1 चमचा खा, वजन कधीच वाढणार नाही, काहीही खा पित्त कधीच होणार नाही, सकाळी पोट झटपट साफ…

0
1042

नमस्कार मित्रांनो,

छातीमध्ये तुमच्या खूप जळजळ करत असेल, ऍसिडिटीचा भयंकर त्रास होत असेल, पित्त आणि गॅसेसचा त्रास असेल किंवा उष्णता तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात होत असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे कि यासाठी कुठल्याही प्रकारची गोळी खाऊ नका.

तांब्याच्या भांड्याचा साधा उपाय करा फक्त सात दिवस. कोणत्याही प्रकारचे होणारे पित्त निघून जाईल, गॅसेसचा त्रास निघून जाईल, पचन व्यवस्थित होईल आणि सोबतच शरीरातील उष्णता सुद्धा निघून जाईल.

तर हा उपाय कसा करायचा आहे? हा पदार्थ कोणता आहे? तो कशा पद्धतीने खायचा आहे सर्व आम्ही तुम्हाला इथे सविस्तर सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊन कसा करायचा आहे उपाय.

मित्रांनो पित्त, ऍसिडिटी किंवा गॅस हा 90 टक्के लोकांना होणार सर्वसामान्य आजार आहे. यासाठी विविध प्रकारची गोळ्या औषध बाजारात उपलब्ध आहेत. परंतु मित्रांनो वारंवार गोळ्या घेतल्याने त्याचा वाईट परिणाम शरीरावर आणि किडनीवर होत असतो.

फास्ट रिअक्शन देणाऱ्या केमिकल युक्त गोळ्या घेतल्याने अकाली केस पांढरे होणे, दात किडतात, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी या समस्या केमिकलमुळे उद्भवतात. तर या गोळ्या न घेता दोन सध्या घटकांपासून बनवलेला हा उपाय तुम्ही फक्त सात दिवस करून बघा.

मित्रांनो यासाठी आपल्याला पहिला घटक जो लागणार आहे तो म्हणजे बडीशेप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तांब्याच भांड किंवा ग्लास. मित्रांनो तांब्याचंच भांड किंवा ग्लास घ्यायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये हा उपाय करायचा नाहीये. यामुळेच पित्ताची जी समस्या आहे ती निघून जाते.

मित्रांनो आपल्याला एक छोटी वाटी बडीशेप घ्यायची आहे आणि ते बारीक कुटायचं आहे किंवा तुम्ही मिक्सर मध्ये घालून सुद्धा त्याची पावडर बनवू शकता. त्यानंतर एक ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे. चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर ते पाणी तांब्याच्या ग्लासात टाकायचं आहे.

आता त्या पाण्यात एक चमचा बडीशेपच चूर्ण म्हणा किंवा पावडर म्हणा ती टाकायची आहे. टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी कोमट होई पर्यंत हे मिश्रण असच ठेवायचं आहे. साधारण 15 मिनिटांत पाणी कोमट होईल.

कोमट झाल्यानंतर ते पाणी आपल्याला प्यायचं आहे. दिवसातून दोन वेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे. सकाळी तुम्ही हा उपाय जेवणाच्या आधी किंवा नंतर कधीही करू शकता. फक्त एक तासाचा मध्ये गॅप असावा. जेवणाआधी एक तास किंवा जेवणानंतर एक तासाने.

संध्याकाळी सुद्धा जेवणाच्या एक तास आधी किंवा जेवणाच्या एक तास नंतर हा उपाय करायचा आहे. असं फक्त एक आठवडा करायचं आहे. पित्ताचा त्रास असेल, गॅसेसचा त्रास असेल, अपचन असेल त्यामुळे छातीत जळजळ होत असेल या सर्व समस्या या सात दिवसात पूर्णपणे निघून जातात.

मित्रांनो आयुर्वेदामध्ये तांब्याच्या भांड्यातील पाण्याला अमृतासमान मानले गेले आहे. बडीशेप मध्ये सुद्धा आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. हे दोन्ही घटक पोटाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत.

मित्रांनो हा उपाय तुम्ही जास्त दिवसापर्यंत सुद्धा करू शकता. त्याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाहीये. परंतु सात दिवसाच्या आतच तुम्हाला फरक दिसून येईल. तर साधा सरळ उपाय तुम्ही नक्की करून पहा.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा. तसेच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here