नमस्कार मित्रांनो,
आपल्या हिंदू संस्कृतीत देवघराला फार महत्त्व आहे. घर लहान असो की मोठे परंतु प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतेच. तसेच संपूर्ण घरातील ही एक अशी जागा असते जी सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते. संपूर्ण घरातील सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा ही देव घरातच असते.
देवघरात जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी या चुकीच्या गोष्टी करू नये. या चुकीच्या वस्तूंमुळे आपल्या जीवनावर अनिष्ट परिणाम होतात. यामध्ये आपल्या देवघरात देवाचे कोठेही फुटलेले किंवा फार जुने फोटो ठेऊ नयेत. तसेच काचेला तडा गेलेले किंवा खंडित झालेल्या मूर्ती कधीच नसाव्यात त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.
आपल्या देवघरात अशुद्ध वस्तू, बिनाकामाच्या वस्तू ठेवू नयेत. काही देवी-देवतांची पूजनाची पद्धत माहीत नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने पूजन केले जाते त्यामुळे घरात नकारात्मक परिणाम होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवघरामध्ये 3 इंचापेक्षा जास्त मुर्तीची पुजा करू नये, कारण जर तीन इंचापेक्षा जास्त मूर्ती असेल तर त्या मूर्तीची पंचोपचार पूजा होणे आवश्यक आहे. यासाठी चंदन पूजा, धूप, दीप, नैवेद्य असे पूजन होणे आवश्यक आहे.
देवघर नेहमी स्वच्छ असावे तसेच देवघराची वेळोवेळी स्वच्छता करावी. यामुळे घरामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देवघरातील देवांना रोज ताजी फुले अर्पण करावीत आणि निर्माल्य फुलांचे लगेचच विसर्जन करावे.
काही घरांमध्ये रोज देवांना नैवेद्य दाखविला जातो यामुळे अन्नधान्याची भरभराट होते. परंतु हा नैवेद्य थोड्या वेळानंतर लगेच घेऊन प्रसाद म्हणून ग्रहण करावा.
आपण नेहमी नैसर्गिक वस्तूचा वापर करून देवघर सजवण्यासाठी करावा. कारण कृत्रिम पध्दतीने देव सजवल्यास त्याच्यातील ऊर्जा कमी होते आणि त्यामुळे संपूर्ण घरात वादविवाद व भांडण होण्याची शक्यता असते.
अशीच देवपूजा रोज करावी तसेच देवाला ताजी फुले वाहून, नैवेद्य आणि धूप दाखवून घ्यावे. शक्य असल्यास देवघराच्या पुढे रांगोळी काढावी.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.