नमस्कार मित्रानो
ज्योतिषशास्त्रानुसार 26 ऑगस्ट 2021 रोजी, गुरुवारी, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. 22 सप्टेंबर 2021 पर्यंत बुध कन्या राशीत राहील. त्यानंतर तूळ राशीत बुध ग्रह गोचर करतील. बुध ग्रह हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे आणि म्हणूनच त्याला राजपुत्राचा दर्जा आहे.
मित्रानो ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रह शुभ स्थितीत असेल, अशा लोकांना बुद्धिमत्तेत विकास, बोलण्यात गोडवा आणि संभाषण क्षमता वाढलेली दिसू येते. याउलट ज्या लोकांचा बुध त्यांच्या कुंडलीत शुभ स्थितीत नसतो त्यांना वाणी, बुद्धी आणि संवादात काही समस्यांना तोंड द्यावे लागते.
याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट अशीही आहे की बुध ग्रह हा गणित, संशोधन, तर्कशास्त्र, व्यवसाय आणि शिक्षण यावरही राज्य करतो, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी बुधाचे राशी परिवर्तन अत्यंत महत्वाचे मानले जाते. बुध हा वाणीचा घटक मानला जातो, त्यामुळे तुमच्या वाणीवर परिणाम होऊ शकतो.
वृषभ रास
आपली रणनीती प्रभावी सिद्ध होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थी आणि स्पर्धेत बसलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. प्रेमसंबंधात तीव्रता असेल. जर तुम्हाला प्रेम विवाह करायचा असेल तर प्रसंग अनुकूल ठरेल. मुलांशी संबंधित चिंतांपासून तुम्हाला आराम मिळेल. नवीन जोडप्याला पुत्र सुख प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
कर्क रास
बुधाचे कन्या राशीत होणारे गोचर तुमच्यात धैर्य आणि पराक्रम वाढवेल. भावांमध्ये परस्पर सहकार्य देखील वाढेल. अध्यात्मात रस वाढेल. परदेशी कंपन्यांमध्ये सेवा किंवा नागरिकत्वासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. जर तुम्ही तुमच्या योजना आणि रणनीती गोपनीय ठेवून काम केले तर तुम्ही अधिक यशस्वी व्हाल. विद्यार्थी आणि स्पर्धेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.
सिंह रास
तुमची आर्थिक बाजू मजबूत बनेल. अचानक पैसे मिळण्याची संधी मिळेल. रोजगाराच्या दिशेने केलेले सर्व प्रयत्न फलदायी ठरतील. इतरांना दिलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सामंजस्य वाढेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित बाबींचा निकाल लागेल. आपल्या भाषण कौशल्याच्या मदतीने कठीण परिस्थितींवर सहज नियंत्रण ठेवू शकाल. व्यवहारात अधिक सावधगिरी बाळगा.
वृश्चिक रास
उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण होतील. तुम्ही सुरू केलेली कोणतीही योजना प्रभावी ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि थोरल्या भावांचे सहकार्य मिळेल. उच्च नेतृत्वाशी संबंधही वाढतील. या कालावधीच्या मध्यभागी, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन करार करायचा असेल तर संधी अनुकूल आहे. सरकारी नोकरी लागावी म्हणून इच्छुकांना चांगला काळ आहे.
धनु रास
नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर निकाल तुमच्या बाजूने असेल. तसेच घर किंवा वाहन खरेदीचे योग जुळून येत आहेत. परदेशातील मित्र आणि नातेवाईकांकडून नफा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला व्हिसा इत्यादीसाठी अर्ज करायचा असेल तर संधी अनुकूल आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.