नमस्कार मित्रांनो,
ओम नमः शिवाय. मित्रांनो 14 मे 2021 शुक्रवार रोजी अक्षय तृतीया आलेली आहे. वर्षभरात येणाऱ्या साडे तीन शुभ मुहूर्तापैकी हा पूर्ण शुभ मुहूर्त आहे.
पौराणिक मान्यते नुसार या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर कोणतेही पंचांग पाहण्याची गरज नाही.
कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य सुरू करण्यासाठी अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ आणि पवित्र असा दिवस मानला जातो.
त्यामुळेच या दिवशी विवाह, वास्तू शांती, भूमी पूजन, नवीन व्यवसायाची सुरुवात यांसारखी शुभ कार्ये केली जातात. अक्षय तृतीया हा एक स्वयं सिद्ध असा शुभ मुहूर्त आहे.
मित्रांनो या दिवशी स्नान, दान, जप करण्याचे देखील विशेष असे महत्व आहे, कारण या दिवशी आपण जे कार्य करतो त्याचे आपल्याला अक्षय असे पुण्य प्राप्त होते. म्हणजे त्या पुण्याचा कधीच क्षय होत नाही.
या दिवशी धन प्राप्ती साठी अनेक उपाय, अनेक तोटके केले जातात. मित्रांनो जर आपल्या जीवनात पैशांच्या समस्या असतील, पैसा येत नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, तर अक्षय तृतीया ला माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे.
या दिवशी आपण काही उपाय केले तर त्यामुळे अपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी चा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि आपल्या जीवनात ज्या कोणत्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात.
मित्रांनो अक्षय तृतीयेला अनेक जण नवीन सोन्याचे दागिने बनवतात. नवीन सोने खरेदी चे अत्यंत महत्व आहे. पण सध्या बाहेर असलेल्या परिस्थितीत आपण सोने खरेदी करू शकत नसाल तर, आपण आपल्या घरी आधीपासूनच असलेले सोने स्वच्छ धुवून त्या सोन्याची पूजा करू शकता.
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या कुंडली मध्ये काही दोष असतील तर त्यापासून आपली सुटका व्हावी आणि आपल्या जीवनात सफलता प्राप्त व्हावी यासाठी आज आपण एक सोपा उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण घर स्वच्छ करावे. माता लक्ष्मीला स्वच्छता अवडते. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. स्नान वगैरे आटोपून घरासमोर सडा टाकून रांगोळी काढावी.
सध्या सडा टाकणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर थोडं पाणी शिंपडावे आणि त्यावर रांगोळी काढावी.
मित्रांनो रांगोळी काढताना आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला माता लक्ष्मी ची पाऊले काढायची आहेत. माता लक्ष्मीची ही पद चिन्हे अत्यंत शुभ मानली जातात. त्यामुळे आपल्या घरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला रांगोळी किंवा फुलांच्या पाकळ्यांनी माता लक्ष्मी ची ही पदचिन्हे काढायची आहेत.
आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे. या मुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
मित्रांनो यादिवशी फरशी पुसताना त्या पाण्यात मीठ टाकावे आणि मीठ टाकलेल्या पाण्याने फरशी पुसायची आहे. त्यामुळे जर आपल्या घरात काही वास्तूदोष असतील तर ते दूर होतील. यासाठी आपल्याला खडा मीठ वापरायचे आहे.
आपल्याला नशिबाची साथ मिळावी यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी एक खास उपाय करायचा आहे. तो आता आपण पाहणार आहोत.
जर तुम्ही खूप मेहनत करत असाल पण त्यामानाने तुम्हाला त्याचं फळ मिळत नसेल, जीवापाड कष्ट करून सुद्धा तुम्हाला सफलता मिळत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला आजचा हा उपाय करायचा आहे. मित्रांनो हा उपाय अगदी सोपा आहे.
या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. अक्षय तृतीया च्या या विशेष तिथीला स्नानाचे अत्यंत महत्व आहे.
जर आपण एखाद्या तीर्थक्षेत्रा मध्ये किंवा पवित्र नदी मध्ये स्नान केले तर त्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. पण सर्वांना हे शक्य नसते.
तर आपल्या घरातच आपण आंघोळ करताना पाण्यात गंगाजल टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे.
जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तुळशीची 2 ते 3 पाने टाकून स्नान करू शकता. यामुळे सुद्धा तुम्हाला गंगास्नान केल्याचं पुण्य मिळतं.
हा उपाय केल्यामुळे तुमच्या कुंडली मध्ये जे काही दोष आहेत ते दूर होऊन तुम्हाला भाग्याची साथ मिळू लागेल. तुम्ही ज्या कार्यात हात घालाल त्या कार्यात तुम्हाला सफलता मिळेल.
मित्रांनो आपण अनेकदा बघतो की खूप लोकांना मेहनत करून देखील त्याचं फळ मिळत नाही. तर काही लोकांना कमी कष्ट करून देखील खूप मोठी सफलता मिळते.
हे सर्व कुंडली मध्ये असलेल्या दोषांमुळे होत असतं. तर याच कुंडली दोषांपासून आपली मुक्ती व्हावी या साठी आपल्याला हा उपाय करायचा आहे.
हा उपाय जेवढा साधा आणि सोपा आहे तेवढाच तो प्रभाव शाली आहे. या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. माता लक्ष्मीच्या असीम कृपेने आपल्या घरात धन, वैभव आणि ऐश्वर्य येईल.
मित्रांनो तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळत असेल तर उद्या 14 तारखेला अक्षय तृतीयेला हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.