नमस्कार मित्रांनो,
अठरा गं तऱ्हचा एक आ जार मनुष्याला व्हईल, डॉक्टर लोक हात टेकतील, आजाराला औषध गा मिळणार न्हाई, आड चुकलं खरं खेडं चुकणार न्हाई.
ऐका बाळांनो ऐका तान्ह्यांनो ऐका, राजकारणात मोठा गोंधळ व्हईल. देशाच्या राजकारणात मोठा विघोड लागंल. काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झांजवात लागलं. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात जाऊन कोलांट्या उड्या मारत्याल.
राजकीय नेते खुर्चीसाठी भांडून खेळत्याल, राजकीय नेते सत्ता संपत्तीच्या मागं गा लागत्याल. ला च गा लु चपत, भ्रष्टाचाराला देशात उत गं येईल. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ व्हईल.
देशामध्ये मोठं मोठं घोटाळ उघडकीस येत्याल. राजकारणात लोकं देव धर्माला विसरून गा जात्याल. जाती धर्माचं लोकं भांडून खेळत्याल. सीमाभागात राजकारण ढवळून जाईल. निपाणी भागात बाळांनो मोठा गोंधळ व्हईल.
येतील येतील बाळांनो अति रेकी लोक येत्याल, घोटाळा करत्याल. व्हईल व्हईल बाळांनो यु द्ध व्हईल, बॉ म्ब स्फो ट होत्याल.
शहराला लागून असलेली शहरं उध्व स्त होत्याल, चौथाई कोना वसाड पडंल. दिल्लीच्या बा गादीला मोठा धक्का बसलं, आतंर राष्ट्रीय दहश तवादी संघटनेच्या गुंडांची गा ह त्या व्हईल. स्म गलर लोकांची मोठी ह त्या व्हईल.
येइल येइल गा बाळांनो का पा का पी, गपगाचेपी. वाहतील वाहतील गा र क्ता पाट वाहत्याल. माणसाला माणूस बाळांनो खाऊन टाकंल. सांभाळून रहा.
दागिने, पैसे मनुष्याला घातक व्हत्याल. दिवसाढवळ्या खू न, डा कू, दरो डे पडत्याल. सोने या नाणे बाळांनो फुकाचे व्हत्याल. काही गा दिवसाने सोन्या चांदीचे दर वाढत जात्याल.
येत्याल येत्याल बाळांनो लाकडाची डोरली (मंगळसूत्र) येत्याल. लाकूड लाकूड बाळांनो सोन्याचं व्हईल. ताजव्यातुन विकंल.
रेल्वे मोटार यांचे मोठे अपघा त होत्याल. कानाने ऐकाल बाळांनो, डोळ्याने बघणार नाहीसा.
कोल्हापूरच्या देवीला बाळांनो मोठं संकट पडंल. रात्री 12 च्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी पडतंया. परमेश्वर त्याचा न्याय निवाडा करत बसलाय. इंद्र सभेच्या देवाला मोठं संकट पडलया.
कलियुगाच्या मधला मलखांब डळमळू लागलाय. धरित्री मातव मोठं पाप झालया. भावाला बाळांनो बहीण ओळखना झालीया. सासऱ्याला बाळांनो सून ओळखना झालीया.
जगबा दुनियेत मोठं पाप झालंया. जगाच्या डोंगरा एवढं पाप बाळांनो, दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहीलंया. दोऱ्याच्या आधारे ह्यो डोंगर तरलाय विचार करावा.
जगात धर्म बुडून गेलाय, सत्य फा सावर गेलंय. धर्माचं पाडळ गंमत बघतंया. कर्माचं पाडळ बाळांनो खेळ करतयं. शिकलेले लोक भकेलेलं हायती.
नऊ गा वर्षाची मुलगी भरताल मागेल. कलियुगात बारा गा वर्षाची मुलगी आई होईल. कालियुगाचं वारं उपराट फिराय लागलंय. तरुण पिढी वाम मार्गाला लागलं.
बारा वर्षाचं बाळांनो बालपन खेळत राहील. चोवीस वर्षाचं तरुणपण गा काबाडकष्ट करील. पस्तीस वर्षाचं बाळांनो म्हातारपण येईल.
