नमस्कार मित्रांनो,
चहा सोबत हे 5 पदार्थ आपण चुकूनही खाऊ नका. अनेक जणांना पोटाच्या ज्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या फक्त या एका साध्या चुकीमुळे झालेल्या आहेत.
मित्रांनो ही चूक सहजपणे लक्षात येत नाही. त्यामुळे आपण हे पाच पदार्थ चहा सोबत खाणं टाळायला हवं. आपल्यापैकी खूप जणांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते.
भारतात असं क्वचित एखादं घर असेल ज्या घरात चहा किंवा कॉफी पिली जात नसेल. खूप जणांना तर चहाचे चक्क व्यसन असते.
प्रत्येक घरात दिवसाची सुरुवात ही चहा पासूनच होते. प्रत्येकाच्या घरी चहा दररोज बनतोच. चहा प्यायल्याने थक वा निघून जातो. मन ताजे तवाने होते.
मित्रांनो काही लोकांना चहा सोबत काहीतरी खाण्याची सवय असते. पण मित्रांनो जसं उपाशी पोटी चहा प्यायल्याने शरीराला नुकसान होऊ शकतं, अगदी त्याच प्रमाणे चहा सोबत किंवा चहा च्या आधी चुकीच्या गोष्टी, चुकीचे पदार्थ खाल्ल्याने शरीराला नुकसान होऊ शकतं.
ही गोष्ट साधी असल्याने आपलं याकडे लक्ष जात नाही. आणि याच एका चुकीमुळे आपल्याला होणारे 80 टक्के पोटाचे आजार होतात. त्यामुळे चहा सोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं.
चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते 5 पदार्थ जे चहा सोबत चुकूनही खाऊ नयेत.
1) हळद
मित्रांनो या मधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे हळद. चहा प्यायल्यानंतर असा कोणताही पदार्थ खाऊ नका ज्या मध्ये हळदीचे प्रमाण हे जास्त असतं.
मित्रांनो ज्या पदार्थांमध्ये हळदीचे प्रमाण जास्त असतं असे पदार्थ चहा प्यायल्या नंतर खाणं टाळा.
हळदी मध्ये असलेला कुर्क्युमीन आणि चहा मध्ये असलेला कॅफी न आणि टॅ निन यांच्या मध्ये एक रासायनिक अभिक्रिया होते. आणि त्यामुळे पोटाचे अनेक गंभीर आजार आपल्याला होतात.
पोटाच्या या आजारांमध्ये अल्सर, गॅस, ऍसिडिटी यांसारखे आजार पण आपल्याला होतात. हे आजार आपल्याला लगेच जाणवतात. या सोबतच अनेक गंभीर आजार सुद्धा आपल्याला होतात. फक्त ते आपल्याला जाणवायला वेळ लागतो.
त्यामुळे चहा सोबत हळद किंवा हळदीचे पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद असलेले पदार्थ यांमध्ये कमीत कमी अर्ध्या तास अंतर असावं.
2) हरभरा डाळ किंवा बेसन युक्त पदार्थ
मित्रांनो दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे हरभरा डाळ किंवा बेसन असलेले पदार्थ. बहुतेक लोक चहा सोबत वडापाव, भजी किंवा बेसन मध्ये तळलेले पदार्थ आवडीने खातात.
पण मित्रांनो हे अतिशय धोकादायक आहे. याचे आपल्या शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. या मुळे आपली पा चन शक्ती हळू हळू इतकी कमकुवत होते, की त्यामुळे आपल्या शरीराला पोषक घटकांची कमतरता जाणवते.
शरीराला पोषण घटकांची कमतरता जाणवल्यामुळे आपलं शरीर क्षीण होतं. मित्रांनो हे परिणाम आपल्याला लगेच दिसले नाहीत तरी 2 ते 3 वर्षात हळू हळू आपल्याला याचे दुष्परिणाम दिसू लागतील.
त्यामुळे चहा आणि बेसन चे पदार्थ यांमध्ये कमीत कमी 30 मिनिटांचे अंतर नक्की ठेवा.
3) पाणी
मित्रांनो 3रा घटक जो आहे तो म्हणजे पाणी. मित्रांनो चहा प्यायच्या अगोदर 20 मिनिटे आणि चहा पिऊन झाल्यानंतर 20 मिनिटे कधीही पाणी पिऊ नये.
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना चहा पिल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. तर मित्रांनो असं करू नका. आपल्याला मोठे लोक सुद्धा चहा पिताना पाणी न पिण्याच्या सल्ला देत असतात. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
चहा पिताना पाणी प्यायल्याने सर्वात आधी आपल्या दातांवर याचा गंभीर परिणाम होतो. दुसरा परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर जाणवतो. आपल्या चेहऱ्यावर सुरकत्या पडतात. चेहरा ड ल दिसू लागतो. चेहऱ्याची स्किन लूज होते.
असे दुष्परिणाम आपल्याला चहा च्या अगोदर किंवा नंतर पाणी पिल्यानंतर जाणवतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा चहा सोबत पाणी प्यायची सवय असेल तर ती सवय बदला.
4) अंडे किंवा अंड्याचे पदार्थ
मित्रांनो चौथा पदार्थ जो चहा सोबत खाऊ नये तो आहे अंडे किंवा अंड्याचे पदार्थ. बरेच जण चहा सोबत अंडा ऑम्लेट किंवा उकडलेले अंडे खाऊन चहा घेतात. किंवा चहा सोबतच अंडे खातात.
मित्रांनो असं अजिबात करू नका. याचं कारण असं आहे की आपल्या शरीरात जे बॅड कोले स्ट्रॉल असतं, ते चहा सोबत अंडे खाल्याने 3 पट अधिक गतीने वाढतं. त्यामुळे तुम्हाला हृदयाच्या आणि ब्लॉकेज च्या समस्या निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे चहा सोबत अंडे किंवा अंड्याचे पदार्थ बिलकुल सुद्धा घेऊ नयेत, खाऊ नयेत.
5) लिंबू
मित्रांनो या लिस्ट मध्ये असलेला शेवटचा पदार्थ आहे लिंबू. अनेकजण चहाची चव वाढवण्यासाठी चहा मध्ये लिंबू पिळतात. पण आयुर्वेदानुसार फक्त ग्रीन टी आणि ब्लॅक टी मध्ये लिंबू पिळला जातो.
या दोन चहा शिवाय इतर कोणत्याही चहा मध्ये लिंबाचा रस मिसळू नये. जर आपण असं केलं तर तुम्हाला गंभीर ऍसिडिटी होऊ शकते.
मित्रांनो हे 5 पदार्थ चहा सोबत घेण टाळा. तुमचे पोटाचे विकार कमी होतील. पोटाच्या सगळ्या समस्या दूर होतील. शक्यतो चहा हा ग्रीन टी किंवा ब्लॅक टी प्या. इतर प्रकारच्या चहाने आपल्या शरीराला हानीच पोहोचते.
मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.