31 जानेवारी सोमवती अमावस्या.हिऱ्यापेक्षा जास्त चमकणार तूळ राशीचे नशीब

0
247

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी अमावस्या हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते. पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते.

हि अमावस्या सोमवारी येते म्हणून हि अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून साजरी होते. हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस व्रत , उपवास , पूजन आणि पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी विशेष फलदायी दिवस मानला जातो.

सौभाग्यवती महिला पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून या दिवशी व्रत उपवास करतात. पितृ दोष निवारणासाठी देखील हा दिवस उत्तम मानला जातो. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावे दान धर्म आणि तर्पण करणे विशेष लाभकारी मानले जाते.

या दिवशी पितरांचे तर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते.

पिंपळाची परिक्रमा देखील करावी. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे लाभकारी मानले जाते. मान्यता आहे कि असे केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते.मनोकामना पूर्ण होतात.

सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा घडून येते. पौष कृष्ण पक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक ३१ जानेवारी रोजी दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी अमावस्या सुरू होत असून १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजून १६ मि. समाप्त होत आहे.

अमावस्येपासून पुढे येणारा काळ तूळ राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनात आनंदाचा वर्षाव होणार आहे.

अमावस्येपासून पुढील काळ आपल्या जीवनात आनंदाचे नवे रंग भरणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. आता सांसारिक जीवनात चालू असणारी भांडणे , कटकटी दूर होणार आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल.

पारिवारिक सुखात वाढ होईल. उद्योग ,व्यापारात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून व्यवसायामध्ये वाढ होणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने प्रगतीला सुरवात होणार आहे. कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. व्यापारी वर्गासाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायासाठी प्रगतीच्या नवीन संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

एकूणच अमावस्येपासून पुढे येणारा काळ तूळ राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here