नमस्कार मित्रानो,
मित्रानो आपल्या हिंदू धर्मात दान करण्याला फार महत्व आहे. दान केल्याने आपले पुण्य वाढते. असे म्हणतात कि आपण जे काही दान करतो त्याच्या 100 पटीने फळ भगवंत आपल्याला देत असतात. दान करण्याचे इतके महत्व असूनही काही वस्तू अशा आहेत ज्यांचे दान चुकूनही करू नये.
जर आपण या वस्तूंचे दान केले तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते. विशेषतः संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ता नंतर काही वस्तूंचे दान अजिबात करू नये. दान करणे म्हणजे फक्त गरिबाला देतो ते दान नव्हे तर आपले शेजारी पाजारी, नातेवाईक कधी कधी एखाद्या वस्तूची आपल्याकडे मागणी करतात.
साहजिकच त्यांना त्या वस्तुची गरज असते म्हणून मागतात परंतु आपली कितीही जवळची व्यक्ती असुद्या या 5 वस्तूंचे सूर्यास्तानंतंर चुकूनही दान करू नका. असे केल्यास देवी माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊन आपल्या घरातील बरकत संपुष्टात येते. आपल्या घरात धनधान्यात कमतरता निर्माण होते. अन्नधान्य पुरत नाही.
जर वारंवार आपण या गोष्टींचे दान करीतच राहिलो तर आपल्याला भयंकर आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. आपल्या घरात बरकत पुन्हा कधीच येत नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू.
दही
मित्रानो दह्याचा संबंध हा डायरेक्ट शुक्र ग्रहाशी येतो. शुक्र ग्रहामुळे आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होत असते. म्हणून दही आपल्याला सुख समृद्धी प्रदान करण्याचे काम करते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सुद्धा असा उल्लेख येतो. म्हणून संध्याकाळी सूर्यास्तानंतर दही कोणाला सुद्धा देऊ नये.
ज्या व्यक्ती संध्याकाळी दह्याचे दान करतात त्यांच्या घरातून सुख व समृद्धी निघून जाते व ती व्यक्ती कंगाल होते. म्हणून लक्षात ठेवा चुकूनही कोणाला सूर्यास्तानंतर दही देऊ नका. अगदी ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी.
दूध
मित्रानो दुधाचा संबंध हा सूर्यदेव आणि चंद्रदेवांशी येतो. तसेच श्री हरी विष्णू व देवी लक्ष्मी यांचा सुद्धा संबंध दुधाशी येतो. म्हणून संध्याकाळी सूर्यास्तानंतर दुधाचे दान करणे म्हणजे साक्षात आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या पाठवणे होय. यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाते.
पैसा आणि मौल्यवान वस्तू
सोने, चांदी, पैसा इतर मौल्यवान वस्तूंचे दान सूर्यास्तानंतर करू नये. आपण पैशांना तसेच धनसंपत्तीला देवी समान मानतो. संध्याकाळीची वेळ हि देवी लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. म्हणूनच आपण संध्याकाळी आपले मुख्य द्वार उघडे ठेवतो. अशावेळी जर आपण पैसे किंवा धनसंपत्तीचे दान केले तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते.
हळद
आपल्या सर्वाना माहीतच असेल कि हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी येतो. त्याशिवाय हळदीला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु ग्रह मजबूत असतो त्यांच्या जीवनात भरपूर सुख समृद्धी व धनसंपत्ती येते.
परंतु जर आपण संध्याकाळी सूर्यास्तानंतर हळदीचे दान केले तर आपला गुरु ग्रह कमजोर होतो व आपल्या धनसंपत्तीला हानी पोहचू शकते. गुरु ग्रह कमजोर झाल्यामुळे आपल्या घरात पैशांची अडचण निर्माण होते. आर्थिक समस्या निर्माण होतात. म्हणून संध्याकाळी सूर्यास्तानंतर चुकूनही कोणाला हळद देऊ नये.
कांदा किंवा लसूण
आपल्याला वाटेल कि आपण सर्रास कांदा व लसूण इतर कोणाला देत असतो. परंतु लसूण व कांद्याचा थेट संबंध हा केतू ग्रहाशी आहे. हा ग्रह करणी, तंत्र मंत्रांसाठी जास्त प्रभावी आणि परिणामकारक असतो. आपल्या आसपास असे अनेक व्यक्ती असतात जे आपल्या बरोबर चांगले बोलतात परंतु मनातून ईर्षा व्यक्त करतात.
असे अनेक जण असतात ज्यांना आपले चांगले झालेले आवडत नाही. म्हणून कांदे लसूण यांचा वापर करून ते आपल्यावर जादू टोणा, करणी, तंत्र मंत्राचा प्रयोग करू शकतात. आणि आपल्याला त्रास देऊ शकतात. म्हणून कधीही संध्याकाळी सूर्यास्तानंतर कांदे व लसूण कोणाला दान म्हणून देऊ नये. सूर्यास्तानंतर कांदे लसूणाचे दान करणे हे धर्मशास्त्राप्रमाणे देखील अशुभ मानले जाते.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.