णता वाढली होती. तो मुलगा दुपारी आला होता आणि त्याने त्यांना अगरबत्ती घेण्यासाठी विनंती केली. त्यावर त्या आजींनी पुरेसे पैसे नसल्याने अगरबत्ती घेऊ शकत नाही, असे सांगितले.
उन्ह खूप असल्याने त्या मुलाने एक ग्लास पाणी मागितले. त्यावेळी म्हातारीने त्या मुलाला आत बोलावूनत्याची विचारपूस केली आणि पाणी प्यायला दिले. त्यावर तो मुलगा म्हणाला की, तो खूप गरीब असल्याने अगरबत्ती विकून काही दोन-चारशे रुपये मिळवून आपले घर चालवत असतो. कारण त्याची आई सतत आ जारी असते, वडील नसल्याने हे काम त्या मुलाला करावे लागते.
मित्रांनो तो मुलगा खूप थकलेला दिसल्यामुळे आजींनी त्याला खायला दिले. त्यावेळी त्या मुलाने सांगितले नको, ‘जर मी इथे काही खात बसलो, तर अगरबत्ती विकणार नाही आणि पुन्हा उपाशी रहावे लागेल’ त्या वेळी त्या आजीने एक ग्लास दूध देऊन त्याच्याकडून एक अगरबत्तीचा पुडा खरेदी केला.
त्यावेळी तो मुलगा तिथुन निघून गेला कारण त्याला दिवसभर अगरबत्ती विकून, त्यानंतर रात्री अभ्यासही करावा लागत असे. त्यावेळी आजी आणि मुलगी दोघीही मोलमजुरी करून आपले जीवन पुढे ढकलत होत्या. त्यामध्ये एक दिवस अचानक आजीच्या छातीत दुखू लागले. तेव्हा त्या मुलीने घाईघाईने आईला दवाखान्यात नेवून ऍ ड मि ट केले.
मित्रांनो लगेच आजीच्या विविध टेस्ट करून तिचे ऑ प रेशन करावे लागले. हृ द य वि का राचा झ ट का आला होता पण सुदैवाने त्यातुन आजी सुखरूपपणे बाहेर पडल्या परंतु, ज्यावेळी दवाखान्याचे बिल हे 12 लाख झाले होते.
मित्रांनो एवढं मोठं बिल पाहून त्या दोघेही घाबरल्या, कारण त्या राहात असलेले घर भाड्याने घेतलेले होते. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली आणि त्याना सांगितले की, इतके बिल होणार आहे याची पूर्वकल्पना आम्हाला आधीच द्यायला हवी होती. कारण आमच्याकडे इतके पैसे नाहीत.
तसेच आयुष्यभर जरी आम्ही तुमच्याकडे कामाला राहिलो तरी सुद्धा आम्ही तुमचे हे 12 लाखांचे बिल देऊ शकत नाही असे आजींनी सांगितले.
मित्रांनो त्यावर डॉक्टरांनी सांगितले की तुमचे हे 12 लाखाचे बिल आधीच भरलेलं आहे. त्यावर त्या दोघी अवाक झाल्या, तेव्हा त्या दवाखान्याचे सर्वात मोठे डॉक्टर पुढे आले आणि त्यांनी त्या आजींना नमस्कार करून ‘आई ओळखलस का मला’ असे म्हणाले.
त्यावर आई आणि मुलगी दोघीही त्या डॉक्टरांकडे बघतच राहिल्या, तो डॉक्टर दुसरा तिसरा कोणी नसून अगरबत्ती विकणारा तो गरीब मुलगा होता.
मित्रांनो त्यावर डॉक्टरांनी सांगितले की, तुम्ही दवाखान्यात आणले तेव्हाच मी तुम्हाला ओळखले होते, त्यादिवशी मी संकटात होतो अडचणीत होतो, उपाशी होतो त्यावेळी तुम्ही मला मदत केली म्हणून दहा वर्षांपूर्वीच्या त्या मदतीची परतफेड म्हणून, मी आज तुझे संपूर्ण बिल एक ग्लास दुधात फे डून टाकले.
मित्रांनो हा प्रसंग पाहून आजी आणि मुलीच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यावर त्याने सांगितले की, ताई हा माझा दवा खाना आहे. कधीही जर तुला किंवा आईला कसलीही मदत लागली तर बिनधास्त दवा खान्यात यायचे.
अशाप्रकारे आपण केलेल्या आपल्या चांगल्या कर्माचे फळ अचानकपणे आपल्याला मिळते. आपल्या कर्माचे फळ हे कधी ना कधी नक्कीच मिळत असते, त्यामुळे सतत दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करा. इतरांशी वागताना चांगले वागा.
मित्रांनो तुम्हाला कथा आवडली असेल तर आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.