सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटात हर्षाली मल्होत्रा लहान मुलीच्या भूमिकेत दिसली होती. हर्षाली या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली.
अतिशय सुंदर हर्षाली आणि सलमान खानची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाचा समावेश सलमान खानच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये होतो, तर हर्षाली मल्होत्राही मुन्नीच्या भूमिकेने प्रसिद्ध झाली होती.

फिल्म एवढी हिट गेली कि या फिल्म ने चक्क 900 करोड पेक्षा जास्त कमाई केली. मित्रांनो बजरंगी भाईजान मध्ये जी मुन्नी दाखवली आहे तिचे नाव आहे हर्षाली मल्होत्रा. हर्षालीचा जन्म 3 जून 2008 साली झाला असून आज तिचे वय 14 वर्ष आहे.
फिल्म रिलीज झाल्यापासून आज पर्यंत तिच्यात खूपच बदल झाले आहेत. बजरंगी भाईजान मधली मुन्नी आणि आजची मुन्नी हिच्यात जमीन आसमानचा फरक आहे. 7 वर्षाच्या हर्षांली मध्ये आणि 14 वर्षाच्या हर्षाली मध्ये खुप बदल झाला आहे.

बजरंगी भाईजान नंतर ती चित्रपटांमध्ये दिसली नसली तरी सोशल मीडियावर ती चाहत्यांशी जोडली गेली आहे आणि दररोज ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. हर्षाली मल्होत्रा आता मोठी झाली आहे. ती आता 14 वर्षांची आहे. हर्षाली मल्होत्राने लेटेस्ट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पूलमध्ये फोटोसाठी पोज देत आहे.
फोटो शेअर करण्यासोबतच हर्षालीने कॅप्शनही लिहिले आहे. या फोटोवर चाहत्यांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘तुझे हे फोटो खूप क्यूट आहेत, तर दुसर्या यूजरने लिहिले, ‘मुन्नी खूप छान’. दुसर्या यूजरने लिहिले की, ‘हर्षाली तू नेहमीसारखीच सुंदर दिसत आहेस.
हर्षाली मल्होत्रा या चित्रपटानंतर टीव्हीकडे वळली आणि ती सुरभी ज्योती आणि करण सिंग ग्रोवरच्या शो ‘कुबूल है’ मध्ये झोयाच्या भूमिकेत दिसली होती. यानंतर हर्षाली लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया सारख्या शोमध्ये दिसली.