नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो प्रत्येकाला श्रीमंत बनायचं असत, कुणी आपल्या स्वतःसाठी, कुणी घरच्या लोकांसाठी श्रीमंत बनतात. श्रीमंत बनण्याचे मार्ग अनेक असतात. आपल्या हिंदू धर्म शास्त्रानुसार काही अशा गोष्टी असतात ज्या केल्याने आपण नक्कीच धनवान बनू, उत्तरोत्तर आपली धनसंपत्ती वाढतच राहील. असे हे चमत्कारिक उपाय प्रत्येकाने करून पहायला हवेत ज्यामुळे तुम्ही धनवान नक्कीच बनाल.
हा उपाय केल्यास आपल्याला माता लक्ष्मी चा आशीर्वाद सदैव लाभेल, आपल्यावर माता लक्ष्मीचा वरदहस्त नेहमी राहील. तसेच तुमचा समाजात मान सन्मान वाढेल. सर्व लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. कोणतीही बाधा होणार नाही व तुमच्या कामात तुम्हाला भरपूर यश मिळेल.
मित्रांनो पहिला उपाय तुम्ही रोज करू शकता. स्त्रियांनी व पुरुषांनी ज्यांना नोकरी व्यवसायात अडचण आहे किंवा ज्यांना अडचण नसेल ते सुद्धा करू शकतात. आपल्याकडे असणाऱ्या पैशांमध्ये अधिक भरभराट यावी यासाठी हा उपाय नक्की करत रहा. महिलांनी त्यांचा मासिक धर्म वगळता रोज करावे.
मित्रांनो धनाची देवता माता लक्ष्मी ला घरी देवपूजा झाल्यावर रोज तिच्या चरणी कोणतेही लाल रंगाचे फुल अर्पण करा. हे फुल गुलाबाचे असेल, जास्वंदी किंवा गुलाब इतर कोणतेही लाल रंगाचे फुल अर्पण करावे. मनोभावे प्रार्थना करावी तसेच दुधाचा कोणताही पदार्थ तुम्ही माता लक्ष्मी ला प्रसाद म्हणून दाखवा.
दुसरा उपाय हा वडाच्या झाडा संबंधित आहे. शास्त्रात वडाचे, पिंपळाचे झाड अत्यंत महत्वाचे मानले जाते. या झाडाजवळ जाऊन त्याचे दर्शन घ्या व तेथील पारंब्या ज्या असतात एका ठिकाणी गाठ बांधा ही गाठ बांधताना तुम्ही तुमच्या मनातील संपत्तीची इच्छा त्वरित बोला व पुन्हा वडाच्या झाडाला नमस्कार करून न बोलता सरळ घरी या. या उपायाने देखील तुमच्या कामात यश येते. भरभराट होते.
तिसरा उपाय तुम्हाला शुक्ल पक्षात करायचा आहे, प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात त्यामधील शुक्ल पक्षाच्या पहिल्या शुक्रवारी हा उपाय करा. जवळच्या एखाद्या लक्ष्मी नारायण किंवा लक्ष्मीचे असेल तर माता लक्ष्मीच्या मंदिरात तुम्ही जा व माता लक्ष्मी चे दर्शन घ्या. तेथील भाविकांना खडीसाखर वाटप करा.
एका कुमारीकेला म्हणजेच अशी कन्या जी 8 ते 10 वयोगटातील असेल, जी माता लक्ष्मीचं साक्षात रूप मानली जाते, तिला लाल रंगाचे रेशमी वस्त्र दान करा. असा हा उपाय तुम्ही सलग 3 शुक्रवारी करा. यामुळे देखील तुमची सर्व स्वप्ने माता लक्ष्मी पूर्ण करेल.
मित्रांनो चौथा उपाय असा की सोमवारी हा उपाय करावा, शिवमंदिरात जाऊन हा उपाय करावा. स्मशा नभूमीजवळ जर शिव मंदिर असेल किंवा इतर कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरात सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जा. जाताना शुद्ध जल एक कलश व त्यामध्ये गोमतेचे कच्चे दूध थोडेसे व 2 चमचे मध टाका व नमः शिवाय या मंत्राचा जप करत हा अभिषेक शिवलिंगावरती करावा.
अभिषेक झाल्यावर नमस्कार करून लगेच सूर्य बुड ण्यापूर्वी घरी या. हा उपाय केल्यास भोलेनाथ सदैव कृपा ठेवतील व तुम्हाला अचानक धनलाभ कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्की होईल.
पाचवा उपाय जो तुम्हाला धनलाभ करून देतो तो म्हणजे सलग सोळा महिने श्रीसुक्त पठण केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, सर्व इच्छा पूर्ण होतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.