नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती योग्य पद्धतीने कशी ठेवायची या बद्दल माहिती देणार आहोत. देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्यास, अन्नपूर्णा देवीची उपासना केल्यास आपल्या घरात सुख समृद्धी नांदते.
आपल्याला चांगले आरोग्य लाभते. घरात कधीच धन धान्याची कमतरता भासत नाही. बहुतांश लोकांच्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते. पण त्यातील काहीच लोकांना ती मूर्ती योग्य पद्धतीने कशी ठेवावी या बद्दल माहिती असते.
देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती फक्त अंथरलेल्या वस्त्रावर कधीच ठेवू नये. मूर्ती ठेवण्यासाठी सर्वप्रथम तांब्याची किंवा पितळेची ताटली किंवा वाटी घ्यावी. आणि त्या वाटीमध्ये गहू किंवा तांदूळ घालावेत.
नंतर गहू किंवा तांदुळावर हळद कुंकू वाहावे. आणि त्यावर श्री अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवावी. श्री अन्नपूर्णा देवी हि अन्नधान्याची देवता आहे. म्हणूनच अन्नपूर्णा देवीची मूर्ती धान्यावर ठेवण्यास विशेष महत्व आहे.
अशा या देवघरामध्ये ठेवलेल्या अन्नपूर्णा देवीची दररोज यथासांग पूजा अर्चा केली पाहिजे. शक्य झाल्यास दररोज किंवा दार आठवड्याला श्री अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीखाली असलेले धान्य बदलले पाहिजेत.
जुन्या गहू किंवा तांदुळातील काही भाग हा आपल्या घरातील धान्यामध्ये घातला पाहिजे आणि काही भाग पक्षांना खाण्यासाठी दिला पाहिजे. तसेच अन्नपूर्णा देवीची उपासना करताना अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र देखील म्हटले पाहिजे.
अशा प्रकारे श्री अन्नपूर्णा देवीची उपासना केल्यास श्री अन्नपूर्णा देवीची आपल्या घरातवर अखंड कृपा दृष्टी राहते व आपले कुटुंब सुखी व समाधानी राहते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.