नमस्कार मित्रानो
मित्रांनो, शरीर संतुलित आणि आरोग्यदायी ठेवायचे असेल तर सगळ्यात आधी पोट साफ ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पोट साफ होण्यासाठी, गॅस होऊ नये म्हणून आणि शरीरात वाढलेले वात, पित्त आणि कफ दोष कमी करण्यासाठी तुम्ही विड्याचे पान , खाऊचे पान नेहमी खात असाल तर ही माहिती पूर्ण वाचा.
मित्रांनो पान खाण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु पान कोणी खावे? कधी खावे? कसे खावे? जर ते योग्य वेळी खाल्ले नाही तर हेच पान विषा प्रमाणे काम करते..! होय विषयाप्रमाणे.. काहीजण मल शुद्धीसाठी पान खातात तर काही जणांना बेचैनी वाटते म्हणून पान खातात.
काहीजण विड्याचे पान तंबाखू टाकून सेवन करतात. हे खूप विषारी आहे . ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी एक पानाचा रस आणि एक लसून पाकळी पेस्ट करून एकत्र करून खावे. यामुळे तुम्हाला पित्त कधीही होणार नाही. मात्र तोंड जळले तर सोबत मध खायला विसरु नका.
आपल्याला डायबिटीजचा त्रास नसेल तर एक पानावर एक चमचा मध टाकून दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा. असं केल्याने तुमच्या छातीतील कफ मोकळा होतो सोबतच घशाचे रोग होत नाहीत. याबरोबरच शुक्राणूंचे प्रमाण पुरुषांमध्ये वाढण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो.
तुम्ही तिखट, व्हेज-नॉनव्हेज, आंबट काहीही खाल्ले असेल तरीही सर्व पचते. पित्त कमी होते. हात पाय दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, वात आणि कफ हे देखील रोग शमतात. असे पान तुम्ही संध्याकाळी जेवणानंतर खाल्ल्यास त्याचा फायदा जास्त होतो.
तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. हृदय रोगाची शक्यता कमी होते. सकाळी पान खायचे असल्यास त्यामध्ये सुपारी अधिक टाकून खावे. आता तसं बघायला गेलो तर सुपारी आरोग्याला हानीकारक आहे. म्हणून सुपारी खाणे टाळले पाहिजे.
हेच पान जर तुम्ही दुपारी खायचं असेल तर त्यात कात अधिक टाकून खावा. आणि जर संध्याकाळी खायचे असल्यास त्यात चुना अधिक घालावा. या प्रकारे पानाचे सेवन केले तर पित्त आणि वात वायू यांचा समतोल राखला जातो.
पान आपण 15 दिवस ते एक महिना यापेक्षा जास्त खाऊ नये. पान खाताना चुना शरीरास हानिकारक ठरू नये म्हणून त्यामध्ये कात मिसळतात. चुना रक्तात सहजतेने शोषला जात नाही पण पानामध्ये क्लोरोफिल असल्यामुळे त्या बरोबरच चुना लवकर पचतो.
चुना दात मजबूत करतात. पान चांगले म्हणून दिवस भर खाऊ नये. असं केल्यास चांगल्या पेक्षा वाईट परिणाम होतील. कोणतीही गोष्ट अति केल्यास त्याचा वाईट परिणाम होतो.
विड्याच्या पानामध्ये चावीकॉल नावाच्या घटकांमुळे पान तिखट सर लागते. यामध्ये थायामिन, विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. पान हे नेहमी मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास शरीरास लाभदायक ठरते. आंघोळ केल्यानंतर, जेवल्यानंतर, उलटी झाल्यानंतर व झोपेतून उठल्यानंतर पान खाणे हितकारक असते.
पानामध्ये असलेल्या शॉवीकॉल नावाच्या घटकामुळे पोटातील जंत , कृमी नष्ट होतात . पान हे स्त्राव स्तंभक आणि रक्त स्तंभक असल्यामुळे काम उत्तेजक असते. पान कोणी खाऊ नये? उपवास करणाऱ्यांनी पान खाऊ नये कारण यामुळे पित्त व जळजळ वाढते.
गर्भवती स्त्रिया व लहान मुले यांनीदेखील पानाचे सेवन करू नये. दात कमकुवत असलेल्या व्यक्तींनी पानाचे सेवन टाळावे. डोळ्याचे त्रास असलेल्या व्यक्तींनी, रक्तक्षय, रक्तपित्त असणाऱ्या व्यक्तींनी पान खाण्याचे टाळावे.
विड्याचे पान औषध म्हणून घेत असाल तर ते आरोग्य सजवते. परंतु त्यांचे व्यसन लागले आणि तुम्ही रोज खात असाल तर ते तुमच्या आरोग्याचा नाश करते. विड्याचे पान हे दुधारी तलवार आहे.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.