नमस्कार मित्रांनो,
राशिभविष्य सुरु करण्यापूर्वी जाणून घेऊया आजचे पंचांग. तारिक 8 एप्रिल 2021, तिथी – द्वादशी, वार – गुरुवार, नक्षत्र – शतभिष, योग – शुभ, करण – कौलव. आजचा राहुकाळ दुपारी 1 वाजून 58 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 33 मिनिटांपर्यंत आहे. या काळात कोणतेच शुभ कार्य करू नये.
आजचा संपूर्ण दिवस दगदगीत जाईल. थोडा हटके विचार करा. औद्योगिक स्थिरता सांभाळावी लागेल. कामात थोडे बदल करून पाहावे लागेल. तुमच्या स्वतःच्या आवडी निवडी बद्दल दक्ष राहावे लागेल.
स्वतःची उत्तम छाप पाडता येईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. तरुण वर्गात रमून जाल. नवीन मित्र जोडले जातील. आरोग्याबाबत जागरूक राहावे लागेल. एकूणच शुभ दिवस राहील.
वृषभ रास
कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मनात नसले तरी त्यांच्याशी गोड बोलावे लागेल. आज अचानक धन लाभ होऊ शकतो. तुमच्या आवडी निवडी आज पूर्ण कराल. दिवस खेळकरपणात घालवाल. मनोरंजनाकडे तुमचा आज कल राहील. सर्व कामे मनाजोगी पार पडतील.
मनाजोगी खरेदी कराल. सर्वांना आपलंस कराल. छोट्या छोट्या सुखात सुद्धा अति आनंदी व्हाल. मोठ्या व्यक्तींची गाठ भेट होण्याची शक्यता आहे. त्यांचा मोलाचा सल्ला तुम्हाला भेटेल. परंतु आज शुल्लक गोष्टींवरून नाराज होऊ नका आणि रागावर नियंत्रण ठेवा.
मिथुन रास
आज कौटुंबिक सुखात वाढ होईल. पत्नीची उत्तम साथ मिळेल. उत्तम निद्रा सौख्य मिळेल. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. मनातल्या गोष्टी मनातच ठेवण्याचा प्रयत्न करा. जवळचे मित्र भेटण्याचे योग आहेत.
आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात प्रगतीचे पाऊल टाकाल. एखादी मौल्यवान वस्तू खरेदीचे संकेत आहेत. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडावे. जोडीदाराला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करावा.
कर्क रास
आज चारचौघात तुमचे कौतुक होईल. जोडीदाराचे मत आज तुम्हाला मान्य करावे लागेल. थोडाफार मनोरंजनाकडे तुमचा कल ठेवा. जवळच्या प्रवासाची शक्यता आहे. प्रवासात लागणाऱ्या वस्तू जवळ ठेवाव्या. मनातील इच्छा आज पूर्ण होतील. कलाकारांना शाब्बासकी मिळेल.
वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आज तुम्ही कामाचा परिपूर्ण आनंद घ्याल. परंतु आज थोडा अपचनाचा त्रास जाणवू शकतो त्यामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. जेवण वेळेत करावे आणि शक्यतो फळे खावीत.
सिंह रास
कौटुंबिक वातावरण आज प्रसन्न राहील. आवडीच्या गोष्टी करायला निवांत वेळ मिळेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा आज वाढेल. अंगभूत कलेचे कौतुक केले जाईल. नवीन वाहन खरेदीचे योग जमून येत आहेत.
परंतु प्रवास करताना सावध राहावे. घरगुती समस्या जाणून घ्याव्यात. जोडीदाराचे प्रेम मिळेल. भागीदारीत जोडीदाराची एखादी नवी योजना राबवू शकता. अनेक मोठ्या व्यक्तींशी ओळखी होतील. एकूणच शुभ दिवस राहील.
