मित्रांनो,
आईवडिलांना आपल्या प्रेमाबद्दल सांगण्याची तिची हिंमत होत नव्हती. त्यात दोघांची जा त देखील वेगळी. शेवटी त्या संध्याकाळी तिने हिंमत करुन घरी सगळं सांगितलच.
हे ऐकताच तिच्या आईने जोरजोराने डोक्यावर हात मारून घ्यायला सुरूवात केली. वडिल शांत बसले होते. त्यांनी मुलगा काय करतो याची विचारपूस केली.
तो अजून तितका सेट ल नव्हता आणि स्वतःच घरदेखील नव्हतं. लग्नानंतर तिला गावाकडील घरी राहावं लागलं असतं. आयुष्यभर ति शहरात वाढलेली, तिला गावाकडे वगैरे राहणं जमलं नसतं. त्यामुळे वडिलांनी नकार दिला.
ति रूसून बसलेली पाहुन, आईने स्वतःच्या जीवा चं ब रं वाईट करुन घेईल अशी तिला धम कीच देऊन टाकली. ति अजुनच घाबरली. आईचं आकांड तांडव बघून तिचं डोकं ब धीर झालं.
अनेक दिवस जाऊनही घरच्यांचा निर्णय बदलत नव्हता. दिवसें दिवस घरातील वातावरण अजुनच ग ढु ळ होत चाललेलं. शेवटी तिने त्याला फो न केला आणि नातं तोडण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षाचं नातं अशाप्रकारे तुट ल्यामुळे तोही ढासळला. हळूहळू तिने त्याचे फो न घेणं कमी केलं. उचलला तरी तोड कं मोड कं बोलू लागली. मेसे जे सला सुरुवातीला रि प्ला य देणं बंद केलं. नंतर ब्लॉ कच करुन टाकलं.
गेली 5 वर्षे तो भा वनेच्या भरात सगळं आयुष्य तिच्यासोबत काढण्याची स्वप्ने रंगवत होता आणि एकाएकी पायाखालची जमीनच सरकली.
शेवटी या जगाची री त त्याच्या लक्षात आली की तुमची जा त आणि पैसा सर्वकाही ठरवते. बाकी तुम्ही माणूस म्हणून कितीही चांगले असला तरी या दुनि येला देणं घेणं नाही.
– अभिनव ब.बसवर
अशाच हृदय स्पर्शी कथा रोज वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.