घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात या 5 गोष्टी. आजच सोडा या चुकीच्या सवयी

0
543

नमस्कार मित्रानो

मित्रांनो ज्या घरात सकाळ-सायंकाळ तुपाचा दिवा लावला जातो त्या घरावर सर्व देवी-देवतांची कृपा बरसते. त्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरात गरिबी कधीच नांदत नाही. मित्रांनो माता लक्ष्मीची आपण मनोभावे दररोज पूजा करायला हवी. माता लक्ष्मी धनाची अधिष्ठात्री देवी आहे आणि म्हणून त्यांची पूजा केल्याने आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होतं.

मित्रांनो अनेक जण माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करून सुद्धा गरीबच राहतात. त्यांच्या घरात पैसा येत नाही आलेला पैसा निघून जातो , घरामध्ये गरिबी कायम वास करते. मित्रांनो अशा वेळी आपल्या हातून घडणाऱ्या काही चुका आपण कटाक्षाने टाळायला हव्यात. आज आपण अशा ५ चुका पाहणार आहोत की या चुका आपण केल्या तर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल.

मित्रांनो पहिली जी चूक आहे ती म्हणजे अतिथी देवो भव , म्हणजे पाहुणे हे देवासमान असतात आणि म्हणून जेव्हा कधी तुमच्या घरात पाहुणे येतील त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. मित्रांनो जे लोक पाहुणे आल्यानंतर नाराज होतात त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात आणि जे लोक अतिथींचा अपमान करतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच टिकत नाही.

आपल्याकडे एक प्राचीन परंपरा आहे की पाहुणे आल्यानंतर सर्वात प्रथम त्यांना आपण पाणी द्यावे. मित्रांनो याचं कारण म्हणजे असं केल्याने अनेक अशुभ ग्रहांचा प्रभाव तात्काळ नष्ट होतो. लक्षात घ्या आपलं जे काही जीवन चालू आहे आपलं जे काही भाग्य आपल्याला साथ देत नसेल तर याची कारण म्हणजे जे काही नवग्रह आहे त्या नवग्रहांचा आपल्यावर थेट पडणारा प्रभाव आणि म्हणून अशुभ ग्रहांचा प्रभाव नष्ट होण्यासाठी अतिथी आल्यानंतर त्यांना सर्वात प्रथम पिण्यासाठी आपण पाणी द्यावं.

मित्रांनो दुसरी चूक आपल्यापैकी अनेकांच्या घरांमध्ये मध नक्कीच असेल. होय मित्रांनो मधाला अत्यंत पवित्र मानले जाते हिंदू धर्मामध्ये. ज्या घरांमध्ये मध असते त्या घरात नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. ज्या घरात मध असते त्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सातत्याने प्रवाहित होतो त्या घरामध्ये सुख-समृद्धी येते , बरकत येते मात्र मित्रांनो जर तुम्ही मध ठेवण्याची जागा अस्वच्छ ठेवत असाल तुम्ही मत अशा ठिकाणी ठेवलेला आहे ज्या ठिकाणी स्वच्छता नाहीये.

ज्या ठिकाणी अंधारलेली जागा आहे किंवा तुम्ही मध अशा भांड्यात ठेवलाय अशा बरणीत ठेवलाय की जी बरणी अनेक दिवसापासून धुतलेली सुद्धा नाहीये. त्या बरणीवर मळ साठलेला आहे. तर मित्रांनो अशा वेळी आपल्या घरात मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.आणि अशा का माता लक्ष्मी कधीच टिकत नाही.

मित्रांनो तिसरी गोष्ट अनेक जण माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात मात्र या पूजेमध्ये खंड पडतो. एक दिवस पूजा करायची दुसऱ्या दिवशी करायची नाही किंवा केवळ अमावस्या आणि पौर्णिमेलाच माता लक्ष्मीची पूजा करायची. मित्रांनो लक्षात घ्या समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने बाहेर पडली त्यापैकी एक रत्न म्हणजे माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीचा जन्म हा पाण्यातून म्हणजेच जलातून झाल्यामुळे माता लक्ष्मीचा स्वभाव चंचल आहे. त्या कधीच एका व्यक्ती जवळ किंवा एका ठिकाणी जास्त काळ वास्तव्य करत नाहीत.

