चांदीच्या या वस्तू , तुमचे जीवन बदलून टाकतील. आजच घरी घेऊन या

0
403

नमस्कार मित्रानो

मित्रांनो सर्वांनाच वाटते कि आपल्या घरात समृद्धी व वैभव असावे. आपण सुखी व समाधानी असावे. त्यासाठी आपण खूप प्रयत्नही करतो. परंतु मनासारखे यश आपल्याला मिळत नाही व आपली प्रगती होत नाही. मग आपण म्हणतो की आमचे नशीबच खोटे.

इतके कष्ट करून देखील हातात काहीही लागले नाही. परंतु जर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळवायचे असेल , आपली प्रगती करायची असेल आणि घरात सुख-समृद्धी आणायची असेल तर चांदीच्या या पाच वस्तूपैकी कोणतीही 1 वस्तू किंवा पाचही वस्तू तुम्ही घरात ठेवा.

या चांदीच्या वस्तूंमुळे तुमचे भाग्य बदलेल, तुम्हाला प्रत्येक बाबतीत यश मिळवून सुख व समृद्धी मिळेल. त्यातील पहिली वस्तू म्हणजे चांदीचा चौकोनी तुकडा. चांदीचा चौकोनी तुकडा जर आपण घरात ठेवला तर आपल्याला नोकरी किंवा व्यवसायात यश मिळते.

आपल्याला धंद्यात खूप फायदा होतो. आपली प्रगती होते. सर्व बाजूंनी पैशांची आवक वाढते. खूप वेगाने पैसा आपल्याकडे यायला सुरुवात होते. देवी लक्ष्मीची पाऊलेही यामुळे आपल्या घराकडे वळतात. या चांदीच्या तुकड्याला तुम्ही लॉकर रूममध्ये किंवा आपल्या हॉलमध्येही सजवून ठेऊ शकता.

जर लवकर लग्न होत नसेल, लग्न जमत नसेल किंवा विवाहात काही अडचणी येत असतील तर चांदीच्या चैनमध्ये चांदीची भरीव गोळी टाकून ती चैन कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या सोमवारी गळ्यात धारण करावी.

यामुळे तुमचा विवाह शीघ्र होईल. तुमचा विवाह योग जुळून येईल. तसेच आपल्या कुंडलीत प्रथम भागात राहू असेल, तर गळ्यात चांदीची चैन घालणे खूप लाभदायक असते. यामुळे तुमच्या सर्व संकटे, अडचणी आणि दुःखांचा नाश होतो.

शास्त्रानुसार असे म्हटले जाते की नोकरीत किंवा व्यवसायात जर आपल्याला प्रगती करायची असेल , आपल्याला खूप मोठे व्हायचे असेल तर चांदीचा हत्ती घरात जरूर ठेवावा. यामुळे धनाची देवी लक्ष्मी तर आपल्यावर प्रसन्न होतेच त्याशिवाय गणपती बाप्पांची ही कृपा आपल्याला मिळते.

या दोघांचा जर एकत्र आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला तर धन , संपत्ती व ऐश्वर्य आपल्या मागे मागे येतील. पण हा हत्ती आतून पोकळ नसावा. लहान असला तरी हरकत नाही पण तो भरीवच असावा. त्याशिवाय त्याची सोंड खाली असावी वरती सोंड केलेला हत्ती घरात ठेवू नये.

एक चांदीची डबी घेऊन त्यात पाणी भरून ती डबी आपल्या तिजोरीत ठेवावी व काही दिवसानंतर ते पाणी वाळले की, पुन्हा त्यात पाणी भरून ठेवावे. यामुळे तुमच्या तिजोरीत भरभराट होईल आणि आपली तिजोरी कधीही खाली होणार नाही.

जर तुमच्या पत्रिकेत काही राहु दोष असेल तर चांदीच्या डबीत मध भरून ती डबी घराच्या अंगणात जमिनीत गाडून टाकावी. यामुळे सर्व प्रकारच्या राहू दोषांपासून आपली सुटका होते. चांदीच्या ग्लासात पाणी पिणे खूपच फायदेशीर ठरते किंवा पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात चांदीचा ग्लास टाकून ठेवावा व ते पाणी घरातील सर्व सदस्यांनी प्यावे.

यामुळे सकारात्मक परिणाम मिळतात. परंतु जास्त भावनिक व्यक्तीने चांदीच्या ग्लासात पाणी पिताना जरा सावध राहावे. कारण चांदीच्या ग्लासात पाणी पिल्याने व्यक्ती जास्त भावनिक होतात. तसेच चांदीची बासरीही घरात ठेवणे खूप शुभ असते.

चांदीची बासरी आणून ती गोपाल कृष्णांकडे ठेवून द्यावी किंवा आपल्या देवघरात ठेवून द्यावी. मित्रांनो यापैकी कोणतेही एक वस्तू आणा किंवा शक्य झाल्यास पाचही उपाय करा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here