नमस्कार मित्रानो
मित्रांनो काही दिवसात दिवाळी येणार आहे. आता सणवार सुरू झाले आहेत. दसरा , कोजागिरी पौर्णिमा मग धनतेरस आणि मग दिवाळी अशा रीतीने हिंदू धर्मातील सणवार असतात. मित्रांनो दिवाळी हा सगळ्यात मोठा सण मानला जातो. वर्षातला सगळ्यात मोठा सण असतो.
आपण सगळेच खूप उत्साहात हा सण साजरा करत असतो. मित्रांनो दिवाळी येण्याआधी आपण घरदार स्वच्छ करत असतो ,आपले देवघर स्वच्छ करत असतो , नवीन वस्तू आणत असतो. देवघरात सजावट करत असतो. घरादाराची सजावट करत असतो.
परंतु मित्रांनो तुम्ही तुमच्या देवघरात कधी बारीक लक्ष दिले आहे का ? तुमच्या देवघरामध्ये काहीतरी चुकीचे तर नाही ना ? होय मित्रानो , आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे दिवाळी येण्याआधी देवघरातून या 5 मूर्ती किंवा 5 फोटोंचे तुम्ही विसर्जन करा.
हो मित्रांनो हे फोटो आणि ह्या मुर्त्या आपल्या देवघरामध्ये कधीच नसायला पाहिजे आणि हे ठेवायलाच नाही पाहिजे. पण चुकून आपल्याकडून ते ठेवले जातात त्यांची पुजा अर्चा सुद्धा केली जाते. यात वाईट असं काहीच नाहीये पण याचे परिणाम हे वाईट होऊ शकतात किंवा काही तरी आपल्याला त्रास होऊ शकतो.
म्हणून जर तुमच्या देवघरात सुद्धा या मुर्त्या किंवा हे फोटो असतील तर नक्कीच त्यांचे विसर्जन करा. आता ह्या कोणत्या मुर्त्या आहेत? कोणते फोटो आहेत? तर मित्रांनो महादेवांचा फोटो किंवा महादेवाची मूर्ती.
मित्रानो जर तुमच्या घरामध्ये महादेवांचा फोटो, महादेवाची मूर्ती असेल तर लगेच त्यांचे विसर्जन करा. एकदा बघून घ्या तुमच्या देवघरात कोणत्या फोटोमध्ये महादेव आहेत का किंवा मूर्ती महादेवांची आहे का ? लगेच विसर्जन करा. महादेवांची फक्त पिंडी पुजली जाते हे तुम्ही लक्षात ठेवा.
दुसरं म्हणजे पवनपुत्र हनुमानांचा फोटो किंवा हनुमानांची मूर्ती. हनुमानांचा सुद्धा फोटो आणि मूर्ती पुजली जात नाही. देवघरात ठेवायला नाही पाहिजे. हनुमान फक्त मंदिरात असतात. त्यांची पूजा फक्त मंदिरात केली जाते घरात नाही.
तर तुमच्या घरात हनुमानांची मूर्ती असेल, हनुमानांचा फोटो असेल तर त्यांचेही तुम्ही विसर्जन करून घ्यावे. नंतर आहे लक्ष्मी माता उभी असलेली मूर्ती किंवा उभा असलेला फोटो. लक्ष्मी माता कधीही बसलेल्या स्वरूपात असावी आणि त्याच्या आजूबाजूला 2 हत्ती असावे.
लक्ष्मी माताही कमळावर बसलेली असावी. जर तुमच्या घरामधील लक्ष्मी माता उभी असेल किंवा कोणत्या प्राण्यावर बसलेली असेल तरीही त्या फोटोचे त्या मूर्तीचे तुम्ही विसर्जन करावे. माता ही नेहमी कमळावर बसलेली पाहिजे तिच्या आजूबाजूला नेहमी 2 हत्ती पाहिजेत.
नंतर आहे कोणत्याही देवांच्या तुमच्या देवघरात असलेल्या मोठ्या मुर्त्या. आता इथे मुख्य प्रश्न येतो तुमच्या घरात कोणत्याही मूर्ती असतील. मोठ्या म्हणजे खूप मोठ्या . म्हणेज तुमच्या हातापेक्षा मोठ्या म्हणजे तुमच्या पंजापेक्षा मोठ्या मुर्त्या असतील तर त्यांचे सुद्धा तुम्ही विसर्जन करावे.
जास्त मोठ्या मुर्त्या देवघरात पूजल्या जात नाहीत. त्या फक्त मंदिरातच पुजलया जातात. तर मित्रांनो या 5 मुर्त्या आणि फोटो आहेत ते म्हणजे महादेवांचा फोटो किंवा मूर्ती, हनुमानांची मूर्ती किंवा फोटो, लक्ष्मी माता उभी असलेली मूर्ती किंवा फोटो किंवा लक्ष्मी माता कोणत्या प्राण्यावर बसलेली असली ती मूर्ती किंवा तो फोटो.
आता शेवटचं म्हणजे कोणत्याही देवांच्या मोठ्या स्वरूपात असलेल्या मुर्त्या या देवघरात कधीच ठेवायला नाही पाहिजे. त्यांचे तुम्ही विसर्जन करा. आता विसर्जन कसे करावे? तर मित्रानो विसर्जन करायचे असेल तर एखादा शुभ दिवस निवडावा.
गुरुवार, शुक्रवार, सोमवार असा शुभ दिवस निवडावा. त्यादिवशी त्या देवांना फुल हार वहावेत ,अगरबत्ती ओवाळावी , दिवा लावावा आणि एक नैवेद्य त्यांच्यासाठी बनवावा. गोड-धोड काहीतरी नैवेद्य बनवावा.
त्यानंतर प्रार्थना करावी, पूजा अर्चा करावी , आरती करावी आणि त्यानंतर त्या देवांचे विसर्जन आपण करू शकतो. त्यांचे विसर्जन तुम्ही वाहत्या पाण्यात करू शकतात किंवा कोणत्या तरी मंदिरात जाऊन त्यांना ठेऊ शकता. अशा रीतीने त्यांचे तुम्ही विसर्जन करू शकतात.
तर मित्रांनो दिवाळी येण्याआधी तुम्ही ह्या 5 मूर्ती किंवा 5 फोटो तुमच्या देवघरातून काढून त्यांचे विसर्जन नक्की करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.