नमस्कार मित्रानो
मित्रानो आता श्रावण महिना सुरु झाला आहे. सर्वजण महादेवाचे अभिषेक , पूजन करण्यात मग्न होतील. महादेवांची ज्योतिर्लिंगे भक्तांच्या गर्दीने फुलून जातील. पण फक्त महादेवाचे पूजन करून आपली पूजा पूर्ण होते का ? नाही मित्रानो. आधी आपल्याला नंदी महाराजांचे पूजन करावे लागते.
त्यानंतरच महादेवांचे दर्शन होते. कारण स्वतः महादेवांनी त्यांना तसे वरदान दिलेले आहे. तसेच ते महादेवाचे दूत देखील आहेत. म्हणून आपण जर त्यांच्या कानात आपली इच्छा सांगितली तर ती इच्छा ते महादेवांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात.
मित्रानो या विषयी एक कथा सांगितली जाते. श्रीलाभ नावाचे एक ब्रह्मचारी मुनी होते. एकदा ते रानात गेले असताना एक छोटेसे बालक त्यांना रडताना दिसले. त्यांनी त्या बालकाला उचलून आपल्या आश्रमात आणले व आपल्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करू लागले.
त्यांनी त्या बालकाचे नाव नंदी असे ठेवले. बालक हळू हळू मोठे होऊ लागले. एकदा त्या मुनींच्या आश्रमात दोन साधू आले. त्या साधूंनी नंदीला पाहिले व सांगितले कि हा मुलगा हुशार आहे परंतु अल्पायुषी आहे. याचे मरण जवळ आले आहे.
हे बालक जास्त दिवस काही जगणार नाही. हे ऐकून त्या बालकाला खूप वाईट वाटले. त्या बालकाने रानात जाऊन महादेवाची तपश्चर्या करण्यास सुरवात केली. ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप त्याने करण्यास सुरवात केली.
महादेव त्या बालकाच्या तपस्चर्येने प्रसन्न झाले व त्याच्या समोर प्रकट होऊन त्याला अजरामर होण्याचा आशीर्वाद दिला आणि त्याला सोबत घेऊन गेले. महादेव व पार्वती यांनी सर्व गणांसमक्ष नंदीला त्यांच्या गणांचा अधिपती म्हणून अभिषेक केला.
त्यानंतर असा आशीर्वाद दिला कि जेथे जेथे महादेव असतील तेथे तेथे प्रत्येक ठिकाणी नंदी असेल. नंदी शिवाय महादेव व महादेवाचे मंदिर अपूर्ण समजले जाईल. जे भक्त आपल्या इच्छा , मनोकामना नंदीच्या कानात सांगतील त्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील.
स्वतः महादेव त्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. तुम्ही महादेवांकडे तुमची इच्छा प्रकट करू शकता परंतु नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. कारण नंदी म्हणजे महादेवाचे दूत आहेत.
यापुढे महादेवाच्या मंदिरात गेला कि आपली जी काही इच्छा असेल ती थेट महादेवांना न सांगता नंदी महाराजांच्या कानात सांगा. म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण होईल.
मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.