नमस्कार मित्रांनो,
हिंदू गरुड पुराणानुसार माणसाचा पुनर्जन्म होतो. व्यक्ती मृ त झाल्यावर ठराविक काळानंतर, प्रक्रियेनंतर त्याचा पुनर्जन्म होतोच.
पण खरंच आपला पुनर्जन्म होतो का. यावर काही लोकांची शंका आहे. जरी तुमचा पुनर्जन्मावर विश्वास नसला तरी या जगामध्ये असे काही लोक आहेत अजूनही आहेत की त्यांना आपल्या पूर्वीच्या जन्माच्या सगळ्या घटना अगदी तंतोतंत आठवत आहेत.
योग, ध्यान साधनेने हे त्यांनी साध्य केले आहे. हिंदू धर्मानुसार व्यक्तीचा पुनर्जन्म होतो, अशा काही गोष्टी आहेत, असे काही संकेत आहेत जे माहीत झाल्यावर तुम्हीही पुनर्जन्मावर नक्कीच विश्वास ठेवाल.
मित्रांनो असे कधी झालं आहे काय की तुम्हाला वारंवार एकच स्वप्न पडतंय, की ज्यामध्ये तुम्हाला असे लोक दिसतात की तुम्हाला हे लोक ओळखीचे वाटतात पण या जन्मात तुम्ही या लोकाना कधीही पाहिले नाही. आपण त्यांच्याशी बोललेलो नाही.
पण तरीही हे लोक तुम्हाला तुमच्या जवळचे वाटतात, तर समजून जा की हे स्वप्न तुम्हाला तुमच्या पुनर्जन्माकडे इशारा करते आहे.
तसेच एखाद्या गोष्टीची विनाकारण भीती वाटणे, यामध्ये एखाद्या व्यक्तीला पाण्याची भीती वाटते किंवा रात्रीची भीती वाटते. एखाद्या व्यक्तीला उंचीची भीती वाटतेय . या गोष्टींना जरी या जन्मात घाबरत नसलो तरीही अनामिक भीती मनात दडलेली असते.
पुनर्जन्माच्या बाबतीत काही अशा घटना घडल्या आहेत की जसे आधीच्या जन्मात तुमचा मृ त्यू जर पाण्यांत बुडुन झाला असेल, किंवा एखाद्या उंच इमारती वरून खाली पडला असाल, किंवा काळोखात काही घटना घडली असेल तर त्याचा परिणाम म्हणून आज त्या गोष्टीची भीती अजूनही तुम्हाला वाटतं असते.
आणि हेच या गोष्टी चे संकेत आहेत की तुमचा पुनर्जन्म झाला आहे. असेही बऱ्याचदा घडते की एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला काही कारणास्तव भेटते आणि अचानक ती ओळखीची, जवळचीच कुणीतरी असल्याचा भास होतो, परंतु ती व्यक्ती पूर्णपणे अनोळखी असते.
तसेच काही वेळा आपल्याला पुढे काय होणार आहे हे आपल्याला आधीच समजते. शास्त्रीय भाषेत याला सि क्स्थ से न्स असे म्हणतात.
तसेच एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला खूप प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाटतं असेल तर त्या गोष्टीचा आणि तुमचा जवळचा संबंध मागच्या जन्मी असू शकतो.
जसे की तुम्हाला जर वाचनाची आवड आहे तसेच पोहण्याचा व नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात, आपण या जन्मात नविन पुस्तके दिसले की वाचनाची आवड असल्याने लगेच वाचायला घेतो.
तलाव विहिर दिसली की पोहावस वाटते अशी एखादी आवड असेल तर तुम्ही समजून जा की, ज्या गोष्टी प्रकर्षाने तुम्हाला खेचून घेतायत त्याअर्थी आधीच्या जन्मात तुम्ही या गोष्टीत नक्कीच पारंगत, कुशल असणार. आणि पूर्वजन्मातील ते गुण अजूनही तुमच्यात आहेत.
वरील काही असे संकेत आहेत त्यावरून तुमचा पूर्वजन्म व पुनर्जन्म यामध्ये साम्य आढळते. तुमचा पुनर्जन्म झाला आहे हे सिद्ध होते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.