नमस्कार मित्रानो,
मित्रानो आपल्या दैनंदिन जीवनात आपण नित्य नियमाने काही गोष्टी करीत असतो. तो जसा काही आपल्या जीवनाचा एक भागच बनलेला असतो. आपल्या ऋषी मुनींनी, पूर्वजांनी आपल्याला दैनंदिन जीवनात वर्तन करताना कसे वागावे, काय करावे, काय करू नये, कोणत्या वेळी कोणते कार्य करावे हे विविध धर्मग्रंथांमधून, त्यांच्या शिकवणीतून आणि वागणुकीतून आपल्याला सांगून ठेवले आहे.
या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य, साध्या, सोप्या वाटतात. परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे. आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही.सर्वजण करतात ना मग आपण देखील करायचे अशा पद्धतीने आपले जीवन सुरु असते.
या बाबींचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या पूर्वजांनी, साधू संतांनी आपल्यावर जे संस्कार केले आहेत, दैनंदिन वागणुकी संदर्भात ज्या बाबी सांगितल्या आहेत, ज्या काही सवयी आपल्याला लावल्या आहेत त्या सर्व आपल्यासाठी आपल्या जीवनासाठी खूपच लाभदायक आहेत.
त्यातील एक सवय म्हणजे स्नान करणे. स्नान करणे हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. स्नान केल्याने आपले शरीर तर स्वच्छ होतेच त्याबरोबरच आपले मनही प्रसन्न होते. स्नान करण्याचे आपल्याला खूपच फायदे होतात हे तर आपण जाणतोच.शास्त्रानुसार स्नान करणे हे एक उत्तम आणि महत्त्वाचे कार्य आहे.
परंतु आपल्याला हे माहित आहे का, की स्ना न करण्यासाठीची एक विशिष्ट वेळ आणि विशिष्ट पद्धत असते. आपल्याला हे माहीत नसते आणि आपण आपल्या मनात येईल व आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी आपण स्नान करतो. परंतु आपली ही सवय खूप चुकीची आहे. कधीही व कोणत्याही वेळी स्नान केल्याने त्याचा आपल्याला फायदा तर होत नाहीच उलट नुकसानच होते.
आपला धर्मग्रंथ गरुड पुराणात आपल्या जीवनाशी संबंधित सर्व लहान मोठ्या बाबींचा उल्लेख केलेला आहे. जन्मापासून ते मृत्यू पर्यंत प्रत्येक गोष्टींचे त्यांत सविस्तर वर्णन आलेले आहे. जीवन, मृत्यू व स्वर्ग नरका बरोबरच धर्म, व्यवहारिक ज्ञान, संस्कार, वर्तणूक, सवयी या सर्वांबद्दल खूप महत्त्वपूर्ण माहिती त्यात आलेली आहे.
आज आपण हेच जाणून घेणार आहोत कि स्नान करण्याची योग्य वेळ कोणती? स्नानाचे किती प्रकार आहेत? कोणत्या वेळी स्नान करण्याचे काय फायदे व तोटे आहेत. सर्वात आधी जाणून घेऊया स्नानाचे कोण कोणते प्रकार आहेत.
स्नानाचे पाच प्रकार आहेत. शास्त्रानुसार ब्रम्ह स्नान, देव स्नान, ऋषी स्नान, मानव स्नान व दानव स्नान असे स्नानाचे पाच प्रकार पडतात. या सर्व प्रकारांनी त्यांच्या वेळेनुसार वर्गवारी केलेली आहे.
गरुड पुराणानुसार ब्रम्ह मुहूर्तावर केले जाणारे स्नान हे सर्वश्रेष्ठ स्नान मानले गेले आहे. ब्रम्ह मुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर होय आणि सूर्योदयापूर्वीचा दीड ते दोन तास आधीचा काळ. म्हणजेच पहाटे तीन ते चार ची वेळ ही दिवसातील सर्वात शुभ वेळ असते.
यावेळी वातावरणात खूप शुभ, सकारात्मक व पवित्र अशी ऊर्जा पसरलेली असते. कारण ही वेळ भगवंतांची वेळ असते. म्हणून यावेळी भगवंताचे नामस्मरण करता करता केल्या जाणाऱ्या स्नानाला सर्वश्रेष्ठ ब्रम्हस्नान म्हटले जाते.
