नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो घरी कासव ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. हिंदू धर्मातील ग्रंथानुसार जिथे कासव असतं तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटलं जातं. हे कासव आपल्या घरात आणि ऑ फिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवले जाते. परंतू त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेत ठेवलेले असेल. नाहीतर त्याचा उलट असा अशुभ परिणाम होऊ शकतो. मग त्याने घराची अधोगती होऊ शकते.
मित्रांनो कासव घरी ठेवल्याने धन प्राप्ती होते. घरी कासव ठेवल्याने धनासंबंधीच्या समस्या दूर होतात. पण या साठी क्रि स्ट ल कासव सर्वात उत्तम मानले गेले आहे. तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घायु प्राप्त होते आणि आजा रापासून देखील मुक्ती मिळते. तुम्ही कासवाची प्रतिमा, चित्र देखील उत्तर दिशेला लावू शकता.
मित्रांनो कासव हे दीर्घायु असते, कासवाकडून बरेच गुण घेण्यासारखे असतात, तसेच समुद्र मंथनावेळी कासव देखील देवतांसोबत होते म्हणूनच कासव प्रत्येक मंदिरात पूजनीय आहे. क्रि स्ट ल कासव हे घरात उत्तर दिशेला ठेवले जाते. तसे तर सर्व प्रकारचे कासव उत्तरेला मुख करून ठेवल्याने जीवनात उत्तरोतर प्रगती होते.
कासव चुकूनही बेड रूम मध्ये ठेवू नका, हॉल मध्ये किंवा किचन मध्ये उत्तरेला मुख करून ठेवा. काहीजण धातूचे कासव वापरतात, चांदी, कांस्य, पितळ यांचेही कासव शुभ मानले जाते. तसेच कासवाच्या पोटाखाली जर मंत्र असेल तर ते अतिशय शुभ असते. कासव घरी स्थापन करताना चांगली तिथी, मुहूर्त पहावा, कासव घरी आणायचा असेल तर बुधवार, शुक्रवार या दिवशी आणावे. इतर कोणत्याही शुभ मुहूर्तावर आणले तरी चालते.
मित्रांनो कासव घरी आणल्या नंतर शुद्ध जलाने स्वछ धुवावे व त्यासाठी एक पात्रदेखील अवश्य असावे. तसेच त्याला अभिषेक घालून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. अभिषेक करून नंतर पूजा करून अक्षता आणि फुल वहा व पात्रात पाणी घालून कासवाची स्थापना करावी व त्यानंतर हे कासव उत्तर दिशेला मुख करून ठेवा.
जर क्रि स्ट ल कासव असेल तर ते तसेच उत्तरेकडे ठेवावे, जर कासव धातूचे असेल तर ते पात्रात शुद्ध जल भरून ठेवा. हे जल वरचेवर बदलत रहा. घरी सुख, शांती, समाधान हवे असेल तर घरी कासव अवश्य असावे, कासव व त्याच्या पाठीवर पिल्लं असणारे कासव देखील घरात भरभराटीचे प्रतीक मानले जाते. तसेच कासव फक्त घरीच वापरायचे नसून तुमच्या व्यवसायात, ऑफिस मध्ये सुद्धा वापरू शकता. त्यामुळे व्यवसायात सुरुवातीला संथगतीने व नंतर जोमाने प्रगती होते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.