नमस्कार मित्रानो,
मित्रानो 5 जुलै सोमवार रोजी योगिनी एकादशी आलेली आहे. हि एकादशी सर्व रोग आणि आजरांचा नाश करते. जो व्यक्ती आज योगिनी एकादशीचे व्रत करतो त्याला जबरदस्त प्रसिद्धी मिळते. ज्येष्ठ महिन्यात हि योगिनी एकादशी येते. एकादशी व्रताचे फायदे आपल्याला माहीतच असतील. योगिनी एकादशी सर्व पापं दूर करते आणि व्रत करणाऱ्याला कौटुंबिक आनंद देते.
या व्रतामुळे सर्व प्रकारचा उपद्रव नाहीसा होतो आणि आयुष्यात आनंद येतो. शास्त्रानुसार हे व्रत केल्याने हजारो ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य मिळते. आता आपण थोडक्यात जाणून घेऊया योगिनी एकादशी व्रताची कथा.
अलकापुरीचा राजा यक्षराज कुबेर यांच्याकडे हेम नावाचा एक माळी काम करायचा. माळीचे काम म्हणजे दररोज भगवान शिवाची पूजा करणे. मानसरोवर वरून फुले आणणे. एकेदिवशी तो आपल्या पत्नीसोबत फिरायला गेला. परिणामी त्याला फुले घेऊन यायला उशीर झाला. तो उशिरा कुबेरांच्या सभेला पोहोचला. त्यामुळे रागावलेल्या कुबेराने त्याला कुष्टरोगी होण्याचा शाप दिला.
शापाच्या परिणामामुळे माळी इकडे तिकडे भटकत राहिला. असाच भटकत भटकत मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला. योगाच्या सामर्थ्याने ऋषींनी त्याच्या दुःखाचे कारण जाणून घेतले. आणि त्याला सांगितले कि जर तुम्ही योगिनी एकादशीचे व्रत केले तर तुम्हाला शापामधून मुक्ती मिळेल.
त्यानंतर माळीने योगिनी एकादशीचे व्रत विधिवत पाळले आणि व्रताचा परिणाम म्हणजे हेम माळीचा कुष्ठरोग संपला. असे हे योगिनी एकादशीचे व्रत सर्वांचे दुख, दारिद्य दूर करते. आता पुढे पाहूया या व्रताचा विधी.
या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंची उपासना करावी. शक्य असल्यास फलाहार करून उपवास करावा. भगवान विष्णूंना प्रिय असणारे तुळशी पत्र अर्पण करावे पण मित्रानो लक्षात ठेवा एकादशीला तुळशी पत्र तोडायचे नसते. तुम्ही एक दिवस आधीच तुळशीपत्र तोडून ठेवा. आणि एकादशीला ते भगवान विष्णूंना अर्पण करा.
तसेच या दिवशी विष्णुसहस्त्र नामाचे पठण करावे. शक्य असल्यास यथाशक्ती दान धर्म करावा. यामुळे एकादशीचे पुण्य दुपटीने मिळते. मित्रानो धनप्राप्तीसाठी सुद्धा या एकादशीच्या दिवशी अनेक उपाय केले जातात. त्यातलाच एक उपाय आज आपण पाहणार आहोत.
जर तुम्ही कुठली मनोकामना असेल आणि ती खूप दिवसांपासून पूर्णच झाली नसेल तर एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य करावा. यासाठी आपल्याला एका तांब्या मध्ये शुद्ध जल घ्यायचे आहे आणि त्यात आपल्याला अक्षता, चिमूटभर हळद, गूळ किंवा थोडीशी साखर टाकायची आहे.
मित्रानो हे पाणी आपल्या घराच्या जवळ एखादे पिंपळाचे झाड असेल त्या झाडाला ते पाणी अर्पण करायचे आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाच किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानतंर झाडाजवळ तुपाचा दिवा प्रजवलीत करायचा आहे.
मित्रानो या नंतर एक पिंपळाच पान आपल्याला घ्यायचं आहे. त्यावर हळदीच्या साहाय्याने आपली जी इच्छा, मनोकामना आहे ती लिहायची आहे. हळदी मध्ये पाणी मिक्स करून आपल्याला ती इच्छा पिंपळाच्या पानावर लिहायची आहे.आणि ते पान पिंपळाच्या जवळच माती मध्ये गाडायचं आहे.
त्यानतंर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे कि माझी मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी. अशी प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे. काही दिवसांतच तुम्ही इच्छा पूर्ण झाल्याची तुम्हाला दिसून येईल.
तर मित्रानो तुमची देखील इच्छा खूप दिवसांपासून पूर्ण झालेली नसेल तर ती पूर्ण करण्यासाठी योगिनी एकादशीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा. आणि तुमचे अनुभव आमच्या सोबत शेयर करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.