नमस्कार मित्रांनो,
मौनी अमावस्या 21 जानेवारी 2023 शनिवारच्या दिवशी आलेली आहे. मित्रांनो मौनी अमावास्येच वर्ष भरात येणाऱ्या अमावस्येपैकी खूप मोठं माहात्म्य सांगितलेलं आहे. या अमावस्येला केलेले अनेक छोटे छोटे उपाय तोडगे आपल्या जीवनातल्या अनेक समस्या दूर करतात.
या समस्या कोणत्याही असो, मग त्या पैशाच्या समस्या असो,घरात सुख शांती नसो, उद्योग व्यापार व्यवसाय नीट चालत नसो आजारपण असो , इच्छापूर्ती असो. या मौनी अमावास्येला अनेक प्रकारचे तांत्रिक तोडगे केले जातात.
मौनी अमावास्येला करणाऱ्या उपायांपैकी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे या अमावस्येला रात्री आपण आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्याची साफ सफाई करा. पूर्व आणि उत्तर दिशा यांच्या दरम्यान जी दिशा असते ती ईशान्य दिशा असे म्हणतात.
मित्रांनो या दिशेला देवांची दिशा मानली जाते. या दिशेला केलेले उपाय सर्व देवी देवतांना प्रसन्न करतात. या दिवशी रात्री ईशान्य कोपऱ्याची साफसफाई करावी आणि त्या ठिकाणी एक तुपाचा दिवा प्रजवलीत करावा.
हे तूप जर देशी गाईचं असेल तर अतिउत्तम. कारण देशी गाईमध्ये 33 कोटी देवीदेवतांचा वास असतो. जर देशी गाईचं तूप उपलब्ध नसेल तर इतर कोणत्याही गाईचं चालेल पण लक्षात ठेवा तूप गाईचंच असावं. इतर पशु प्राण्यांचं तूप वापरू नका.
अशा प्रकारे साफ सफाई केल्यानंतर दिवा प्रजवंलीत करण्यापूर्वी त्या दिव्याखाली मूठभर तांदूळ ठेवावे. हा दिवा ईश्वर स्वरूप मानला जातो. मित्रांनो हा छोटासा उपाय माता लक्ष्मीस प्रसन्न करतो. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसते.
मित्रांनो धन प्राप्तीसाठी मौनी अमावस्येला करायचा हा सर्वोत्तम उपाय आहे. हा दिवा लावताना त्या मध्ये जी वात आहे ती जर लाल रंगाची लावली तर अति उत्तम. लाल रंगाच्या कोणत्याही धाग्याची वात आपण लावू शकता.
अशा प्रकारे दिवा प्रजवलीत केल्यानंतर त्यामध्ये केशराच्या एक ते दोन काड्या त्यात टाकायच्या आहेत. मित्रांनो लाल रंग मी माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे.
दिवा लावल्यानंतर मनोभावे हात जोडून धन समस्या बोलून दाखवायची आहे. माता लक्ष्मीला आवाहन करा कि त्यांनी आपल्या घरी यावं आणि आपल्या घर स्थायी वास करावा.
अनेक जणांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असतो. अशा लोकांनी या दिवशी सकाळी लवकर उठाव आणि चांदीच्या नाग नागिणीची पूजा करावी.
पूजा संपन्न झाल्यानंतर सफेद फुलांसोबत वाहत्या पाण्यात हे नाग नागीण विसर्जित करावेत. यामुळे कुंडलीतील कालसर्प दोष दूर होतो. मित्रांनो या दिवशी कोणत्याही भुकेल्याला, गरजूला, गरीब व्यक्तीला आपण खाऊ पिऊ घाला त्याला भोजन द्या. अन्नदान करा.
मित्रांनो या अमावास्येच्या दिवशी कोणत्याही गरजूला खाऊ पिऊ घातलं तर आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या दूर होतात. हा एक सर्वोत्तम उपाय आहे मौनी अमावस्येचा .
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा. मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.