कन्या रास
आज इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची उत्तम छाप आज इतरांवर पडेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. तुमच्या मुलांच्या मतांचा विचार करावा. जोडीदाराच्या आग्रहाला मान द्यावा लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
आज तुम्ही तुमच्या भावंडाना मदत कराल. कामाला चांगली गती प्राप्त होईल. हातात नवीन अधिकार येतील. स्वतःच्याच मतावर ठाम रहाल. परंतु वेळेचे योग्य नियोजन करावे. प्रिय व्यक्तीची साथ मिळेल.
तूळ रास
आज तुमच्या मनाची चंचलता वाढेल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पित्ताचे विकार बळावू शकतात. परंतु व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आरोग्यात सुधारणा होईल. कौटुंबिक प्रश्न आग्रहाने सोडवावे लागतील.
अनावश्यक खर्च टाळावे. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. जवळच्या मित्रांशी भेटी गाठी होऊ शकतात. परंतु मित्रांकडून फसवणुकीचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे आधीपासून सावध राहावे.
वृश्चिक रास
हातात असलेले अधिकार आज बजावण्याची गरज आहे. जोडीदाराचे कौतुक कराल. तुमच्यातील मैत्रीची घनिष्टता वाढेल. प्रेम संबंध अधिक दृढ होतील. भागीदारीतून उत्तम लाभ मिळेल. जवळच्या व्यक्ती जवळ मन मोकळे करता येईल. तसा विश्वास ठेवावा.
जवळचे प्रवास होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायात उत्तम लाभ होईल. अचानक धन लाभाचे योग आहेत. मुलांच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. घरगुती कामे उत्तम रित्या पार पाडाल.
धनु रास
बोलताना आज विचार करून बोलावे लागेल. तुमच्या बोलण्याने समोरचा व्यक्ती दखवणार नाही याची काळजी घ्या. वस्तूंची गरज असेल तरच खर्च करावा. जवळच्या मित्रांच्या गाठी भेटी होतील. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्यावी लागतील.
डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी लागेल. धार्मिक कामात तुमचा सहभाग होईल. अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा लागेल. घरात टापटीप स्वछता ठेवाल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल प्रेम मिळेल.
मकर रास
सामाजिक कामात मदत कराल. परोपकाराची जाणीव ठेवावी. इतरांना तुम्ही आज मदत कराल. तुमच्या हातून दान धर्म होण्याची शक्यता आहे. उष्णतेचे विकार वाढू शकतात. खाण्या पिण्याच्या वेळा पाळाव्या लागतील.
स्वतःची उत्तम छाप पाडता येईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. मित्र वर्गात तुमची वाह वाह आज होण्याची शक्यता आहे. नवीन मित्र जोडले जातील.
कुंभ रास
एखाद्या सामूहिक गोष्टीत किंवा कोणाच्या भानगडीत स्वतःहून लक्ष घालू नका. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल. बोलण्याच्या भरात एखादी जबाबदारी स्वतःवर ओढवून घेऊ नका. आज अचानक धनलाभाचे योग आहेत. बाग बगीच्याच्या कामात मन रमेल. मनातील इच्छा आज पूर्ण होतील.
कामात एखाद प्रगतीच पाऊल टाकाल. मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याचे संकेत आहेत. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आज आशीर्वाद मिळेल. आपल्या प्रिय व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
मीन रास
आज तुम्ही बौद्धिक कौशल्य दाखवाल. तुमच्या हस्तकलेचे कौतुक केले जाईल. मित्रांशी मतभेद होण्याचे संकेत आहेत. जोडीदाराचा उत्तम सहवास लाभेल. मनमोकळ्या पणाने गप्पा गोष्टी होतील. छोट्याश्या सुखाने तुम्ही खुश व्हाल.
एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची गाठ होण्याची शक्यता आहे. परंतु रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमची काम आज मनाजोगी पार पडतील. परंतु शुल्लक गोष्टीवरून नाराज होऊ नका. मित्र मैत्रिणींच्या गाठी भेटी होणार असून प्रेमात तुम्हाला यश मिळेल.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.