नमस्कार मित्रानो,
मित्रांनो सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. एकादशी तिथीला केलेले काही उपाय तुमच्या जीवनातील अनेक संकटांना दूर करू शकतात. जी व्यक्ती एकादशीचा व्रत करते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा भगवान श्री विष्णू पूर्ण करतात.
मित्रांनो आज विजया एकादशी आहे. आजची एकादशी हि विशेष आहे कारण हि मंगळवारच्या दिवशी आलेली आहे. मंगळवारच्या दिवशी आलेली एकादशी हि विशेष लाभदायी ठरते. विजया एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने सर्व क्षेत्रात यश प्राप्त होते.
मित्रांनो या दिवशी जर तुम्हाला व्रत करणे शक्य नसेल तर या दिवशी लसूण, कांदा आणि मद्यपान करू नका. कोणालाही अपशब्द बोलू नका, कोणाची निंदा करू नका. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय या दिवशी अवश्य करा.
मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. सूर्याला अर्घ द्यावं आणि श्री विष्णूंची पूजा अर्चा करावी. त्यांना प्रिया असणारी पिवळी फुले, पिवळी फळे व तुळशीपत्र अवश्य अर्पण करा.
लक्षात ठेवा मित्रांनो तुळशीपत्रा शिवाय श्री विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते. आणि आपण जेव्हा नैवैद्य दाखवतो तेव्हा दाखवलेल्या नैवैद्यावर तुळशीपत्र अवश्य ठेवावे. तरच हा नैवैद्य श्री विष्णूंना समर्पित होतो.
आता बघूया मनोकामना पूर्ती साठी, कर्जमुक्तीसाठी कोणता विशेष उपाय आपल्याला करायचा आहे. एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने एक स्वस्तिक काढायचा आहे.
सोबतच तुळशीजवळ एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. मित्रांनो तुळशीला प्रदक्षिणा घालताना एक मंत्र सुद्धा बोलायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय.
हा मंत्र जप करतच तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता बघूया या दिवशी रात्री झोपताना आपल्याला उशीखाली काय ठेवायचं आहे. ज्यामुळे कर्जमुक्ती होऊन आपल्याला धनप्राप्ती होईल.
मित्रांनो शास्त्रात असे सांगितले आहे कि ज्या व्यक्तींना स्वर्णदान करणे शक्य नसेल त्या व्यक्तींनी जवसाच दान करावं. यामुळे स्वर्णदान केल्याचं पुण्य मिळत. तंत्रशास्त्रा मध्ये सुद्धा घरात सुख शांती येण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी जवसाचे अनेक तोडगे सांगितलेले आहेत.
तर याच जवसाचा उपाय आज आपण पाहणार आहोत. एकादशीच्या दिवशी रात्री झोपताना एका लाल कपड्यात मूठभर जवस बांधून ती पुरचुंडी आपल्या उशीखाली ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी हे जवस पक्षांना खायला टाकायचे आहेत.
असे केल्याने कर्जमुक्ती निश्चितच होते. तसेच आपण जर श्री विष्णूंच्या पूजेमध्ये त्यांना जवस अर्पण केले तर ते स्वर्ण समान मानलं जात. यामुळे घरात धनाच आगमन होत. अनेक मार्गांनी पैसा घरात येऊ लागतो.
प्रत्येक कार्यात, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त होतो. म्हणूनच या एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात. साक्षात श्री रामांनी सुद्धा हे व्रत केले होते. या व्रताच्या प्रभावानेच श्री रामांनी रावणावर विजय मिळवला होता.
तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या विजया एकादशीच्या दिवशी वर सांगितलेले उपाय अवश्य करा. उपाय अगदी साधा आहे तो तुम्ही सहज करू शकता. याचा तुम्हाला नक्कीच सकारात्मक अनुभव येईल.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.