म्हणून माता लक्ष्मीला सातत्याने प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा लागतो. माता लक्ष्मीची केवळ एखाद दुसऱ्या दिवशी केलेली पूजा त्यांना प्रसन्न करू शकत नाही. आणि म्हणून आपण आपल्या घरात नेहमी देवपूजा करावी , दररोज देवपूजा करावी. आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णूची मूर्ती किंवा फोटो हा असायलाच हवा.

मित्रांनो ज्या घरात माता लक्ष्मीची पूजा होत नाही त्या घरांमध्ये दारिद्र्य निर्माण होते. ज्या ठिकाणी लक्ष्मी नसते त्या ठिकाणी अलक्ष्मी आपला वास निर्माण करते. अलक्ष्मी म्हणजे काय तर माता लक्ष्मीची मोठी बहीण. मात्र अलक्ष्मी गरिबी , दारिद्र्य , कंगाली यांच प्रतीक आहे. ज्या घरात अलक्ष्मी येते त्या घरात पैसे कधीच टिकत नाहीत.

मित्रांनो चौथी गोष्ट , तुम्ही बाहेरून घरात येताना काही गोष्टींचं पालन आवश्यक करत चला. मित्रांनो आपण बाहेर जेव्हा वावरतो तेव्हा वातावरणामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती असतात. काही सकारात्मक शक्ती असतात तर काही नकारात्मक. मित्रांनो ह्या सर्व शक्ती आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या आपल्याबरोबर आपल्या घरात येत असतात , आणि म्हणून कधीही जेव्हा तुम्ही बाहेरून आपल्या घरात याला तेव्हा आपल्या चपला , आपली बूट ही आपण घराबाहेर सोडावीत.

आजकाल आधुनिक फॅशनच्या जगामध्ये लोक आपल्या चप्पल आणि बूट थेट घरात आणतात. मित्रानो ज्या अर्थी आपल्या पूर्वजांनी आपल्या चपला बूट घराच्या बाहेरच उंबरठ्याच्या बाहेरच काढण्याची सोय केलेली होती याचा अर्थ त्यामागे काही ना काही तरी वैज्ञानिक कारण अत्यावश्यकपणे आहेच आहे.

मित्रांनो या चपला बूट आपल्या बरोबर मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी घेऊन येतात आणि आपला जो उंबरठा आहे हा उंबरठा आपलं घर आणि बाहेरचं वातावरण यामधील लक्ष्मणरेषा आहे. आपल्या घरातली पॉझिटिव्ह एनर्जी ही आपल्या घरातच राहावी आणि बाहेरची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात येऊ नये याची काळजी आपल्या घराचा उंबरठा घेत असतो.

जेव्हा तुम्ही घरात प्रवेश कराल त्या आधी आपल्या चपला आणि बूट घराच्या बाहेरच सोडाव्यात पण दरवाच्या समोरच चपला बूट काढू नयेत. मित्रांनो तुम्ही जेव्हा कधी बाहेरून घरात याल तेव्हा आपल्या घराबाहेर एक पाण्याची बादली अवश्य ठेवा जेणेकरून आपल्याला आपल्या पायांवर पाणी घेऊन मगच आपल्या घरात प्रवेश करता येईल.

पाचवी गोष्ट म्हणजे , वास्तुशास्त्र असं मानत कि ज्या घरात सुगंधित वातावरण असतं त्या ठिकाणी दिव्य शक्ती आपला वास निर्माण करतात , आणि म्हणून आपल्या घरात आपण दररोज साफ सफाई ठेवावी , स्वच्छता ठेवावी , घरातला कोणताही कोपरा घरातली कोणतीही खोली ही अस्वच्छ असता कामा नये.

मित्रांनो सुगंधित वातावरण अशुभ काळाला जास्त वेळ टिकू देत नाही. जर तुमचा वाईट वेळ चालू आहे तर तुमचा काळ अत्यंत खराब चालू आहे तर मित्रांनो घरामध्ये सुगंधित वातावरण ठेवा तुम्हाला दिसेल की ईश्वराचा वास तुमच्या घरात निर्माण होईल. धन येण्याचे नवनवीन मार्ग खुले होतील तुम्ही जे काही काम करत आहात त्या कामांमध्ये यशप्राप्ती होईल. माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर बरसो याच मनोकामनेसह धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here