ग्रंथालय
सहावीमध्ये असताना एक मुलगी आवडायची. ती रिक्षामधून शाळेला येणार. मी मात्र सायकलवर. मधल्या सुट्टीमध्ये तिच्या बेंचवर जाऊन बसायचो. एकदम जबरी वाटायचं. सगळ्या वर्गाला माहित होतं की मला ती आवडते.
ती नुसतं पाहायची, बोलणं कधी झालचं नाही. खेळाच्या तासाला लंगडीच्या मँचेस व्हायच्या. चार मित्रांना घेऊन तिला चिअर करत बसायचं. गुडघ्यापर्यंत स्क र्ट. गोरे गोरे पाय. डाव्या पायात काळा दोरा.
वाळूचे बारीक कण त्या नाजूक पायांना टोचायचे. ती खेळत असताना घंटा वाजू नये असं सतत वाटायचं. वेळ मिळेल तेव्हा ती ग्रंथालयात जायची. जाड जाड पुस्तक उघडून त्यात डोकं घालून बसणार. पूर्णपणे त्यात गुंग.
तिच्यामागे मी देखील जायचो. ग्रंथालयाच्या बाईनी एकदा मला हवं असणार पुस्तक घेऊ दिल नाही. बाईंचा प्रचंड राग आला. पुस्तक का घेऊ देत नाहीत. गोष्टींच पुस्तक होतं ते.
त्याचं म्हणन असं की गोष्टींची पुस्तकं इथेच ग्रंथालयात बसून वाचायची. एखादं माहितीपूर्ण पुस्तक असेल तरचं घरी घेऊन जाण्यास परवानगी आहे.
राष्ट्रपुरुषांची चरित्रे त्या लगेच साईन करून द्यायच्या. मला हवं आहे असा मी हट्ट धरला. त्या बाई जोरात खेकसल्या माझ्यावर. तिने ते पाहिलं. गेली सगळी इज्जत.
त्याक्षणी बाई माझ्या सगळ्यात मोठ्या शत्रू ठरल्या. तसंच पाय आपटत निघून आलो. माझा एक वर्गमित्र वाचनाचा व्या संगी वगैरे होता. दिसेल ते पुस्तक वाचायचा.
त्याला सगळ्या सवलती मिळायच्या. हवं ते पुस्तक घरी घेऊन जायला परवानगी असायची.
चो म डे पणा ही त्याची अत्यंत घाण सवय. मित्रांमध्ये बसलो असताना मी तावा तावात म्हणालो, “त्या ग्रंथालयातील बाईंची मुख्याध्यापकांकडे तक्रारचं करणार आहे. पुस्तक देत नाहीत म्हणजे काय. सरांना सांगतो त्यांना नोकरी वरून काढून टाका. त्या मुलांवर फार चिडचिड करतात.”
यातलं मी काहीही करणार नव्हतो आणि केलं जरी असतं तरी मुख्याध्यापकांनी माझं थोडीच ऐकलं असतं.
या चो म डया ने मात्र हे आहे तसं त्या बाईंना जाऊन सांगितलं. मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी मी ग्रंथालयात गेलो. डाव्या हातात गुंडाळलेली पोळी घेऊन हे साहेब पुस्तक वाचत बसलेले.
थाट सगळा राजेशाही. बाईंनी टेकण्यासाठी यांना उशी दिलेली. मी आलेलो बघताच बाईची पुटपुट चालू झाली. मला म्हणे, “काय रे, तू मला नोकरी वरून काढून टाकायला सांगणार का.” मला घामचं फुटला.
चो म ड्या ने अंगातीलं ही कर्तबगारी दाखवून टेकायला उशी मिळवली याचा पक्का अंदाज आला. त्या दिवसानंतर मी कधीही गेलो की बाईंच तोंड मात्र मला पाहिलं की वाकड व्हायचं.
मित्रांमध्ये बसून गोष्टी, किस्से सांगायची मला फार आवड. एखादा तास ऑ फ असला की तिथेच बेंचवर आम्ही सुरु व्हायचो. मधल्या सुट्टीमध्ये मी मित्रांसोबत बाहेर झाडाखाली डबा खाण्यासाठी गेलेलो.
तिकडे छान वाटायचं. सगळीकडे उन पडलेलं असलं तरी त्या झाडाखाली मस्त थंडगार वाता वरण. दहा मिनिटांत डबा खायचा आणि थोड्यावेळ तिथेच बुंध्याशी अंग टाकून द्यायचं.
घंटा वाजली आणि आम्ही वर्गात आलो. माझ्या बेंचवर एक गोष्टीचं पुस्तक दिसलं. मी मित्रांना विचारलं की हे तुम्ही आणलंय का.
प्रत्येकजण नाही म्हणत होता.कुणी ठेवलं मग? ग्रंथालयातलं पुस्तक होतं ते. माझं सहज तिच्याकडे लक्ष गेलं. पहिल्यांदाचं ती माझ्याकडे पाहून हसली आणि डोळ्यांनी होकारार्थी इशारा केला.
आनंदाच्या भरात मी चो म ड्या ला करकचून मिठी मारली. त्याचा चेहरा मात्र सुकलेल्या डाळींबासारखा झालेला.
– अभिनव बसवर