या दिशेला चुकूनही तोंड करून झोपू नका… होऊ शकतो अकाली मृत्यू…

0
653

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो वास्तू शास्त्र असं मानतं की आपल्या झोपण्याच्या स्थितीचा आपल्या दिन चर्येवर आणि आपल्या मनस्थिती वर खूप परिणाम होतो.

रात्री जर तुम्हाला झोप येत नसेल, रात्री खूप प्रयत्न करून सुद्धा तुम्ही मध्यरात्री पर्यंत जागे राहत असाल, तर आपली झोपण्याची स्थिती चुकीची आहे असा त्याचा अर्थ मानावा.

मित्रांनो अनेक जण उत्तर दिशेला डोकं आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपतात. अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या हे अत्यंत चुकीचं आहे.

प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथानुसार दक्षिण दिशेला यमाचे स्थान मानण्यात येते. त्यामुळे दक्षिणेकडे पाय करून झोपणे हे यमलोकी जाण्याचे प्रतीक असते.

वैज्ञानिक दृष्ट्या उत्तर ध्रुवा कडून दक्षिण ध्रुवा कडे चुंबकीय शक्ती वाहत असते. उत्तरेस डोकं करून झोपल्याने ती चुंबकीय किरणे आपल्या डोक्यात प्रवेश करून आपल्या बरोबर आपल्या शरीरात असलेली सर्व शक्ती वाहून घेऊन जातात.

आणि या कारणामुळेच आपल्याला रात्री नीट झोप लागत नाही. रात्री झोप न झाल्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी चिडचिड होते.

मित्रांनो रात्री झोप न झाल्यामुळे हाय बीपी, लो बीपी यांसारख्या शारीरिक तक्रारी सुद्धा होतात.

झोपण्यासाठी दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेला पाय ही सर्वाधिक चांगली स्थिती वास्तू शास्त्राने मानली जाते. उत्तरेला पाय करून झोपणे म्हणजे धन संपत्ती ची देवता कुबेर यांना शरण जाणे होय.

ज्या व्यक्ती दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय करून झोपतात अशा लोकांवर माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांची नेहमी कृपा राहते.

उत्तरेला पाय करून झोपल्याने आपल्या शरीरात असलेली ऊर्जा आपल्या शरीरातच साठवली जाते हे शास्त्रीय कारणाने सुद्धा सिद्ध झालेले आहे.

मित्रांनो पूर्वेला डोकं करून झोपणे सुद्धा शुभ मानले जाते. पण पश्चिमेला कधीही डोकं करून झोपू नका. पश्चिमेला डोकं करून झोपल्याने घरात आजारपण येतं आणि आपल्या मुलाबाळांना अनेक संकटांना सामोरं जावं लागू शकतं.

आपल्या घरातील बेडरूम बांधताना ती कधीही आग्नेय किंवा ईशान्य दिशेला बांधू नका. वास्तू शास्त्र असं मानते की आग्नेय आणि ईशान्य दिशेला बांधलेली बेडरूम पती पत्नी मध्ये टोकाचे मतभेद निर्माण करते. त्यामुळे कधी कधी घट स्पो ट पर्यंत वेळ येऊ शकते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here