मेलात तरी चालेल पण या ३ प्रकारच्या व्यक्तींची चुकून सुद्धा मदत करू नका – चाणक्यनीती

0
1062

नमस्कार मित्रांनो

चाणक्यनीती हा चाणक्याद्वारे लिहिलेला एक नीतिग्रंथ आहे. जीवन सुखी आणि समाधानी जगण्यासाठी भरपूर माहिती या नीतिग्रंथा मध्ये नमूद आहे. या ग्रंथाचा उद्देश मानवाला प्रत्येक क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान असणे हा आहे.

चाणक्य एक महान विद्वान होते ज्यांनी त्यांच्या नीतीच्या आधारे चंद्रगुप्त मौर्य यांना राजाच्या गादीवर बसवले. चला तर मग जाणून घेऊया चाणक्यांची नीती जी आपल्याला आयुष्यात कुठे ना कुठे कामी पडेल.

मित्रांनो आचार्य चाणक्य सांगतात कि या ३ प्रकारच्या लोकांची मदत कधीच केली नाही पाहिजे. अशा व्यक्तींना मदत केल्याने आपलेच नुकसान होते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना मदत करू नये.

मित्रांनो आपल्याला लहानपणापासून वडीलधाऱ्या व्यक्ती सांगत असतात कि नेहमी एकमेकांना मदत केली पाहिजे. मग ती मदत पैशाची असो किंवा अन्य कसली. आपल्या समाजात कोणाला मदत करणे म्हणजे चांगल्या संस्काराची लक्षण आहेत.

काही लोक मदत करताना मागे पुढे बघत नाहीत. कसलाही विचार न करता गरजवंताला मदत करण्यास काही लोक पुढे उभे असतात. मदत करण्याआधी त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे आहे हे जाणून घ्यायचा आपण विचार पण करत नाही.

मित्रांनो परंतु आचार्य चाणक्य यांची याबाबतीत वेगळीच मते आहेत. चाणक्य नीती जगभरात प्रसिद्द आहे. चाणक्यांच्या मते आपल्याला लोकांची मदत अवश्य केली पाहिजे. पण या ३ लोकांना चुकून सुद्धा मदत करू नये असे त्यांचे ठाम मत आहे.

१ ) अडचणीत असणारी स्त्री

स्त्रीला अडचणीत पाहून मदत करणे हे स्वाभाविक आहे. पण चाणक्य यांच्या मते प्रत्येक स्त्री मदतीच्या पात्र नसते. यांच्या मते ज्या स्त्रिया स्वतःच्या चुकांमुळे अडचणीत सापडतात , ज्या स्त्रियांची कर्मच वाईट आहेत अशा स्त्रीची मदत करणे व्यर्थ आहे.

चाणक्य सांगतात कि जर तुम्ही अशा स्त्रीची मदत करायला गेलात तर तुम्ही स्वतः कुठल्यातरी अडचणीत सापडाल. त्या स्त्रीचा स्वभाव आणि कर्मच तिच्या समस्येचे कारण आहे. अशांपासून दोन हात लांबच राहा आणि तिला कधीच मदत करू नका.

उदास व्यक्ती

मित्रांनो आचार्य चाणक्य यांच्या मते उदास होणे एक स्वभावातील भाग आहे. परिस्थिती वाईट असेल तर बऱ्याचदा व्यक्ती उदास राहतो. पण असे लोक जे नेहमीच उदासपणे जीवन जगत असतात त्यांच्या पासून दूर राहणेच आपल्या हिताचे आहे.

तुम्ही अशा उदास व्यक्तींची मदत जरी केलीत तरी ते शेवटी उदासच राहतात. यांचं कामच उदास राहणं असत. तुम्ही कितीही प्रयन्त करा विनाकारण उदास राहणाऱ्या लोकांना तुम्ही कधीच सुख देऊ शकणार नाही.

मूर्ख व्यक्ती

आचार्य चाणक्य यांच्या मते मूर्ख व्यक्तीला मदत करणारा व्यक्ती सुद्धा मूर्खच असतो. तुम्ही एखाद वेळी त्या व्यक्तीची मदत कराल सुद्धा , कदाचित दोन वेळा मदत कराल. पण शेवटी त्या व्यक्तीला तुम्ही अधू बनवत आहात.

प्रयत्न न करता मदत मागणाऱ्या मूर्ख व्यक्तींना तुम्ही मदत करत गेलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील मूल्यवान वेळ वाया घालवत आहात. या व्यक्तींना मार्ग दाखवणे म्हणजे मूर्ख पणाचे लक्षण आहे.अशा व्यक्ती स्वतःच्या मूर्खतेमुळे शेवटी सर्व काम बिघडून टाकतात.

तर मित्रांनो या होत्या ३ प्रकारच्या व्यक्ती ज्यांची मदत आपण कधीच केली नाही पाहिजे. जर तुम्ही यांची मदत करताय तर तुमची मदत व्यर्थ आहे असे समजून जा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here