नमस्कार मित्रांनो,
या वर्षी अक्षय तृतीया 15 मे शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे. या वर्षीच्या अक्षय तृतीयेस सर्वार्थ सिद्धी योग तसेच धन वृद्धी योग यासारखे योग जुळून आलेले आहेत. शुक्रवारच्या दिवशी अक्षय तृतीया आल्याने तीच महत्व कित्येक पटीने वाढलं आहे.
मित्रांनो शुक्रवार हा मातालक्ष्मीचा वार मानला जातो. मित्रांनो अशा या अक्षय तृतीयेस आपण देवी देवतांची पूजा तर करतच असतो पण सोबतच तुळशीची पूजा सुद्धा आपल्याला आज करायची आहे.
या दिवशी माता तुळशीला एक वस्तू नक्की अर्पण करा. तुमच्या नशिबातील दुर्भाग्य सौभाग्यात बदलताना तुम्हाला दिसेल.
जर नशीब साथ देत नसेल, घरात कटकटी असतील, पीडा असेल, दुःख असेल तर हा एक उपाय केल्याने तुमच्या जीवनात सुखाची निर्मिती अवश्य होईल.
मित्रानो हा उपाय करण्यापूर्वी आपण स्वच्छ स्नान करावं. स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, ज्यांना शक्य असेल त्यांनी लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावीत. तांब्याभर पाणी घ्या. त्यात थोडे गंगाजल किंवा चिमूटभर साखर आणि हळद टाका.
असे हे जल आपण माता तुळशीला मनोभावे अर्पण करा. हा उपाय आपण दिवसभरात कधीही करू शकता. मात्र सायंकाळी हा उपाय तुम्ही करणार असाल तर तुळशीला हे जल अर्पण करू नये किंवा तुळशीला स्पर्श करणे टाळावे.
मित्रांनो तुळशीला जल अर्पण करून झाल्यानंतर तुळशी समोर एक तुपाचा दिवा प्रजवलीत करावा. हे सर्व करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या महाविष्णू मंत्राचा सातत्याने आपण जप करावा.
मित्रानो सोबतच एका छोट्याश्या वाटीमध्ये मूठभर तांदूळ घ्यावे. त्या तांदुळात थोडीशी हळद टाकावी जेणेकरून त्या तांदळाला पिवळा रंग प्रदान होईल. तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्या ते तुटलेले फुटलेले अर्धवट नसावे.
असे हे तांदूळ आपल्या उजव्या हातात थोडेसे घ्यायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जप करत असतानाच तीन वेळा हे तांदूळ तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत.
तांदूळ अर्पण केल्या नंतर माता तुळशीच्या 11 प्रदक्षिणा आपण घालायच्या आहेत. जर प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवती उजव्या बाजूने सुरवात करून प्रदक्षिणा घालू शकता.
प्रदक्षिणा घालताना सुद्धा तोच महाविष्णू मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. मित्रानो हि जी तिथी आहे अक्षय तृतीया आपण जे काही कर्म करू, जे काही उपाय करू, मंत्र जप करू याचे हजार पटीने श्रेय आपल्याला या दिवशी मिळत असत.
आणि हे जे फळ आपल्याला मिळत ते अक्षय टिकत. त्याचा क्षय त्याचा ऱ्हास कधीच न होणारा असतो. मित्रानो मंत्र जप करून झाला 11 प्रदक्षिणा झाल्या त्यानंतर तुळशी मातेजवळील थोडीशी माती आपल्या मस्तकी लावा.
आपल्या घरातील प्रत्येकाच्या मस्तकी आपण थोडीशी माती लावायची आहे. मित्रानो अशी मान्यता आहे पद्मपुराण असं मानत कि हा छोटासा उपाय घरातील मोठ्यात मोठी गरिबी, दारिद्र्य, कंगाली दूर करतो.
महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करताय तर सर्व क्रिया करायच्या आहेत मात्र तुळशीला स्पर्श करू नका आणि जल सुद्धा अर्पण करू नका.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.