22 सप्टेंबर रोजी बुध करणार तूळ राशीत गोचर..या 6 राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार

0
434

नमस्कार मित्रानो

मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक परिवर्तन घडवून आणत असते. ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात प्रगती घडवून आणत असतो. जेव्हा ग्रह दशा अनुकूल बनते तेव्हा नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही.

ज्योतिषशास्त्रानुसार दिनांक २२ सप्टेंबर पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या ६ राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. ग्रहनक्षत्र सकारात्मक बनल्यामुळे आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस येणार आहेत. आता इथून पुढे नशीब सकारात्मक कलाटणी घेईल.

आपल्या जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक अडचणी आता समाप्त होणार आहे. मित्रानो दिनांक २२ सप्टेंबर रोजी ग्रहांचे राजकुमार बुध हे राशी परिवर्तन करणार आहेत.

भाद्रपद कृष्ण पक्ष रेवती नक्षत्र दिनांक २२ सप्टेंबर रोज गुरुवार ग्रहांचे राजकुमार बुध हे कन्या राशीतून निघून तूळ राशीत गोचर करणार आहेत. तूळ राशीत या आधीच शुक्र विराजमान आहेत त्यामुळे बुध आणि शुक्राचे एकाच राशीत असणे हा संयोग अतिशय शुभ बनत आहे.

उद्योग , व्यापार , करियर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. बुध हे उद्योग , व्यापार , करियर , बुद्धी , वाणी , गणित , कला या गोष्टींचे कारक ग्रह मानले जातात. या काळात बुधाचे तूळ राशीत होणारे गोचर या ६ राशींसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात आता अनेक शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार असून व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये आनंददायक घडामोडी घडून येतील. या काळात आपल्या बौद्धिक क्षमतेचा विकास घडून येणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष रास

बुधाचे तुला राशीत होणारे गोचर मेष राशीसाठी लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. बुध आपल्या सप्तम भावामध्ये गोचर करत आहेत. उद्योग , व्यवसाय आणि व्यापारामध्ये अतिशय शुभ परिणाम आपल्याला दिसून येतील. या काळात व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे.

करियर मध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होणार असून कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. आपल्या कार्य कुशलतेमध्ये सुधारणा घडून येणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे.

मिथुन रास

बुधाचे हे राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. बुध आपल्या राशीच्या पंचम भावामध्ये गोचर करत आहेत. करियरच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात निश्चित केलेले ध्येय प्राप्त होण्याचे योग बनत आहेत.

नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी काळ उत्तम ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी सुखाचे दिवस येतील. या काळात आपल्या मानसन्मान आणि पद्प्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा जास्त सुधारणा घडून येईल. सांसारिक सुखात वाढ दिसून येईल.

कन्या रास

बुधाचे तूळ राशीत होणारे राशांतर कन्या राशीचा भाग्योदय घडून आणण्याचे संकेत आहेत. बुध आपल्या राशीचे स्वामी मानले जातात त्यामुळे या काळात बुध आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहेत. बुध हे आपल्या राशीच्या द्वितीय भावामध्ये गोचर करत असून या काळात आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार असून अतिशय शुभ फलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. व्यापारात भरपूर लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. साहित्य , कला , पत्रकारिता या क्षेत्रातील लोकांना हे गोचर विशेष लाभकारी ठरणार आहे.

तूळ रास

आपल्या राशीत होणारे बुधाचे गोचर आपला भाग्योदय घडवून आणू शकते. कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल.

प्रेमी युगलांच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. आपल्या कार्यकौशल्यामध्ये वाढ होणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतूक होईल. समाजात मानसन्मानात वाढ होईल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता.

मकर रास

बुधाचे हे राशी परिवर्तन मकर राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. करियरच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. करियर मध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील. सरकार दरबारी अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत.

अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या योजना या काळात पूर्ण होतील. जीवनाला सुंदर आणि समृद्ध बनवण्यासाठी केलेले प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील. पती पत्नी मधील प्रेमात वाढ होणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत.

मीन रास

बुधाचे कन्या राशीत होणारे गोचर मीन राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात करियर आणि कार्यक्षेत्रात अनेक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसाय अथवा व्यापाराच्या दृष्टीने एखादी मोठी खुश खबर कानावर येऊ शकते. नोकरीत बढतीचे योग येणार आहेत.

या काळात आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ दिसून येईल. आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. आपल्या कमाई मध्ये वाढ होईल. बुधाच्या कृपेने येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here