नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. असं मानले जाते कि या दिवशी आपण जो काही उपाय करू, काही कार्य करू त्यातून मिळणार पुण्य हे अक्षय फलदायी असत.
थोडक्यात सांगायचं तर आपल्याला त्यातून मिळणार फळ हे कधीच नष्ट होत नाही. मित्रांनो या वर्षीच्या अक्षय तृतीयेला आपण आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर करण्यासाठी, कुटुंबातील भांडणे मिटण्यासाठी, घरात शांती टिकून राहावी म्हणून या दिवशी एक उपाय नक्की करा.
मित्रांनो अक्षय तृतीया हा एक मोठा पुण्यदायी दिवस आहे. असं म्हणतात कि या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक विशिष्ट प्रकारची अनुष्ठान करतात. या दिवशी छोटे छोटे उपाय देखील बरेच जण करतात.
मित्रांनो बऱ्याचशा घरांमध्ये पितृ अप्रसन्न असतात. होय जर आपले पितृ अप्रसन्न असतील तर आपल्या घरात दोष निर्माण होतो. असा दोष जो कालांतराने आपले जीवन दुःखमय बनवतो. आपल्या जीवनामध्ये अशांती निर्माण करतो.
मित्रांनो या ना त्या कारणाने पितृ अप्रसन्न होत असतात आणि पितरांच्या शांतीसाठीच अमावस्येच्या दिवशी आपण विशेष प्रकारचे उपाय करत असतो. सर्व उपाय करून देखील पितृ दोष असेल तर या अक्षय तृतीयेला हा छोटासा उपाय नक्की करा.
या उपायाने सर्वप्रकारच्या पितृ दोषातून तुमची मुक्ती होईलच. आपण जे काही काम करतोय ते यशस्वी व्हाव, बऱ्याचदा कामामध्ये अडथळे येतात परिणामी कामातून प्रगती साध्य न होता आपला तोटा होतो. कर्जाचा डोंगर उभा राहतो. मित्रांनो या सर्व गोष्टी पितृदोषाशी संबंधित आहेत.
मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठाव. शक्य असेल तर ब्रम्हमुहूर्तावर उठाव. उठल्यावर अंघोळ करताना पाण्यात थोडस गंगाजल टाकण्यास विसरू नका.
मित्रांनो अशी मान्यता आहे कि या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन पवित्र नदीत स्नान करावं. जेणेकरून आपल्याला सर्व पापातून मुक्ती तर मिळतेच मात्र पुण्याची सुद्धा प्राप्ती होते.
मित्रांनो गंगाजल तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर पाण्यात थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकू शकता. स्वतःच्या शरीराची शुद्धी केल्यानंतर चांगले वस्त्र परिधान करा. त्यांनतर नित्यनियमाप्रमाणे घरातील देव पूजा करायची आहे.
मित्रानो या दिवशी आपण घरामध्ये थोडीशी खीर बनवायची आहे सोबतच चपाती किंवा भाकरी बनवायची आहे. त्यानतंर चपाती किंवा भारकी खीरी मध्ये कुस्करायची आहे. त्यानंतर हे कुस्करलेले मिश्रण घराच्या छतावर किंवा घराच्या समोर कावळ्यांना खायला टाकायचं आहे.
मित्रानो आपले पित्र हे कावळ्यांच्या रूपाने या खिरीचा या प्रसादाचा भोग नक्की घेतील. आता त्यांचा आत्मा जर प्रसन्न झाला तर आपल्या घरातून पितृ दोष निघून गेलाच म्हणून समजा.
मित्रांनो बरेच जण फ्लॅट मध्ये राहतात तर त्यांना बऱ्याचदा कावळ्यांना हे खाऊ घालणे शक्य होत नाही. अशा लोकांनी जवळपास असणाऱ्या गाईला सुद्धा हि खीर आणि चपाती खाऊ घालू शकता.
मित्रांनो गो मातेमध्ये सुद्धा 33 कोटी देवी देवतांचा वास आहे.आणि म्हणून गो मातेस हि खीर खाऊ घालताना तिच्या पाठीवरून हात फिरवून मनोभावे पितरांच्या शांतीसाठी प्रार्थना अवश्य करा.
पितृ कृपा जर सफल झाली तर आपल्याला नक्कीच जीवनात सफलता मिळते. मित्रांनो उपाय केल्यानंतर आपण आपल्या घरी यावं आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण एक धूप प्रजवलीत करावा.
धूप जाळल्यावर त्यावर थोडीशी खीर ठेवायची आहे. थोडक्यात खिरेला धूप द्यायची आहे. त्यानंतर हा धूप संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. असं केल्याने सुद्धा आपले पित्र प्रसन्न होतात आणि घरातून पितृ दोष नष्ट होतो.
मित्रांनो त्यानंतर सायंकाळी आपण पिंपळाच्या वृक्षाखाली जायचं आहे आणि त्याठिकाणी थोडीशी खीर आपण ठेवायची आहे. थोड्याच्या खिरेचा भोग आपण ठेवायचा आहे आपल्या पितरांच्या नावाने.
अशी मान्यता आहे कि पिंपळाखाली असा भोग ठेवल्याने आपले पित्र प्रसन्न होऊन तो भोग स्वीकारतात. हे सर्व उपाय करणे शक्य नसेल तर कोणत्याही गरजू व्यक्तीला आपल्या घरी बोलावून त्याला खीर चपाती किंवा खीर भाकरी खाऊ घाला.
आपल्या पितरांच्या नावाने अन्नदान करू शकता. लक्षात घ्या या सर्व गोष्टी आपल्याला पितरांच्या नावानेच करायच्या आहेत. असं केल्याने सुद्धा आपले पित्र प्रसन्न होतात आणि पितृ दोषातून आपली मुक्ती होते.
तर मित्रानो अक्षय तृतीयेच्या दिवशी सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करा. पितृ दोषातून आपली मुक्ती होईल आणि तुमच्या घरात सुख समाधान नांदू लागेल. सर्व देवीदेवतांची कृपा आपल्यावर सदैव बरसत राहो याच मनोकामनेसह धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.