या 13 कारणांमुळे घरात येते गरिबी… आताच टाळा या गोष्टी…

0
341

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपल्या घरीच काही अशा गोष्टी असतात ज्यामुळे तुमचे प्रयत्न थांबतात, घरात नेहमी दारिद्र्य येते, अमंगल होते. अलक्ष्मी वास करते व घर नकारात्मकतेमुळे भरून जाते.

अशावेळी जी काही कारणे कारणीभूत असतात, ज्या गोष्टींमुळे ही अवस्था होते अशा काही गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्ही परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

मित्रांनो देवघरातील जो दिवा आपण प्रज्वलित करतो तो दिवा फुंकर मारून कधीही विझवू नका. त्यामुळे देवतेची अवकृपा लाभते. आपल्याकडून देवतेचा अपमान होतो.

आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा अतिशय महत्वाचा असतो, जिथून सकारात्मक ऊर्जा घरात येते व त्यामुळे घरी वातावरण प्रसन्न राहते. हा दरवाजा तुटलेला नसावा, याचा उंबरठा देखील खूप महत्वाचा असतो, त्यावर पाय देऊ नये, त्यावर बसू नये, जेवू नये. त्यामुळे घरात खूप हानी होते.

मित्रांनो भोजन करताना ईश्वराला धन्यवाद अवश्य द्या, कारण त्याच्याच कृपेने आपल्याला दोन वेळचे पोटभर जेवण मिळत असते.

त्याचबरोबर कधीच खोट्या, चुकीच्या शपथा खाऊ नका, आपल्या हिंदू धर्मग्रंथात असत्य वचन घेतल्यास फार मोठे पाप माथी लागते.

मित्रांनो आपल्या चप्पल स्टँड मध्ये, घराबाहेर आपल्या चप्पल ठेवलेल्या असतात, या चप्पल जर पालथ्या पडल्या असतील तर त्या जरूर सरळ करा, त्यामुळे देखील घरात विचित्र प्रकार घडतात.

तसेच तुम्ही चप्पल मुख्य दरवाजात अजिबात सोडू नका ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, दरवाजा सोडून थोड्या अंतरावर ही चप्पल सोडा.

मित्रांनो झाडू मारण्याच्या वेळेबद्दल बरेच गैरसमज आहेत, रात्री झाडू अवश्य मारावा जर खूपच अस्वच्छता असेल तर, पण सूर्यास्तावेळी सायंकाळी 6.30 ते 7.30 यावेळेत चुकूनही झाडू मारू नका, कारण घरात त्यावेळी लक्ष्मीचे आगमन होत असते.

त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एखाद्या धर्म ग्रंथाचे वाचन कराल तेव्हा तुम्ही पवित्र, शुद्ध स्नान केलेले असावे, मां साहार केलेला नसावा. कारण त्यामुळे तुम्हाला पाप लागते कारण हिंदू धर्मात पावित्र्याला खूप महत्व आहे. जर तुम्ही शुद्ध शरीर आणि मनाने जर वाचन, चिंतन कराल तर त्याचे फळ नक्कीच मिळेल.

लसूण आणि कांदे यांचा थेट संबंध केतू ग्रहाशी असतो, त्यामुळे तुमची ही सर्वात मोठी बाधा ठरेल जर तुम्ही लसूण कांदा यांचे आवरण, छिलके जाळत असाल तर. त्यामुळे घरात पैसे येत नाहीत, आले तर टिकत नाहीत. असं केल्याने केतू दोष निर्माण होतो.

हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मी मानले जाते, व गुरुवार हा भगवान विष्णू यांना अर्पित आहे, त्यामुळे गुरुवारी चुकूनही झाडू खरेदी करू नका.

रात्री पिण्याचे पाणी कधीच उघडे ठेवू नका. कारण शास्त्रानुसार ते अयोग्य आहे.

मित्रांनो तसेच शरीरातील विघटक पदार्थ कधीही बाहेरच्या झाडाखाली करू नका. झाडांचे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते.

तसेच काही गोष्टी ज्या भाग्यावर विपरीत परिणाम करतात अशा गोष्टी चुकूनही करू नका ते म्हणजे स्मशानभूमीत हसणे. तिथे फार मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा सतत प्रवाहित होत असते त्यामुळे तुम्ही जर तिथे हसला तर होत्याच नव्हतं होईल.

मित्रांनो जर तुम्ही नखे दाताने कुरतडत असाल तर तुमच्या जीवनात आजा रपण येते.

महिला जर उभे राहून केस विंचरत असतील, केसांची वेणी घालत असतील तर त्याचा परिणाम त्यांच्यावर होत असतो.

आपल्या जीवनातील मोठ्या जेष्ठ व्यक्तींसोबत आपण नेहमी चांगला व्यवहार करावा, त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळतो, जर तुम्ही दुष्ट वागलात तर त्यांचे तळतळाट तुम्हाला लागतील व तुमचे जीवन अस्थिर बनेल.

मित्रांनो घरातील गरिबी हटत नसते याचं कारण घरातील नकारात्मक ऊर्जा भरपूर वाढलेली असते, घरातील अडगळ, भंगार, नको असणारे, तुटके फुटके सामान वेळीच विल्हेवाट लावावे, अन्यथा त्यामुळे अलक्ष्मी सदैव वास करते.

घरातील तुटलेल्या वस्तू जरी कितीही प्रिय असल्या तरी त्या बदलाव्यात किंवा त्या घरात ठेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here