A अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती अशा असतात… स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये…

0
824

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो एखाद्या बाळाचा जन्म झाल्याबरोबर त्याच रास नाव ठेवलं जात. आणि ते नाव ठेवण्यासाठी ज्योतिष शास्राचा उपयोग केला जातो. थोडक्यात काय तर आपलं नाव आपली रास हि जन्मतः ठरलेली असते.

आपला जन्म कोणत्या नक्षत्रात झालेला आहे, कोणत्या दिवशी झालेला आहे या सर्व गोष्टी विचारात घेऊनच आपलं नाव ठेवलं जात. मित्रांनो आपलं जे नाव ठेवतात त्याच जे आद्याक्षर असत म्हणजे पहिले अक्षर असत ते आपलं व्यक्तिमत्व ठरवत असत.

आपला स्वभाव कसा असणार आहे, आपलं वागणं कस असेल, आपलं भविष्य कस असेल अशा अनेक गोष्टी या नावावरून कळत असतात. मित्रांनो आज आपण A वरून सुरु होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो, त्यांना काय आवडत, काय आवडत नाही, त्यांची पर्सनॅलिटी या बाबत जाणून घेणार आहोत.

मित्रांनो ज्योतिषशास्त्र असं मानत कि ज्या व्यक्तींचं नाव A पासून सुरू होत अशा व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये सर्वाधिक महत्व प्रेमाला देतात. त्यांच्यासाठी प्रेम हि भावना सर्वश्रेष्ठ असते. प्रेमाबरोबरच या व्यक्ती नातेसंबंधांना सुद्धा महत्व देतात.

कदाचित या व्यक्ती तुम्हाला पहिल्या भेटीमध्ये रोमँटिक वाटणार नाहीत पण या व्यक्ती सौंदर्य पसंद करणाऱ्या असतात. या व्यक्तींना सुंदर फुले , इमारती, सुदंर माणसे खूप आवडतात. आणि या व्यक्ती स्वतः सुद्धा सुंदर आणि टापटीप राहण्याचा प्रयत्न करत असतात.

खरतर या व्यक्ती निसर्गतः अत्यंत सुंदर असतात. जन्मतः यांना सौंदर्य लाभलेले असते. यांचं एक वैशिष्ट्य असं असत कि या व्यक्ती स्वतःच्या मनातल्या गोष्टी दुसऱ्यांना सांगत नाहीत. यांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी झगडावं लागत. सहज कोणतीही गोष्ट यांना मिळत नाही.

जेव्हा या व्यक्ती मन लावून मेहनत करतात सफल होतात यश प्राप्त होत तेव्हा हे जे यश असत ते अत्यंत मोठं असत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात यश त्यांना प्राप्त होत. वर सांगितल्या प्रमाणे यांना यांच्या जीवनात खूप मोठा संघर्ष करावा लागतो. प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागत.

मात्र सरतेशेवटी विजय हा त्यांचाच असतो. या व्यक्ती यश प्राप्त करताच. मित्रांनो या व्यक्ती धोकेबाज अजिबात नसतात. तुम्ही यांच्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. या व्यक्ती स्वतःहून कोणाला धोका देत नाहीत आणि यांना कोणी धोका दिला तर त्यांचा सहन सुद्धा होत नाही.

आलेल्या परिस्थितीवर मात कशी करायची हे यांना बरोबर समजत. परिस्थिती कशी आहे त्यानुसार कस वागावं याची जाण या व्यक्तींना खूप चांगली असते. आणि म्हणूनच कि काय या व्यक्ती जवळजवळ 99 टक्के लोकांना अतिशय आवडतात.

मित्रांनो या व्यक्ती खूपच धैर्यवान असतात. यांची पसंद सर्वात वेगळी अगदी हटके असते. कुठल्या गोष्टीची निवड करायचं ठरलं तर यांना खूप वेळ लागतो. हे लोक कधीच हार मानत नाहीत. प्रत्येक समस्येवर यशस्वीरीत्या मार्ग काढतात. या व्यक्तींना राग लवकर येतो.

हे लोक मेहनती जरी असले तरी तेवढेच आळशी सुद्धा असतात. त्यामुळे यांची बरीचशी कामे वेळेवर होत नाहीत. कितीही कटू सत्य असुद्या ते सत्य हे लोक ऐकण्यास तयार असतात पण फिरून फिरून बोलणे यांना आवडत नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. आणि तुमच्या मित्र परिवारात किंवा नातेवाईकांमध्ये ज्यांच नाव A वरून आहे त्यांना हि माहिती शेयर करायला विसरू नका.

वरील माहिती ज्योतिषशास्त्राच्या आधारे दिलेली असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. तरी अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here