लग्नासाठी नशिबानेच मिळतात या पाच राशींच्या मुली…

0
741

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असे जरी म्हटले जात असले तरी प्रत्येक मुलाची अशी स्वतःची इच्छा असते. त्याला अशी पत्नी हवी असते कि जी त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी असावी.

त्याला समजून घेणारी आणि परिवाराला घेऊन चालणारी असावी. विवाह फक्त एक संस्कार नसून दोन आत्म्यांना सात जन्मापर्यंत एकत्र बांधणार एक पवित्र नातं असत. विवाह हा दोन शरीराचा नाही तर दोन आत्म्याचं मिलन मानलं जात.

प्रत्येकाच्या मनात आपल्या आयुष्यात येणाऱ्या भावी जोडीदाराविषयी उत्सुकता असते. प्रत्येकाने वेगवेगळी स्वप्ने रंगवलेली असतात. असे जरी असले तरी प्रत्येकाला हवा तसा जोडीदार मिळेलच असे नाही.

लग्नासाठी हवी तशी मुलगी मिळणे तसे अवघडच असते म्हणून बऱ्याच जणांना मिळेल त्यात समाधान मानावे लागते. आणि म्हणून ज्योतिष शास्त्रानुसार असे मानले जाते कि या चार राशींच्या मुली पैकी कोणत्याही एका राशीच्या मुलीसोबत विवाह झाला तर वैवाहिक जीवन चालते.

या राशींच्या मुलींशी विवाह झाला तर जीवनात ताणताणाव फार कमी प्रमाणात जाणवतो. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊन कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

1) मेष रास

मेष हि राशी चक्रातील पहिली राशी असून या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या मुली अतिशय साहसी, पराक्रमी आणि उर्जावान मानल्या जातात. या राशी तेजस्वी असून जे यांच्या मनात असते तेच यांच्या ओठावर असते.

म्हणजे जे मनात असते ते मनात न ठेवता तोंडावर बोलून मोकळ्या होतात. या राशीच्या मुली फारच आकर्षक आणि सुंदर असून कोणाचेही लक्ष अतिशय सहज गतीने खेचून घेतात.

यांच्याकडे पाहून कोणीही सहज आकर्षित होऊ शकतो. जीवनातील जोडीदाराप्रती अतिशय प्रामाणिक आणि इमानदार असतात. संकट काळात आपल्या जोडीदाराला पुरेपुर साथ देतात. आत्मविश्वासाने भरपूर या राशीच्या मुली विवाहासाठी योग्य मानल्या जातात.

2) वृषभ रास

वृषभ राशीच्या मुली अतिशय शांत स्वभावाच्या मानल्या जातात. अतिशय शांत चित्तेने आणि एकाग्रतेने काम करणे यांना पसंद असते. या राशीच्या मुली अतिशय इमानदार, कष्टाळू आणि भावनिक मानल्या जातात.

जीवनातील जोडीदारावर भरभरून प्रेम करतात. लग्नासारख्या पवित्र नात्याला अतिशय चांगल्या प्रकारे निभावतात. नात्याचं महत्व समजून घेऊन परिवारातील इतर लोकांशी प्रेम, सहानुभूती आणि नम्रतेने वागतात.

विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम असणाऱ्या या मुली वेळ प्रसंगी पतीच्या खांद्याला खांदा लावून परिवारासाठी हातभार लावतात. या राशीच्या मुली कष्टाळू आणि कामा प्रति जिद्दी मानल्या जातात.

3) कर्क रास

लग्नासाठी अतिशय उत्तम मानल्या जातात कर्क राशीच्या मुली. असे मानले जाते कि या राशीच्या मुली अतिशय भावनिक असून परिवारासाठी अतिशय भावनिकतेने जोडलेल्या असतात. वैवाहिक नात्याला अगदी चांगल्या प्रकारे निभावतात.

वैवाहिक जीवनात ताणतणाव निर्माण होईल असे कोणतेही काम या मुली सहजासहजी करत नाहीत. या राशीच्या मुली परिवाराला सर्वात जास्त महत्व देतात आणि परिवाराप्रती समर्पित असतात.

या मुली परंपरेला महत्व देणाऱ्या असून जे लोक परंपरेला मानणारे लोक आहेत अशा लोकांसाठी या मुली एक चांगला जोडीदार ठरू शकतात.

4) सिंह रास

सिंह रास हि राशी चक्रातील पाचवी रास असून या राशीचा स्वामी हा सूर्य आहे. हि अग्नितत्वाची राशी मानली जाते. या राशीच्या मुली फारच महत्वकांक्षी मानल्या जातात. वेळ प्रसंगी अतिशय कठोर बनू शकतात.

या स्वतःच्या विचाराने जगणाऱ्या मुली असतात. जीवनातील जोडीदारावर भरभरून प्रेम करतात. विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम संकट काळात पतीला मदत करतात. एक पत्नी म्हणून स्वतःच्या वैवाहिक नात्याला अतिशय इमानदारीने जपतात.

या राशीच्या मुली स्वतःच्या परिवारावर भरभरून प्रेम करतात. नेतृत्व क्षमतेने भरपूर या मुली अतिशय जिद्दी स्वभावाच्या मानल्या जातात. आईच्या रूपात या फार प्रेमळ असतात. स्वतःच्या परिवारासाठी वाटेल तेवढे कष्ट करण्याची यांची तयारी असते.

माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा.तसेच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वर दिलेली माहिती ज्योतिष शास्त्राच्या आधारावर असून तुमच्या राशीशी तंतोतंत जुळेलच असे नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here