नमस्कार मित्रांनो,
ओम नमः शिवाय. मित्रांनो आपल्या पैकी अनेक जण भगवान भोलेनाथांचे भक्त असतील. आपण भगवान भोले नाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय, व्रत करत असतो.
भगवान भोले नाथांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्यांच्या शिवलिंगावर बेलाचे पान वाहने. आपण जेव्हा बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा भगवान शिव शंकर आपल्यावर प्रसन्न होतात.
मित्रांनो असं म्हटलं जातं की बेलाची पाने भोले नाथांचे मस्तिष्क शीतल ठेवतात. त्यामुळे शिवलिंगावर बेल पत्र अर्पण केल्याने आपल्याला भगवान भोले नाथांचा आशीर्वाद आपल्याला नक्की मिळतो.
पण मित्रांनो बेल पत्र झाडावरून तोडताना आणि शिवलिंगावर अर्पण करताना आपण काही नियमांचे जरूर पालन केलं पाहिजे.
हिंदू धर्मात धर्म पालन करतानाच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या निसर्गाचे रक्षण कसं होईल याची सुद्धा काळजी घेतलेली आपल्याला दिसून येते.
आपण देवी देवतांना जी पाने, फुले अर्पण करतो ती अर्पण करण्या संबंधी काही नियम बनवले गेलेले आहेत.
मित्रांनो आज आपण भगवान भोले नाथांना प्रिय असणाऱ्या बेलाच्या पानांना तोडताना आणि त्यांना शिवलिंगावर अर्पण करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेणार आहोत.
पहिली गोष्ट म्हणजे चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या या ज्या तिथी आहेत, त्याच बरोबर संक्रांती आणि सोमवार या दिवशी आपण चुकूनही बेल पत्र तोडू नयेत.
या दिवसांच्या आदल्या दिवशी आपण बेलपत्र तोडू शकता आणि दुसऱ्या दिवशी महादेवांना अर्पण करू शकता.
तुम्हाला माहिती आहे की बेलपत्र हे भगवान शिव शंकर यांना अतिशय प्रिय आहेत. पण वर सांगितलेल्या तिथींना चुकूनही तुम्ही बेल पत्र तोडू नका.
मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या बेलाची पाने कधीही शिळी होत नसतात. ही पाने आपण महादेवांना कधीही तोडलेली असतील तरी स्वच्छ पाण्याने धुवून अर्पण करू शकता.
मित्रांनो शास्त्रात असं सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला बेल पत्र मिळाले नाही तर दुसऱ्या व्यक्तीने वाहिलेले बेलपत्र तुम्ही पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा अर्पण करू शकता.
स्कंदपुराणात असा उल्लेखित आहे की अर्पिता नेपी बिल्वानी प्रक्षाल्यापी पुनः पुनः शंकरार्पनी न नवानी यदी क्वचितः
मित्रांनो याचा अर्थ असा आहे की, बेलाची पाने तुम्ही स्वच्छ करून पुन्हा पुन्हा वापरू शकता.
दुसरी गोष्ट अशी की बरेच जण पाने तोडताना बेलाच्या फांद्या तोडून आणतात. हे अत्यंत चुकीचं आहे. बेलपत्र तोडताना बेलाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी.
त्याच बरोबर बेलाची पाने तोडताना केवळ पाने तोडावीत. त्याच्या फांद्या तोडू नयेत. पाने तोडताना झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
मित्रांनो ही पाने तोडण्यापूर्वी आणि तोडून झाल्यानंतर बेलाच्या झाडाला हात जोडून मनोमन प्रणाम करावा. मनातल्या मनात बेलाच्या झाडाचे आभार मानावेत.
आता आपण जाणून घेऊया की पाने तोडल्यानंतर ती शिवलिंगावर कशा प्रकारे अर्पण करावीत.
मित्रांनो बेलपत्र महादेवांना अर्पण करताना ती नेहमी उलटी अर्पण केली जातात. पानाचा वरचा जो भाग असतो तो उलटा करून आपण महादेवांना अर्पण करायचे.
बेलपत्र हे 3 पानांपासून ते 11 पाने असलेलं असू शकतं. बेलाला जेवढी जास्त पानं असतील तेवढं ते बेलपत्र जास्त उत्तम मानले जाते.
त्यामुळे जास्त पाने असलेलं बेलपत्र तुम्हाला मिळालं तर ते सौभाग्याचं लक्षण मानून ते महादेवांना नक्की अर्पण करा.
तुम्हाला काही कारणामुळे बेलपत्र मिळालं नाही तर तुम्ही चांदीचे बेलपत्र सुद्धा वापरू शकता.
बऱ्याच भागात बेलाचे झाड मिळणे मुश्कील असतं. त्या ठिकाणी आपण चांदीचे बेलपत्र वापरू शकतो.
अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याने वाहिलेले बेलपत्र असेल त्याला नावे ठेऊ नका. जर असं केलं तर भगवान शंकर आपल्यावर अप्रसन्न होऊ शकतात.
मित्रांनो बेलपत्र तोडण्याचे आणि अर्पण करण्याचे हे काही शास्त्रोक्त नियम होते. यांचं जरूर पालन करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.