नमस्कार मित्रांनो
मित्रानो आज या लेखात आम्ही तुम्हाला सात धावत्या घोड्याचे चित्र कुठे आणि कसे लावावे याबद्दल माहिती देणार आहोत. बर्याच ठिकाणी आपल्याला हे चित्र लावलेले दिसले असेल. परंतु, काही ठिकाणी हे चित्र फक्त लावायचे म्हणून लावलेले असते, कारण काहींना माहीतच नसत की हे चित्र लावण्याची योग्य दिशा कोणती आहे.
सात धावत्या घोड्यांची ही जी फ्रेम आहे, ती खूप ठिकाणी आपण बघतो, पण त्याचे फायदे-तोटे हे कोणाला जास्त माहीत नसतात. केवळ लावायची म्हणून ती फ्रेम त्या ठिकाणी लावली जाते. आणि म्हणूनच, त्या फ्रेमचा फायदा अनेकांना होत नाही.
मित्रांनो, आज आपल्याला तेच जाणून घ्यायचे आहे की, ही फ्रेम आपल्याला कुठे लावायची आहे आणि कशी लावायची आहे. हे सात घोड्यांचे चित्र जे आहे ते लावण्यासाठी सगळ्यात उत्तम दिशा कोणती ? तर ती दिशा म्हणजे दक्षिण दिशा.
दक्षिण दिशेच्या भिंतीलाच हा फोटो लावायचा असतो, दुसरे कोणतेही स्थान याच्यासाठी योग्य नसते. पण जर जागेअभावी ते शक्य नसेल, तर तुम्ही हा फोटो पश्चिम दिशेला देखील लावू शकता. पण जर सगळ्यात उत्तम दिशा जर कोणती असेल तर ती दक्षिण दिशा असते.
आता हा फोटो कसा लावायचा आहे? तर हे जे घोडे आहेत, त्याचं तोंड हे आपल्या घराच्या आतल्या बाजूला असले पाहिजे. घराच्या आत म्हणजे त्यांचे चेहरे हे घराच्या बाहेरच्या साईडला नाही आले पाहिजे. तर असे करण्याने काय होईल की, ह्या फोटो मुळे आपली प्रगती होणार आहे.
या चित्रामुळे जी काही घरातील नकारात्मकता असेल ती बाहेर जाईल. घराच्या आत नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो कि सात घोड्यांचे चित्रच का लावतात? आठ घोड्यांचे चित्र का नाही लावत? किंवा एका घोड्याचे चित्र का नाही लावत?
तर मित्रांनो, त्याच कारण अस की, सात हा आकडा प्राकृतिक आहे. प्राकृतिक चा अर्थ म्हणजे, सात रंगाचे इंद्रधनुष, सप्तरंगी इंद्रधनुष्य, सप्तर्षी, सात फेरे, सात जन्म, ह्या सगळ्यात कुठेतरी सात हा आकडा असतो, आणि तो इतका शुभ आहे की, जर तुमच्या जन्मतारखेची बेरीज जरी सात होत असेल, तर तुमचं नशीब खूपच चांगल आहे आणि तुम्हाला नशीबाची नेहमीच साथ आहे.
आता ह्या घोड्याचे चित्र का लावायचे आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, घोडा अतिशय चपळ आणि तरबेज असतो . घोडा हा अतिशय ऊर्जावान असा प्राणी आहे.
त्याच्यामुळे आपल्याला खूप ऊर्जा प्राप्त होते, आणि आपण त्या चित्राकडे पाहिलं की आपल्यालाही असे वाटते की, आयुष्य कधी थांबायलाच नको. आणि म्हणूनच आपल्याला सात घोड्यांचे चित्र हे आपल्या घरामध्ये लावायच आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
वरील माहिती हि वास्तू शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.