येईल येईल बाळांनो जगबुडी येईल. जगाच्या विना शाला बाळांनो प्रारंभ व्हईल. ऐका बाळांनो माझ्या, ऐका तान्ह्यांनो. बापा वाचून धडा नाही, गुरुवाचून विद्या नाही. वांग्याच्या झाडाला बाळांनो शिडी लावत्याल. 10 सेंटिमीटर कपडा घालणारा मनुष्य देशात जन्माला येईल.
एक गा रुपया गाडीचं चकार व्हईल. कोल्हापूरच्या गादीवर हिल्लाळ पेट त्याल. येईल येईल राज्य गुं डाचं येईल. ला च, लुच पत, भ्रष्टा चाराला देशात ऊत येईल. नोकर वर्ग बाळांनो समाज खाईल. सुटलं सुटलं महागाईचा भस्मासूर सूटलं.
सामान्य माणसाला धान्य धुन्य महाग गा मिळत्याल. जगणं मुश्कील व्हईल. साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील. एक गा औत चौघात व्हईल.
कोळंब्याच्या बाळांना माठा विचार पडलाया, बसव्याचं शिंगाट बाळांनो सोन्याचं व्हईल. बसव राजा बाळांनो पालखीतुन मिरवलं. कुळब्याच्या बाळांना माझा आशीर्वाद हाय.
शेतीयांन साठी देशात खू न पडत्याल. पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय नाही मिळणार. पंच लोकं दोन्हीकडे ला च खाऊन भांडणे लावत्याल. पैसा न खाणार मनुष्य तुम्हाला सापडणार नाही.
कागदाचा घोडा मनुष्याचं दात पाडील, खुळ लावील. कोकणातला बसव्या सरहद्दीवर, देशातला बसव्या सरहद्दीवर, सरहद्दीवर दोघांची टक्कर लागेल.
श्रावण महिन्यात गायत्री गंगेला जात्याल. उगवतं पेटंल, मावळती विझलं. देशाचा कोकण, कोकणचा देश होईल. माळाची नदी, नदीचा माळ व्हईल.
उन्हाळ्याचा बाळांनो पावसाळा, पावसाळ्याचा बाळांनो उन्हाळा व्हईल. मेघराजाचे तुम्ही वाट बघशीला. पडलं पडलं दुष्काळ पडलं. कर्माचा पाऊस बाळांनो, धर्माचं पीक व्हईल.
नदीगा बाईला कुलूप पडत्याल, नावयान बाई पाशी सतपना हाय. काळी कांडी बाळांनो पोटाशी धरावी, जतन करावी. पाडवा एकादशीला माझं भाषण चाललंया. तुम्ही चित्त बा देवावं. भाकणुकीचा चार शब्द, माणसाला चार शब्द शहाणपण देईल.
जंगलातला पशु पक्षी बाळांनो गावात येईल, गावातला मनुष्य जंगलात जाईल. मनुष्य वस्ती बाळांनो विरळ होईल. 12 कोसाला एक दिवा लागेल. 12 बाजार माडून एक बाजार व्हईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद पडत्याल.
समुद्रातील संपत्ती नाश पावेल. तुटतील अकस्मात तारे तुटत्याल. वादळ, भुई कंप याने जगाची उलथा पालथ व्हईल. पृथ्वीच्या पोटाला बाळांनो लोक भोकं पडत्याल. होईल होईल भुई कंप व्हईल. काळ्या खडक्याच्या बाळांनो लाटा उडत्याल.
डोंगर, पर्वत वाफेन जात्याल. कृष्णेच्या काठाला नऊ लाख हजार बांगड्या फुटत्याल. वीज बाईनं मोठं नुकसान व्हईल. सांभाळून रहा.
वागावं, वागावं बाळांनो सत्याने वागावं. वागूनी, वागूनी बाळांनो गर्वाने वागूनी. गर्वाने वागशीला पर फसून जाशीला. गर्वाचं घर बाळांनो खाली की गा हाया.
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठा गोंधळ व्हईल. शेषाच्या फडीवरी ही धरित्री माता हाय. धरित्री माता बाळांनो डळमळू लागलीया. उगवत्या सूर्याला बाळांनो संकटं पडलंया. पृथ्वीचा करार बाळांनो संपत आलाया.
कलियुग जाईल बाळांनो, सत्ययुग येईल. हिमालय पर्वतावर देव अवतार घेत्याल. मी मोठा, तू मोठा म्हणू नकोसा. मोठ्याचा लहान, लहानाचा मोठा होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.