ही कथा वाचणाऱ्यांना मिळेल अक्षय तृतीयेच्या पूजे इतके पुण्य… माता लक्ष्मी देणार आशीर्वाद…

0
303

नमस्कार मित्रांनो,

ओम नमः शिवाय. मित्रांनो आज अक्षय तृतीया आहे. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या दिवशी आपण मनापासून माता लक्ष्मी आणि श्री हरी श्री विष्णू यांची पूजा करायची आहे.

मित्रांनो या दिवशी आपण अक्षय तृतीयेच्या फक्त कथेचे श्रवण केले तरी आपल्याला अक्षय तृतीयेच्या पूजेचे आणि व्रताचे फळ प्राप्त होते.

या दिवशी मिळालेल्या पुण्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी दान, धर्म, पूजा, हवन इत्यादी करावे. याचबरोबर माता लक्ष्मी आणि श्री हरी श्री विष्णू यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत.

मित्रांनो याच बरोबर आपण दिवसभरात फक्त 2 मिनिटे वेळ काढून जर अक्षय तृतीयेची ही कथा ऐकली तर तुम्हाला खूप पुण्य प्राप्ती होईल.

पौराणिक कथेनुसार शाकल्य नगरात धर्मदास नावाचा एक वैश्य राहत होता. धर्मदास स्वभावाने अत्यंत धार्मिक होता. त्याच्या कुटुंबात अनेक सदस्य होते, आणि त्यांचा उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता त्याला लागलेली असायची.

एकाने कमवावे आणि बाकीच्यांनी बसून खावे अशी धर्मदास ची परिस्थिती होती. एके दिवशी धर्म दास यांनी अक्षय तृतीये बद्दल माहिती ऐकली.

वैशाख शुक्ल च्या तृतीया तिथी वर देवी देवतांची पूजा केली आणि ब्राह्मणांना दान केलं की त्याचं अक्षय पुण्य प्राप्ती होते हे त्याला कळलं.

ही माहिती समजल्यानंतर त्याने अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून गंगेमध्ये स्नान केले, घरी जाऊन देवी देवतांची विधिवत उपासना केली आणि ब्राह्मणांना अन्न, सतु, दही, हरभरा, गूळ आणि गहू यांचं दान दिलं.

मित्रांनो हे दान करत असताना त्याच्या घरातील इतर सदस्य त्याला आडवे येऊ लागले, त्याला अडवू लागले. घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना या सगळ्या वस्तू दान का करत आहात, असं म्हणून त्याची पत्नी देखील दान करण्यापासून त्याला अडवू लागली.

पण धर्म दास यांनी कोणाचेही ऐकले नाही. आणि प्रत्येक वर्षी अक्षय तृतीयेला ते दान धर्म करू लागले. त्यांचा हा नियम चालूच होता.

काही वर्षांनी वृद्धापकाळाने त्यांचा मृ त्यु झाला. आणि पुढे त्याने द्वारकेच्या पुशावती नावाचा राजा म्हणून जन्म घेतला.

मित्रांनो धर्म दासला हा राजयोग त्याने पूर्वजन्मात केलेल्या दानाच्या पुण्यामुळेच मिळाला होता. पुशावती राजा हा खूपच पराक्रमी, शूर आणि प्रजाहीत दक्ष होता. त्याच्या राज्यात धन धान्य, सोने, नाणे कशाचीही कमतरता नव्हती.

त्याची प्रजा ही सुखी व समाधानी होती. पण राजा झाल्यानंतर सुद्धा पुशामती ने आपले दान, धर्म इत्यादी पुण्य कर्म सोडले नव्हते. तो एक धर्म प्रिय आणि दान शूर राजा म्हणून ओळखला जाऊ लागला.

हे भगवंता तुम्ही जशी धर्म राजा वर कृपा केली तशीच कृपा आमच्या सर्वांवर करा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना.

तर मित्रांनो ही होती अक्षय तृतीयेची कथा. कथा आवडली असेल तर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. आणि कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा.

अशाच नवनवीन माहिती साठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here