नमस्कार मित्रांनो,
लोक शहरातील असो वा खेडेगावातील बहुतेक लोक पायामध्ये आणि हातामध्ये काळा धागा बांधणे पसंद करतात. थोडक्यातच सांगायचं तर काळा धागा पायांत बांधने हि एक फॅशनच झाली आहे.
मित्रांनो बऱ्याचदा माहिती नसल्याने याचे नुकसान आपल्याला सोसावे लागते. काळा धागा बांधल्यानंतर असे काही घडू लागते कि त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू लागतो.
मित्रानो धार्मिक मान्यतेनुसार काळा धागा वाईट शक्ती, दृष्ट लागण्यापासून आपले सरंक्षण करतो. पण काही राशींच्या व्यक्तींना याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला याच राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी काळा धागा चुकूनही घालू नये.
धागा घातल्याने त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या येउ शकतात. जी कामे होणारी असतील ती कामे होणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी ज्यांनी काळा धागा चुकूनही बांधू नये.
मेष रास
ज्योतिषशास्त्रा नुसार मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. आणि मंगळ देवाला काळ्या वस्तू, पदार्थ अजिबात आवडत नाही. जर मेष राशीच्या व्यक्तींनी काळा धागा घातला तर मंगळाचा शुभ प्रभाव नष्ट होऊन परिणामी मेष राशीच्या व्यक्तींना अनेक संकटांना सामोरे जावे लागते.
त्यांच्या जीवनात सुख शांतीची कमतरता येऊ शकते. त्यामुळे हे लोक जीवनात असफल होऊ शकतात. आणि म्हणून मेष राशीच्या व्यक्तींनी चुकून सुद्धा पायात किंवा हातात काळा धागा बांधू नये.या राशीच्या लोकांसाठी लाल रंगाचा धागा शुभ मानला जातो.
वृश्चिक रास
या राशीचा स्वामी सुद्धा मंगळ आहे. या राशीच्या व्यक्तींवर मंगळाचा शुभ प्रभाव नेहमीच असतो. म्हणून या राशीच्या व्यक्तींनी काळा धागा घालू नये. मंगळ देव काळा धागा घातला तर नाराज होऊ शकतात.
परिणामी मंगळाचा शुभ प्रभाव समाप्त होऊन अशुभ घटना घडू लागतील. या राशीच्या लोकांनी लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घालणे शुभ मानले जाते.
मित्रांनो या होत्या त्या 2 राशी ज्यांनी काळा धागा चुकूनही हि परिधान करू नये. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा.
अशाच राशींविषयी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.