घरात अगरबत्ती जाळताय ? थांबा , त्या आधी हे वाचा.

0
203

नमस्कार मित्रानो

भगवंतांची आपल्यावर कृपा व्हावी , भगवंतांनी आपल्याला धनसंपत्ती आणि समृद्धी द्यावी यासाठी आपण भगवंतांचे पूजन करतो. भगवंतांना फळे , फुले अर्पण करतो. धूप दीप लावतो. विविध प्रकारे आपण भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो.

आपली इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी , आपल्यावर अडीअडचणी व संकटे येऊ नयेत यासाठी आपण भगवंतांपुढे अगरबत्ती लावतो. आता तर बाजारात विविध रंगांच्या , विविध सुगंधांच्या अगरबत्या मिळतात.

मग आपण आपल्या घरातील वातावरण फ्रेश व्हावे , आपल्याला सुद्धा उत्साही वाटावे व भगवंतही प्रसन्न व्हावेत यासाठी भारीतली भारी अगरबत्ती आणूंन आपण देवापुढे लावतो.

परंतु मित्रानो आपल्याला हे माहित आहे का कि भगवंतांपुढे अगरबत्ती लावणे हे अशुभ आहे. ऐकून आश्चर्य वाटले ना ? होय मित्रानो , हिंदू धर्मशास्त्र असं मानत कि देवापुढे अगरबत्ती लावणे निषिद्ध आहे.

अगरबत्ती मध्ये बांबूची काडी असते. त्यावर सुगंधी आवरण लावलेले असते. बांबूला वंश वृद्धीचे प्रतीक मानतात. जर बांबू जाळला तर आपला वंश खंडित होण्याचा धोका असतो. कोणत्याही पूजेत होम हवन तसेच यज्ञ मध्ये सुद्धा बांबूचा वापर केला जात नाही.

बांबूचा वापर आपल्या जीवनाच्या अंतिम समयी म्हणजे अंत्यसंस्काराच्या वेळी तिरडी साठी केला जातो. असे असले तरी चिते मध्ये तिरडीचे बांबू टाकले जात नाहीत. ते बाजूला फेकले जातात कारण शास्त्रात दिले आहे कि बांबू जाळल्याने आपल्याला पितृ दोष लागतो.

अगरबत्तीची काडी हि बांबूची असल्या कारणाने कधीही देवापुढे अगरबत्ती लावू नये. आपण भगवंतांची कोणतीही कथा किंवा कीर्तन ऐकले तर त्यात आपण ऐकतो कि धूप दीप लावावा. शास्त्रांमध्ये कुठेही अगरबत्तीचा उल्लेख नाही.

आपण देवापुढे दिवा लावू शकतो व सुगंधासाठी धूप लावू शकतो. परंतु अगरबत्ती लावू नये. तसेच बांबू मध्ये विषारी घडत देखील असतात. आपण जर घरात बांबू जाळला तर त्यामधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे आपल्याला श्वसनासंबंधी आजार देखील होऊ शकतात.

जे भगवंतांना देखील निषिद्ध आहे , ज्याचा आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होतो अशी अगरबत्ती देवापुढे का लावावी ? अगरबत्ती ऐवजी धूप लावावा. देवापुढे धूप लावल्यास वातावरण उत्साही आणि आनंदी होते व आपल्याला सुद्धा पवित्र आणि प्रसन्न वाटते.

असे म्हणतात कि देवाच्या दिव्यात घाला तूप आणि देवासमोर लावा धूप.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here