मित्रांनो ज्योतिषशास्त्रांनुसार कोणत्याही ग्रहाचे राशीपरिवर्तन हे अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. कारण याचा प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडत असतो. वैशाख कृष्ण पक्ष पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दिनांक 3 जून रोज गुरुवार.
ग्रहांचे राजकुमार बुध हे राशीपरिवर्तन करणार असून ते मेष राशीतून वृषभ राशीत गोचर करणार आहेत. मित्रांनो बुधाचा प्रभाव व्यक्तीच्या बुद्धी आणि वाणीवर पडत असतो.
बुधाच्या वृषभ राशीत होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा संपूर्ण 12 राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून काही राशीसाठी हे राशीपरिवर्तन अशुभ ठरणार असले तरी या सहा राशींसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे.
आता आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होणार असून अचानक धनलाभाचे योग आहेत. मागील अनेक दिवसांपासून आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येतील. उद्योग व्यापारातुन आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.
आपल्या बुद्धिमत्तेला साकारात्मकतेची जोड प्राप्त होणार असून वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. स्वतःच्या वाणीद्वारे इतरांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरणार आहात. याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रात दिसून येईल.
व्यवसायाला गती प्राप्त होणार असून आथिर्क प्राप्तीचे मार्ग आता मोकळे होणार आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
मेष रास
बुधाचे वृषभ राशीत होणारे हे राशीपरिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. नोकरी आणि उद्योग व्यवसायात प्रगतीचे योग जुळून येत आहेत. आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक काम यशस्वी ठरू शकते.
कोणतेही नवीन काम सुरु करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. या काळात नशिबाची साथ प्राप्त होत असल्यामुळे प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.
वृषभ रास
बुधाचे वृषभ राशीत होणारे हे राशीपरिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. आपल्या बौद्धिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून येणार असून वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. या काळात अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात.
सोबतच खर्चाचे प्रमाण देखील वाढू शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. उद्योग , व्यापार आणि व्यवसायातून आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
मिथुन रास
बुधाचे गोचर आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. आपण करत असलेल्या कष्टाला फळं प्राप्त होणार असून एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने व्यवसायाला गती प्राप्त होणार आहे. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग जमून येत आहे.
या काळात आपल्या मानसन्मानामध्ये मोठी वाढ होणार आहे. मनाप्रमाणे कामे होत असल्यामुळे आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. करियर मध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.
वृश्चिक रास
तुमच्यासाठी काळ अतिशय अनुकूल बनत आहे. बुधाचे होणारे हे गोचर आपल्या जीवनात सुख समृद्धीची बहार घेऊन येणारे ठरणार आहे. या काळात अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. एखाद्या नवीन क्षेत्रात पदार्पण करण्याचे योग आहेत.
कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार असून मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. नोकरी मध्ये बदल घडून येऊ शकतो. करियर विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.
धनु रास
हे गोचर तुमच्यासाठी विशेष लाभकारी ठरणार असून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार असून वाणी मध्ये मधुरता निर्माण होणार आहे.
या काळात नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार आहे.
कुंभ रास
कुंभ राशीसाठी हे गोचर विशेष लाभकारी ठरणार आहे. करियर अथवा कार्यक्षेत्रामध्ये एखादी अनुकूल घटना घडून येऊ शकते. नोकरी मध्ये अधिकारी वर्ग आपले कौतुक करतील.
प्रेमजीवन या काळात अतिशय सुखकर बनेल. स्वतःच्या बुद्धीचा योग्य वापर करून प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करणार आहात. करियर आणि कार्यक्षेत्रात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.