या वेळी स्नान करून लगेच सूर्यदेवाला अर्घ दिल्यास आपल्याला जीवनात सुख समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते. दिवसभर आपले शरीर व मन सकारात्मक ऊर्जेने भरलेले, उत्साही व प्रसन्न राहते.
स्नानाचा दुसरा प्रकार म्हणजे देव स्नान. सकाळी चार ते पाच दरम्यान जे स्नान केले जाते, त्या स्नानाला देवस्नान म्हटले जाते. सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करता करता केल्या जाणाऱ्या या स्नानाला ही खूपसं श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे.
या वेळी स्नान केल्यास आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपल्या शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता तसेच अस्वच्छता निघून जाते. अशा प्रकारे देव स्नान केल्यास आपल्या शरीराबरोबरच मनही प्रसन्न होते.
तिसरे स्नान म्हणजे ऋषी स्नान. ज्यावेळी सकाळी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी आकाशात चांदण्या दिसत असतात अश्यावेळी स्नान केले जाते त्या स्नानाला ऋषी स्नान म्हटले जाते. हे स्नान देखील खूप श्रेष्ठ स्नान मानले जाते. या वेळी स्नान केल्यास आपल्याला मानसिक शांतता मिळते.
चौथे स्नान म्हणजे मानव स्नान. सकाळी सहा ते आठच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला मानव स्नान म्हटले जाते. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदय झाल्यानंतर लगेचच केले जाते. या स्नानाला ही शुभ स्नान मानले गेले आहे. या स्नानामुळे आपल्या शरीरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारते. ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यात उत्साह येतो.
पाचवे स्नान म्हणजे दानव स्नान. सकाळी आठ नंतर जे स्नान केले जाते त्या स्नानाला आपल्या शास्त्रात खूप चुकीचे मानले गेले आहे. यावेळी वातावरणात पसरलेली दैवी शक्ती खूप कमी झालेली असते. म्हणून या वेळी स्नान केल्यास आपल्या मध्ये उत्साह व प्रसन्नता राहत नाही. ज्यामुळे आपल्याला दिवसभर आळशी व कंटाळवाणे वाटत राहते.
शरीरात आळशीपणा जाणवतो व म्हणूनच कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. म्हणून सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करू नये. ज्या स्त्रिया आठ नंतर स्नान करतात त्यांच्या जीवनात नेहमी दुर्भाग्य राहते. अश्या स्त्रियांच्या घरातून सुख समृद्धी ही निघून जाते. काही व्यक्ती दुपारी बारा नंतर स्नान करतात. हे स्नान तर खूपच अशुभ स्नान असते.
ज्या व्यक्ती दुपारी बारा वाजल्यानंतर स्नान करतात त्यांच्या मनात दिवसभर राग, लोभ, क्रोध, द्वेष, नकारात्मकता, अशक्तपणा व चिडचिडपणा वाढतो. ज्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यात अडथळे येत राहतात.
गरुडपुराणात आपल्याला दररोज ब्रह्म स्नान, देव स्नान, ऋषी स्नान किंवा निदान मनुष्य स्नान तरी करावे असे सांगितलेले आहे. दररोज या पवित्र वेळी उठून स्नान करून भगवंताचे पूर्ण श्रद्धेने पूजन, ध्यान, नामस्मरण केल्यास तसेच सुर्यदेवांना अर्घ्य दिल्यास आपल्या शरीरा बरोबरच मनही शुद्ध व पवित्र होते.
दरवेळी स्नान करताना गंगे! च यमुने! चैव गोदावरी! सरस्वति! नर्मदे! सिंधु! कावेरि! जलेSस्मिन् सन्निधिं कुरु।। या मंत्राचा जप करावा. अशा प्रकारे या सप्त नद्यांचे ध्यान करता करता स्नान केल्यास सर्व प्रकारची नकारात्मकता, रोग, दोष सर्व काही नष्ट होतात. आणि आपण जीवनात सुखी व समृद्ध होतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.