स्वामी म्हणतात ज्यांच्या देवघरात या 4 वस्तू असतात त्यांच्या घरात कधीच कसली कमी राहत नाही…

0
403

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ,

मित्रांनो या ज्या घराच्या देवघरात या चार गोष्टी असतात तिथे कसल्याच गोष्टीचे कमी राहत नाही, नेहमी भरभराट होते. अशा घरात सर्व चांगलेच होते. मित्रांनो देवघर म्हणजे आपल्या चांगल्या कर्माचे स्थान.

जिथे आपण आपल्या इच्छा देवाला सांगतो, आपल्या अडचणी, समस्या देवापुढे मांडतो. आणि तिथूनच आपल्याला शक्ती मिळते, एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. जिथून आपले घर पवित्र बनते, तिथून आपल्याला आशीर्वाद मिळतो.

या चार वस्तू नेहमी देवघरात असाव्यात. कोणत्या आहेत त्या चार वस्तू ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या चार वस्तू.

1) चंदन

मित्रांनो चंदन हे शांततेचे आणि शीतलतेचे प्रतीक आहे. एक चंदनाची खोड आणि सहान पूजेच्या ठिकाणी असावं. चंदनाच्या सुवासाने मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात.

चंदनाला शाळीग्राम किंवा शिवलिंगावर लावतात. कपाळी चंदनाचा गंध लावल्याने मेंदू शांत राहतो. जर आपल्या घरात चंदन असेल तर नक्कीच त्या घरात शांतता नांदत असेल.

आपलं घर पवित्र राहील. म्हणून घरामध्ये थोडंतरी चंदन असायला हवं.

2) शंख

ज्या घरात शंख असते तिथे लक्ष्मी नांदते. शंख हे सूर्य आणि चंद्र देवा समान आहे. याच्या वरील बाजूस वरून मागील बाजून ब्रम्हा आणि पुढील बाजूस गंगा आहे. आणि सरस्वती नद्या आहेत.

आपल्याला जे लाभ तीर्थक्षेत्रापासून मिळतात तेच लाभ आपल्याला शंखाच्या दर्शनाने आणि शंखाची पूजा केल्याने मिळतात. म्हणून प्रयत्न करावे कि आपल्या देवघरात एकतरी शंख असावा.

मित्रांनो शंख असला कि त्याची दररोज नित्यनियमाने आणि भक्तिभावाने पूजा हि झालीच पाहिजे.

3) शिवलिंग

शंकराची एक प्रकारची मूर्ती. तुम्हाला माहीतच असेल शंकराची मूर्ती किंवा त्यांचा फोटो आपण देवघरात ठेवत नाहीत. त्यांची पूजा आपन करत नाहीत. पण महादेवाचे पिंड, त्यांचे लिंग आपण पूजत असतो.

म्हणून शिवलिंग आपल्या देवघरात असायलाच हवे. शिवलिंग सर्व मूर्तींपेक्षा अधिक प्रभावी असून पूजेसाठी योग्य मानली जाते. शाळीग्राम आणि शिवलिंग घरात असल्याने घराची ऊर्जा संतुलित राहते.

मित्रांनो शिवलिंग ठेवल्याने आपल्या घरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा कायम राहते. वाईट गोष्टींपासून आपला बचाव होतो. म्हणून शिवलिंग आपल्या देवघरात असायलाच हवे.

4) कवडी

प्राचीन काळापासून काही परंपरा किंवा उपाय प्रचलित आहेत. हे उपाय केल्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे.

एक एक पिवळ्या कवडीला आपण जर लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरात किंवा तिजोरीत ठेवले तर याने आपल्याला भरपूर लाभ मिळतात. तर तुम्ही प्रयत्न करावे कि तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळतील.

पिवळ्या नाहीच मिळाल्या तर सफेद रंगाच्या कवड्या सुद्धा तुम्ही देवघरात ठेवू शकता. एक किंवा दोन कवड्या देवघरात ठेवून त्यांचे पूजन करू शकता.

तर मित्रांनो या चार वस्तू या तुमच्या देवघरात असायलाच हव्यात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here