उद्या शनी अमावास्या सूर्यग्रहण. या राशींची लागणार लॉटरी , पुढील 12 वर्षं खुप जोरात असेल नशिब

0
266

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगितले गेले आहे. त्यातच शनी अमावस्या हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या म्हटले जाते.

विशेष म्हणजे याच दिवशी सूर्यग्रहण लागत असून हा अतिशय अद्भुत संयोग बनत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण लागणे हे विशेष महत्वपूर्ण मानले जाते. शनी अमावस्येला शनीच्या साडेसाती पासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

ज्या लोकांना शनीची साडेसाती चालू आहे अशा लोकांनी या दिवशी दान धर्म करणे विशेष फलदायी मानले जाते. अमावस्या आणि सूर्यग्रहण असल्यामुळे या दिवशी पंचदान करणे विशेष फलदायी मानले जाते.

यामुळे सूर्य आणि शनिदेव प्रसन्न होतात आणि मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात. शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृदोष दूर होतात. या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते.

या दिवशी गरजू व्यक्तींना मोहरीचे तेल , चप्पल , बूट , काळे कापड , छत्री इत्यादी वस्तू दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी शनी मंत्राचा जप करून मनोभावे शनीला शरण गेल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट नाहीसे होतात.

मान्यता आहे कि या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दान ,धर्म केले जाते. पवित्र नदी मध्ये स्नान करून पितरांचे तर्पण करणे लाभकारी मानले जाते. त्यामुळे पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.

मित्रानो दिनांक ४ नोव्हेंबर रोजी जेष्ठ नक्षत्रावर वृश्चिक राशीत हे खग्रास सूर्यग्रहण होत असून हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे या ग्रहणाचे वेद पाळण्याचे कारण नाही.तरी सावधगिरी म्हणून गरोदर महिलांनी काही नियम पाळण्यास हरकत नाही.

हे ग्रहण जरी भारतात दिसणार नसले तरी याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडण्याचे संकेत आहेत. याच दिवशी अमावस्या देखील आहे. कार्तिक कृष्ण पक्ष विशाखा नक्षत्र दिनांक ३ डिसेंबर दुपारी ४ वाजून ५७ मिनिटांनी अमावस्या सुरु होणार असून ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी अमावस्या समाप्त होत आहे.

अमावस्येपासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.

आता जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. आता प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार असून जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , मकर , कुंभ आणि मीन रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here