नमस्कार मित्रांनो,
मित्रानो बऱ्याचदा असं होत कि आपल्या घरातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने न वागता भांडखोर वृत्तीने वागू लागतात. छोट्या छोट्या कारणांवरून घरातील लोकांमध्ये भांडणे उदभवतात, वाद विवाद होतात. परिणामी घरात अशांती पसरते.
सासू सुनेमध्ये होणारे वाद, भावभावात होणारे वाद, भाऊ बहिणींमध्ये पटत नसेल किंवा अगदी पिता आणि पुत्र यांचं सुद्धा बर्याचदा जुळत नाही परिणामी यासर्वांतून वाद निर्माण होतात.
मित्रांना जे आपले सगेसोयरे आहेत जे आपले रक्ताचे आहेत त्यांच्या सोबत वाद होण्याचा कारणच काय आहे? ज्यांच्याशी आपण अगदी प्रेम भावनेने, समजुदारपणे वागलं पाहिजे त्यांच्याशी असे वाद का बर होत असतील?
मित्रांनो जरासं आपण आपल्या घरातील वास्तूमध्ये डोकावून या प्रश्नच उत्तर शोधायला हवं. कधी कधी आपल्या घरातील वास्तू मध्ये असे काही दोष असतात कि या दोषांमुळे आपल्या घरात अशांती, नकारात्मकता पसरते. परिणामी राहणाऱ्या व्यक्तींचे मानसिक संतुलन बिघडून आपसात वाद होतात.
मित्रानो आपण जरी समजूतदारपणा दाखवून माघार घेतली तरी समोरचा माघार घेत नाही तर याला कारण म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष. तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत असे कोणते वास्तुदोष असतात ज्यामुळे आपल्या घरात भांडणे होतात.
मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या घरातील ईशान्य कोपरा पाहायचा आहे. या ईशान्य कोपऱ्यात जर आपण नको असलेल्या वस्तू ठेवल्या असतील जसे कि भंगार, तुटलेल्या फुटलेल्या वस्तू , स्टोअर रूम इत्यादी. अशा नको असलेल्या गोष्टी जर ईशान्य कोपऱ्यात असतील तर त्या ताबडतोब तिथून हलवा.
ईशान्य कोपऱ्यात जर या नको असलेल्या गोष्टी असतील तर आपल्या घरात प्रचंड मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जेचा उत्सर्ज होत असतो. त्यामुळे घरातील सुख शांती दूर होते. घरात शांततामय वातावरण हवं ते राहत नाही.
मित्रानो बऱ्याच घरांमध्ये ईशान्येचा कोपराच नसतो. राहायला जागेची कमतरता असल्यामुळे लोक हव्या त्या आकारात घर बनवतात. आणि अश्या बऱ्याच घरांना ईशान्य कोपराच नसतो.मित्रांनो जर आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात डोकावून बघा जर तो काढून टाकलेला असेल तर मात्र सावधानता बाळगणे जरुरी आहे.
ज्या घरात ईशान्य कोपराच नसतो त्या घरात कधीही सुखशांती लाभत नाही. अशा घरात पिता आणि पुत्र यांच्यात सतत भांडणे होत असतात. पिता आणि पुत्र एकमेकांवर विश्वास ठेवत नाहीत यांच्यात अविश्वासाचा वातावरण सतत राहत. आणि म्हणून ईशान्य कोपरा आपल्या घराला असायलाच हवा.
मित्रांनो ईशान्य कोपऱ्यामध्ये गर्मी उत्पन्न करणारे उपकरण जसे कि गॅस, ओव्हन त्या ठिकाणी ठेवू नका आणि टेबल फॅन, फ्रिज असे थंडावा उत्पन्न करणारे सुद्धा ठेवू नका. असं असल्यास घरातील जो मुलगा आहे तो आज्ञाधारक निघत नाही. मुलगा वडिलांचे ऐकत नाही परिणामी दोघांत वाद होतात.
मित्रांनो जो प्लॉट आपण विकत घेतला आहे ज्या प्लॉट वर आपण आपल्या घराचे बांधकाम केले आहे तो प्लॉट सूर्यभेदी नसावा. सूर्यभेदी म्हणजे ज्या प्लॉट ची लांबी हि पूर्व पश्चिम जास्त असते आणि उत्तर दक्षिण कमी असते.
असा जो निमुळता प्लॉट असतो अशा प्लॉटला सूर्यभेदी प्लॉट म्हणतात. मित्रांनो अशा प्रकारच्या घरात सुद्धा सतत अशांतता पसरलेली असते परिणामी त्या घरात वाद विवाद होत राहतात.
मित्रांनो ईशान्य कोपऱ्यामध्ये चुकूनही कचरा कुंडी ठेवू नये. अनेक जण कचरा कुंडी ठेवण्यासाठी हा कोपरा वापरतात. या कोपऱ्यात कचरा कुंडी ठेवल्याने घरातील सदस्यांमध्ये ईर्षा भाव निर्माण होतो ते एकमेकांचा तिरस्कार करू लागतात.
एकमेकांमध्येच स्पर्धा निर्माण होते, जळू वृत्ती निर्माण होते. राग आणि लोभ हे दोन मोठे दुर्गुण घरातील सदस्यांमध्ये वाढतात. आणि म्हणून मित्रांनो वर सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
ईशान्य दिशेचा आज जो उपाय सांगितला तो तुम्ही नक्की करून बघा. खात्रीशीर तुमच्या घराला समाधान लाभेल, घरातील वाद विवाद कमी होतील
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.